300+ महत्त्वाचे मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द marathi shabdasamuha ek shabd 

300+ महत्त्वाचे मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द marathi shabdasamuha ek shabd 

आधी जन्म घेतलेला ⏭️ अग्रज 

फार कमी बोलणारा ⏭️ अबोल

देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा ⏭️ अनुष्ठान

ज्याचा थांग लागत नाही असे ⏭️ अथांग 

ज्ञानेंद्रियांनी आकलन होण्यास अशक्य असे⏭️ अगोचर

मोजता न येण्यासारखे ⏭️ अगणित

सीमा नाही असे ⏭️ असिम

वर्णन न करता येण्यासारखा ⏭️ अवर्णनीय

ज्याला कोणीही शत्रू नाही असा ⏭️ अजातशत्रू

घरी पाहुणा म्हणून आलेला ⏭️ अतिथी

अनुभव नसलेला ⏭️ अननुभवी 

अन्न देणारा ⏭️ अन्नदाता

ज्याचा विसर पडणार नाही असा ⏭️ अविस्मरणीय

धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण ⏭️ अन्नछत्र

ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे ⏭️ अतुलनीय

जे साध्य होणार नाही ते ⏭️ असाध्य

ज्याला कशाचीच उपमा देणार नाही असे 

आवरता येणार नाही असे⏭️ अनुपम

थोडक्यात समाधान मानणारा ⏭️ अल्प संतुष्ट

अग्नीची पूजा करणारा ⏭️ अग्निपूजक

विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य ⏭️अतिक्रमण

कोणाच्याही पक्षात सामील न होणारा⏭️अपक्ष

कधीही नाश न पावणारे⏭️अविनाशी 

पायात काहीही न घालणारा⏭️अनवाणी 

स्वतःबद्दल अभिमान बाळगणारा ⏭️अभिमानी

देवस्थानास अर्पण केलेले इनाम गाव, जमीन इ. ⏭️अग्रहार

ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार करण्यास⏭️अभयारण्य

बंदी असते असा संरक्षित विभाग⏭️अभयारण्य

कमी वेळ टिकणारा⏭️अल्पजीवी

कमी आयुष्य असलेला⏭️अल्पयुषी

पुष्कळ पाऊस पडणे⏭️अतिवृष्टी

कधीही जिंकला न जाणारा⏭️अजिंक्य

ज्याला अंत नाही असा⏭️अनंत

ज्याला मरण नाही असा⏭️अमर

पाऊस मुळीच न पडणे⏭️अवर्षण

पूर्वी कधीही घडले नाही असे⏭️अपूर्व

दुसऱ्यांचे पाहून त्याच्यासारखे वागणे⏭️अनुकरण

एखाद्याचे मागून जाणे⏭️अनुगमन 

ओळख नसलेला⏭️अनोळखी

प्रत्यक्ष किंवा समोर नाही असे⏭️अप्रत्यक्ष

देवाने घेतलेला मनुष्याचा जन्म⏭️अवतार

माहिती नसलेला⏭️अज्ञानी

जाणून घेण्यास अशक्य असे⏭️अज्ञेय 

वर्तमानपत्रातील संपादकीय मुख्य लेख⏭️अग्रलेख

स्तुती करण्यास अयोग्य⏭️अशलाघ्य

गुणधर्माचा अभ्यास करण्याचे शास्त्र⏭️अनुवंश शास्त्र

ज्याचे मूल्य सांगता येत नाही असे⏭️अमूल्य

ज्याच्या बरोबर दुसऱ्याची तुलना करता येत नाही⏭️अतुलनीय

इतरांबरोबर बेपर्वाईने वागणारा⏭️अरेरावी

तेज नसलेली अवस्था⏭️निस्तेज

जवळ काहीही नसलेला⏭️अकुंठित

असहाय अवस्थेत सापडलेला⏭️अगतिक 

न समजण्याजोगे⏭️अगम्य 

देवघेवीच्या व्यवहारात मिळणारा मोबदला⏭️अडत 

जीवात्मा व परमात्मा ह्यांचे ऐक्य प्रतिपादन करणारे मत ⏭️अद्वेत

धर्माला सोडून नियमबाह्य वर्तन⏭️अधर्म

वाईट मार्गाने जाणारा⏭️अधोगामी

यज्ञातील मुख्य नेता⏭️अपरिचित

अगाऊ खर्चासाठी दिलेली रक्कम⏭️अनामत

वाटेल त्या वेळी वाटेल ते घडणारे⏭️अनियमित

मोठ्या मनुष्याच्या स्वागतासाठी उठण्याची क्रिया⏭️अभ्युत्थान

अनेक अवधानांकडे एकाच वेळी लक्ष देणारा⏭️अष्टवधनी 

वनस्पतीच्या मुळाशी पाण्यासाठी केलेला खोलगट भाग⏭️अळे

उपकार न जाणणारा⏭️अनोपकारी

ज्याच्यात कोणतेही कर्तृत्व नाही असा मनुष्य⏭️अजागळ 

शिकण्याची आवड नसलेली, अशिक्षित राहिलेला⏭️अक्षरशत्रू

अंग राखून काम करणारा⏭️अंगचोर

खूप उंच उंच असे आकाश⏭️अंतराळ

मुलाला झोप यावी म्हणून म्हणावयाचे गीत⏭️अंगाई गीत

डोळ्यात घालावयाचे काजळ⏭️अंजन

विवाहसमयी नवरानवरीमध्ये धरावयाचे वस्त्र⏭️अंतरपाट

अत्यंत हट्टी⏭️आडेल तट्टू 

अनेक चांगल्या गुणांनी युक्त⏭️अष्टपैलू

बरोबर की चूक, योग्य की अयोग्य हा विचार न करता

ठेवलेली श्रद्धा⏭️अंधश्रद्धा

दार बंद करण्यासाठी योजलेला लाकडी किंवा लोखंडी दांडा⏭️अडसर

देव आहे असे मानणारा, ईश्वरधर्म मानणारा⏭️आस्तिक

पायापासून डोक्यापर्यंत⏭️अपाद मस्तक

‘भले होयो’ असे म्हणणे⏭️आशीर्वाद

स्वतःच लिहिलेले स्वतः विषयीचे चरित्र⏭️आत्मचरित्र

जे नाही ते आहे, असे वाटणे⏭️आभास

हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत⏭️असेतूहिमाचल

पूर्वीपासून जंगलात राहणारे⏭️आदिवासी

कोणतेही काम करण्याचे कंटाळा करणारा⏭️आळशी

परंपरेने चालत आलेली ऐकीव गोष्ट⏭️आख्यायिका 

उच्च दर्जा असलेला सुंदर महाल⏭️आलिशान

कंठ दाटून आल्यावर जो मुखरस गिळतात तो⏭️अवांढा 

न बोलाविता येणारा, मध्येच टपकणारा⏭️अगंतुक 

देवासमोर ओवाळण्याचा दीप⏭️आरती

तारकापुंजाचा आकाशात दिसणारा तोडा⏭️आकान 

दोरीवर चालताना तोल सांभाळण्यासाठी हातात घेतलेला बांबू⏭️आढाळ 

निरनिराळ्या राष्ट्रांतील⏭️आंतरराष्ट्रीय

स्वभावाने अतिशय तापट असा मनुष्य⏭️आग्यावेताळ

पूर्वी घडलेल्या हकीकतींचे वर्णन⏭️इतिहास

पावसापासून निवारण करण्यासाठी पळसाची वा तत्सम मोठी पाने व कामट्या यापासून केलेले आवरण⏭️इरले 

उ, ए, ऐ, ओ

नदीची सुरुवात होते ते ठिकाण⏭️उगम

सूर्योदयापूर्वीची वेळ⏭️उष:काळ 

सतत काम करणारा⏭️उद्योगी

वाटेल तसा पैसा खर्च करणे⏭️उधळपट्टी

ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा⏭️उपकृत

स्वतःची कोणतीही वस्तू सहज देणारा⏭️उदार

उदयाला येत असलेला⏭️उदयोन्मुख

शिल्लक राहिलेले⏭️उर्वरित

वर्मी लागेल असा स्वर, शब्द⏭️उपरोधिक

लक्ष न दिले गेलेले⏭️उपेक्षित

सूर्योदय ज्या पर्वतामागून होतो तो पर्वत⏭️उदय गिरी 

जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारा⏭️उभयचर

लहान मुलास प्रथम अन्न खावयास घालणे⏭️उष्टावळ 

मूर्खपणाची मसलत देणारा⏭️उंटावरचा शहाणा

अगदी दुर्मिळ झालेली वस्तू किंवा व्यक्ती⏭️उंबराचे फूल

विशिष्ट हवामानाचा कालखंड⏭️ऋतू

काहीही कष्ट न करता आयते बसून खाणारा⏭️ऐत खाऊ 

दुसऱ्यामध्ये न मिसळणारा ⏭️एकलकोंडा 

कोणत्याही पलटणीत न राहता एकटा स्वतंत्रपणे लढणारा शिपाई⏭️एकांड्या 

 कंटाळवाणे लंबलचक भाषण⏭️एरंडाचे गुऱ्हाळ

हाताचे दोन पंजे जवळ आणून केलेला हाताचा पसा⏭️ओंजळ

फारच दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी⏭️कपिलाषष्ठीचा

अत्यंत उदार मनुष्य⏭️कर्णाचा अवतार

 

Leave a Comment