शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात शाळांना अ श्रेणी प्राप्त झाल्याबाबत अभिनंदन पत्र sqaaf mulyankan
संदर्भ : १. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र. क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SSSA)
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.१५ मार्च, २०२४ (SQAAF)
३. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.२८ जाने. २०२५
४. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्याबाबत
पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/SQAAF/२०२४-२५/००५८२ दिनांकः ०३.०२.२०२५
५. पत्र.जा.क्र. राशैसंप्रपम//SCERT-५१.०/२९/२०२५-SSSA/I/१६२४१७०७५/२०२५ दि २४/१२/२०२५
उपरोक्त संदर्भ क्र. १च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र. २ व ३ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र. ४ नुसार शाळांचे स्वयं मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबवर स्वयं मूल्यांकनासाठी scert-data.web.app ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.
उपरोक्त संदर्भ क्र ४ नुसार सन २०२४-२०२५ मध्ये राज्यातील १,०२,६७५ शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले. संदर्भ क्र ५ नुसार सन २०२४-२०२५ मध्ये स्वयं मूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळांच्यापैकी सन २०२५-२०२६ मध्ये १०७१२ शाळांची बाह्य मूल्यांकन करण्यासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी १०६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण करण्यात आले.
संदर्भ क्र १ च्या शासन निर्णयातील क) प्राधिकरणाची कार्यपद्धती व कार्ये मधील मुद्दा क्र VI॥ मध्ये बाह्य मूल्यांकनानंतर / त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनानंतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्या दर्शनी भागात अथवा शाळेच्या लेटर हेड वर उल्लेख करावा असे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०२५-२६ मध्ये बाह्य मूल्यांकन पूर्ण झालेल्या शाळांनी आपल्या शाळेला मिळालेली श्रेणी शाळेच्या दर्शनी भागात अथवा शाळेच्या लेटर हेड वर नमूद करावी.
सन २०२४-२५ मध्ये स्वयं मूल्यांकन केलेल्या व त्यापैकी सन २०२५-२६ मध्ये बाह्य मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या शाळांच्यापैकी ४२९ शाळांना अ श्रेणी प्राप्त झाली आहे. राज्यातील अ श्रेणी प्राप्त झालेल्या शाळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. अशा शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा
व्यवस्थापन समिति / शाळा व्यवस्थापन व विकास समिति तसेच शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि शाळेला अ श्रेणी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन….
यापुढे या शाळांनी आपल्या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व इतर शाळांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा …
सोबतः अ श्रेणी प्राप्त करणाऱ्या शाळांची यादी









