3000+ मराठी एक शब्द अनेक अर्थ marathi ek shabd anik arth
अनमान : अनादर
अनमान : संकोच
अकाली: शीखांचा एक पंथ
अकाली : वेळेच्या आधी
अगड : खंदक, आड
अगड : खेळाचे आवार
अगर: अथवा किंवा जर
अकरा : दहाच्या नंतर येणारी संख्या
अकरा : रुद्र
अंनगळ: अप्रतिबंध
अंनगळ: मनस्वी
अंक: संख्या, आकडा, खूण
अंदेश : आदेश, आज्ञा
अंदेश: शंका, कल्पना, संशय
अभंड : जिन्नस तोलण्यापूर्वी ज्या भांड्यांत तो घालावयाचा त्याचे वजन करतात ते
अभंग : भंग न पावणारा
अभंग : खडे बोल
अभंग : एक प्राकृत छंद
अंमल : हुद्दा, अधिकार, सत्ता
अंमल : कैफ, गुंगी
अंबट : किंचित वाळलेले
आंबट : आम्ल, खट्टे
अंबर: धान्याचे कोठार
अंबर: आकाश
अय्या: दासी
अय्या: मद्रासी पुरुषाला म्हणतात
अरळ: फुल
अरळ: आच्छादन
अर्थ: पैसा
अर्थ: किंमत
अयनी: युक्ती
अयनी: समुदाय
अर्क: सूर्य
अर्क: रूईचे झाड
अर्क: कस, सार, कढवून कापलेला अंश
अर्क: वाईट मनुष्य
अलंकार: आभूषण, दागिना
अलंकार: मराठी व्याकरणातील एक प्रकाश
अलंग: भिंत, तट
अलंग: नगारा, डंका, निशाण
अलात: पान
अलात: मशाल
अव: न्यूनतादर्शक शब्द, खाली दूर
अव: प्रत्यय (जसे- अवकळा, अवखळ)
अढी: तेढ
अढी: आंबे पिकविण्याची उबाऱ्याची जागा
अढी: रास, ढीग
अयब: व्यंग
अयब: खोडी
आ : तोंड, मुख (लक्षणेने)
आ : प्रत्यय (वर्तमानकालवाचक धातुसाधित प्रत्यय) उदा. बोलता, करिता इ.
आयाळ : सिंहाच्या, घोड्याच्या मानेवरील भाग
आयाळ : पत्नी
आकन : किंचित तुडविलेले धान्य
आकन : पायात घालावयाचा विजयाचा तोडा
आंख : कापडाचे माप
आंख : डोळा, पाहण्याचे इंद्रिय
आखर: गावाजवळचा भाग, प्रांत
आखर : अत्रर, वर्ण
आग: विस्तव, अग्नी
आच: तीव्र इच्छा
आंगवण: सेवा, चाकरी
आगवण: शौर्य, सामर्थ्य
आवा: ओल्या भाताची मूठ
आवा: कुंभाराची भट्टी
आपांपरी: दुर्दशा
आपांपरी: अव्यवस्था
आचार: शास्त्रशुद्ध वर्तन
आटणे: शिजून कमी होणे
आटणे : कमी होणे (कापड आटले)
आटणे: त्रास होणे (जीव आटला)
आटपाट: एक शिवाशिवीचा खेळ
आटपाट: आटपाट नावाचे नगर
आटा : पीठ
आटा: गारा
आढाळ: शस्त्र
आढाळ: डोंबाऱ्याची काठी, वेल
आन: शपथ
आन: आज्ञा
आधी: चिंता, दुःख
आधी: अगोदर, पूर्वी
आम: सार्वजनिक
आम: अर्धे कच्चे, पचलेले, अथवा शिजलेले
आर: भोवरा, जाते
आर: अजगर
आर: प्रत्यय
आवाळू: ओठ
आवाळू: गळू, फुगीर भाग
आस: इच्छा, आशा
आस: गाडीचा कणा
आसरा: आधार, मदत, आश्रय
आसरा: जलदेवता, अप्सरा
आसव: आसू
आसव: औषधींचा द्रवरस
आळ: रांग, ओळ
आळ: दोषारोप
आळी: बोळ, गल्ली
आळी: जंतुविशेष
उकळणे : वसूल करणे
उकळणे: आधन येणे उष्णता देणे
उगवणे : उदय होणे
उगवणे : बाहेर येणे
उजू : स्नान
उजू: चांगले सरळ
उपरी : वरची
उपरी : परकी
उर्दू : एक भाषा
उर्दू : सैन्य
उषा : पहाट
उषा : एक वैदिक देवता
उसळणे : वर जाणे
उसळणे : रागावणे
ए
एकूण : सारांश
एकूण : एकाने कमी
एक्का : पत्त्यातील एक खून असलेले पान
एक्का : बैल किंवा घोडा लावून ओढण्याची गाडी
एलची: वेलची
एलची: वकील
ओ
ओज: तेज
ओज: उपचार
ओढा : आकर्षण
ओढा : पाण्याचा प्रवाह
ओसाड : न पेरलेली जमीन
ओसाड : रिकामा
ओहर : वधू वर
ओहर : समुद्राचा फाटा
क
कच : माघार
कच : ठोकर
कंचुटी: द्वारपाल
कंचुटी : स्त्रियांची काचोली
कट: कटाची आमटी
कट : कमरेचा दोर
कट: सोंगट्याच्या खेळातील पटावरील एक घर
कट : कारस्थान
कट: वध
कट्टा -: दगडाचा ओठा
कट्टा : बळकट
कडका : गीत
कडका : तुकडा
कडसणी: चौकशी
कडसणी : बाजू
कडा: हातातील दागिना
कडा: डोळ्यांच्या कडा
कडा: डोंगराचा तुटलेला भाग, सुळका
कडाखा: फटकारा, तडाखा
कडाखा: एक वृत्त, ध्रुपद
कडाड: मोडण्याचा आवाज
कडाड: चाणाक्ष मनुष्य
कडे: बाजूस
कडे: हातात घालावयाचे वळे, चक्र, गोल
कढी: ताकास फोडणी देऊन केलेले उष्ण पेय
कढी: अडचणीत येणे
कश्मल: मळ
कश्मल: दोष
कपटा: कागदाचा तुकडा
कपटा: दुष्ट
कणेरी: तांदूळ वगैरे भरडून त्याच्या कण्या शिजवून केला
कणेरी: एक प्रकारचे रोप व त्याचे फूल
कद: सोवळ्याचे वस्त्र
कद: किंमत, लायकी, महत्त्व
कदम: पाय, पाऊल
कदम: एक आडनाव
कनात: तंबूच्या भोवतालचे कापडी आवरण
कनात: तुसडेपणा, त्रास
कन्या: एका राशीचे नाव
कन्या: मुलगी
कब्जा: ताबा, अम्मल
कब्जा: जाकीट
कबर: मुसलमानांचे थडगे
कबर: वेणी, बुचडा
कमल: पुष्टविशेष
कमल: लक्ष्मी, एखाद्या मुलीचे नाव
कर: हात
कर: जकात, वसुली
कर: षष्ठीचा प्रत्यय
कर: काळा, वाईट
करकोचा: पक्षीविशेष
करकोचा: वण (बांधण्याचा)
करडा: रंगविशेष, भुरकट
करडा: कठोर, उन्मत्त
करळ: काळ्या जमिनीचा एक प्रकार
करळ: छिद्र, फट
कर्ण: कान
कर्ण: महाभारतातील कुंतीचा ज्येष्ठ पुत्र
कप: कापूस
कप: चहा पिण्याची वस्तू
कप: ज्वालाग्रही पदार्थ
कल: मनाचा ओढा, प्रवृत्ती, वळण
कल: आवाज, कलबल
कलगी: एक प्रकारचा तुरा
कलगी: लावणीचा एक प्रकार
कलम: लेखणी, बोरू
कलम: सदर, परिच्छेद
कलम: छाटणे
कला: चंद्राची कला
कला: कौशल्याचे कार्य, रचना
कल्ला: मिश्यांचा झुपका
कल्ला: गलबला
कवडा: मोठी कवडी
कवडा: पक्षीविशेष
कस (णे): घट्ट आवळणे, बांधणे
कस (णे): परीक्षेस उतरणे, कस लावणे
कसर: कपडा व कागद यास लागणारी कीड, कीटकविशेष
कसर: न्यूनता, कमीपणा
कसा: कोणत्या प्रकाराने
कसा: अंगरख्याचा बंद
कळ: वेदना
कळ: दाराची मूळ, युक्ती
कळ: भांडण, तंटा
कळी: अंगरखा
कळी: भांडण, झगडा
कळी: फुलाची कळी
काचा: कच्चा, हिरवा
काचा: कमरबंद
काजवा: कीटकविशेष
काजवा: नदी ओलांडण्यासाठी केलेला लहान तात्पुरता रस्ता
काठ: मर्यादा, नदीचा काठ, किनारा
काठ: पदराचा / साडीचा काठ
काटा: शत्रू, दुष्मन
काटा: तीक्ष्ण टोकाची काडी
कात: त्वचेचे आच्छादन
कात: खैर झाडाचा डिंक
कातर: कात्री
कातर: भित्रा
काप: कर्णभूषण
काप : तुकडा, कापलेला भाग
काफी: एक वनस्पती व तिचे बी
काफी: गायनातील एक रागविशेष
काम: षड्विकारांपैकी एक, इच्छा
काम : कार्य, कर्म
कार: करणारा, कर्ता
कार: शब्द, आवाज
कारंज: एक प्रकारचा वृक्ष
कारंजे: पाण्याचे तुषार
कास: जमीन
कास: कुरण
कास: खोकला
काहिली: गुदमरणे
काहिली: आळस, दिरंगाई
काळ: वाईट प्रसंग
काळ: वेळ
काळ: व्याकरणातील एक प्रकार
किलकिल (णे): प्रकाशणे
किलकिल (णे): बिचकावणे
किलकिल (णे): आवाज करणे
कीर: पोपट
कीर: खास
किर: आडनाव
कटी: झोपडी
कटी: निंदा
कुडा: खोटा, वाईट
कुडा: एक औषधी
कुडी: झोपडी
कुडी : मोत्याची कुडी
कुणगा : शेतीवाडी
कुणगा : गुप्तधन
कुरूप: व्यंग
कुरूप: काट्याने केलेले पायातील घर
कुसळ : गवताची बारीक काडी
कुसळ : चेटकीण
कूट: निंदा, कपट
कूट : एक पदार्थ
कूड : गवत, कडबा
कूड : शरीर, देह
कूस: तृणविशेष
कूस : पोट, गर्भ
कूळ: वंश
कूळ : खंडकरी
केळ: फळ
केळ : थोडे, क्षुद्र
कैवाड : कारस्थान, गुप्त कट
कैवाड : पक्षाभिमान, कैवार
कोका : केळफुलाचे नाव
कोका: पागोट्यावरील टोकदार चोच
कोट : तट, नगराची भिंत
कोट : कोटी
कोडे: पेच, अडचण
कोडे: पणती
कोरडा: वाळलेला, शुष्क
कोरडा : चाबूक, आसूड
कोल्हार: गुहा
कोल्हार: कुंभार
कोस: रेशमाच्या किड्याचे घर
कोस: अंतर मोजण्याचे मापन
कोळ: गहाण पडलेला माल
कोळ: खाडी
कोच: आगगाडीचा एक डबा
कोच: खेळ शिकविणारा शिक्षक
कोळ: तिळांची कळी
कोळंबा: मातीचे एक भांडे
कोळंबा: तांदळाची एक जात
कोळी: मासे धरणारी जमात
कोळी: एक किडा
कोळे: बैलाचे वशिंड
कोळे: गवताचा पुडा
कौल: खापर
कौल: वचन, आश्वासन
कंदरा: दरी
कंदरा: गुहा
कंठ: गळा
कंठ: काठ
ख
खळी: गालावर पडणारा खोलगट भाग
खळी: शेतातील खळी
खडा: रत्न
खडा: लहान दगड
खडा: सरळ, उभा
खंड: अध्याय
खार: मुंबईतील एक भाग
खार: लोणच्यातील मसाला
खालसा : सरकारच्या ताब्यातून काढून घेतलेली
खालसा: शीख धर्म
खिसा: खण, अंगरख्यात लावलेली पिशवी
खिसा: गोष्ट, मुद्दा
खुजा: लहान, आखूड
खुजा: भांडे
खेडवळ: गावंढळ
खेडवळ: खिडकी
खेर: घाण, कचरा
खेर: एक वन्य वृक्ष
खेर: आडनाव
खोड : लंगडा
खैर: कृपा, मेहरबानी
खैर: वृक्षविशेष व त्याचे लाकूड
खोड: बुंधा
खोड: वाईट सवय, दोष
खोबरे: नारळातील मगज
खोबरे: नाश
खोरे: दोन डोंगरांमधील खोलगट भाग
खोरे: खणण्याचे व माती फेकण्याचे साधन
खंड: अडथळा
खंड: विविध देशांचा मिळून बनलेला भाग, आशिया खंड
खांड: हत्यार
खांड: भेग, कातरा
खांड: खडीसाखर
ग
गरा: फणसातील गरा
गरा: रवा खाण्याचा पदार्थ
गच्ची: आगाशी
गच्ची: गर्दी, दाटी
गत: नष्ट, गेलेला
गत: स्थिती, अवस्था, दशा
गदा: आयुध
गदा: संकट
गदा: भीक
गंध: वास
गंध: कपाळावर लावण्यासाठी वापरले जाणारे
गव्हला: वनस्पती
गव्हला: सपीटाची लहान वळी
गळंगा: गवत
गळंगा: सैल
गात्र: गायन
गात्र: इंद्रिय
गायत्री: गाय
गायत्री: मंत्र
गार: खड्डा, डबरा
गार: एक पांढरा दगड, खडकाचा प्रकार
गार: निष्प्रभ
गार: थंड
गारा: बर्फाचा तुकडा
गुजर: उदननिर्वाह
गुजर: एक जात / जमात
गांधारी: महाभारतातील कौरवांची आई
गांधारी: एक अनवट राग
गुजर: व्यापारी
गूढ: कोडे, अनाकलनीय, रहस्य
गूढ: कापणी
गूढ: जमाव
गुण: दोरी
गुण: विशेष धर्म, उपयोग, फायदा
गोंड: मोठा, ज्येष्ठ
गुरू: शिक्षक, मंत्रोपदेशक
गुरू: एका ग्रहाचे नाव
गोट: सोन्याची बांगडी
गोट: छावणी
गोटा: फुलांचा गुच्छ
गोटा: वाटोळा दगड
गोंड: घड
गोंड: रानटी जात
गोंधळ: धार्मिक विधी
गोंधळ: गडबड, अंदाधुंदी
गोम: दोष
गोम: एक सरपटत जाणारा कीटक
गौर: गौरी, पार्वती
गौर: गोरा, सफेद
ग्रह: आकाशातील तेजोगोल
ग्रह: कल्पना, समजूत
गंज: एकप्रकारचे भांडे
गंज: तांबरा, मळ
गंज: समूह, साठा
गंज: गवताचा साठा, रास
घ
घडी: दुमडी, रचना
घडी: वेळ, घटिका
घण: मोठा हातोडा
घण: दाट, जाड
घन: मेघ, ढग
घन: (गणित) एका संख्येने त्याच संख्येला तीनदा गुणून ये फल
घबाड: आकस्मिक मोठा लाभ
घबाड: एक शुभ मुहूर्त
घर: राहण्याचे ठिकाण
घर: छिद्र
घर: साठा
घस: तोटा, नुकसान
घस: झुपका
घाई: त्वरा, तातडी
घाई: घाव, प्रहार
घाट: धरण, बंधारा
घाट: शिखर
घाट: आकार, घडण, रचना
घाट: नदीचा, डोंगराचा घाट
घान: केरकचरा
घान: दुर्गंध
घाण: चुन्याचा घाणा
घात: मोसम, हंगाम
घात: संहार, विध्वंस
घात: समान संख्यांचा गुणाकार (गणित)
घात: अशुभ
घाय: जखम
घाय: घाई, त्वरा
घुमा: मुखस्तंभ, न बोलणारा
घुमा: मारून पडणारा व्रण
घुरे: फेफरे, अपस्मार
घुरे: वनस्पती
घुस्सा: राग, क्रोध
घुस्सा: ठोसा, गुद्दा
घोटा: पायाच्या चवड्याच्या वरील भाग
घोटा: एक प्रकारचे भांगेचे पेय
घोर: काळजी
घोर: भयंकर
घोष: गवळ्याची वस्ती
घोष: गर्जना
घोस: आवेश, जोर
घोस: गुच्छ, झुबका
च
चक: वजन, जरब
चक: जमीन, क्षेत्र
चक्कर: भोवळ, घेरी
चक्कर: लहान चाक
चक्कर: मूढ, लहरी
चक्की: जाते
चक्की: पत्याच्या डावातील चार ठिपक्यांचे पान
चंग: पैज, प्रतिज्ञा
चंग: डफ
चंग: चपळ
चट: एकदम, आपोआप
चट: आवड, गोडी
चट: दर्भाची प्रतिमा
चटक: गोडी, सवय
चटक: हुशार, चलाख
चर: खंदक, खाई
चर: अस्थिर
चरण: पाय
चरण: वैरण
चरण: चौथा भाग
चहा: पेय
चहा: वाहवा, शाबासकी
चाट: नुकसान
चाट: आश्चर्य
चंड: प्रखर
चंड: अवाढव्य
चाट: बडबड
चिकू: फळ
चिकू: कंजूष, कृपण
चिनी: कोचदार खिळा
चिनी: चीन या प्रदेशातील लोक
चिनी: मऊ साखर
चिमणी: पक्षी
चिमणी: गिरणीतले धुराडे
चिनचिनी: कटकट
चिनचिनी: रात्र
चिरा: घडलेला दगड
चिरा: कौमार्य
चीत: पाठीवर पाडलेला
चीत: गोष्ट
चिर: भेग, फट
चिर: वस्त्र, कपडा
चिरी: कुंकवाची चिरी
चिरी: भेग
चुणी: लहान माणिक
चुणी: भरडलेले धान्य
चुनडी: बुटीदार वस्त्र
चुनडी: रत्नविशेष
चुबका: बुजका
चुबका: जमाव, गर्दी
चूक: दोष, अपराध
चूक: लहान खिळा
चूण: चूर्ण, कोंडा
चूण: वळी, घडी, निरी
चूर: गर्क, मग्न
चूर: भुगा, चुरा
चेपारा: गर्दी
चेपारा: दाब
चौक: चार रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण
चौक: चांगला घोडा
छ
छत: आधार
छत : घराचे छप्पर
छंद: नाद
छंद: वृत्त, काव्यातील एक प्रकार मुक्तछंद
छापा: नाण्याची एक बाजू
छापा: अचानक हल्ला
ज
जमदग्नी: एका ऋषीचे नाव
जमदग्नी: संताप, क्रोध
जंग: लढाई, युद्ध
जंग: गंज
जंगम: चलनवलन करणारे
जंगम: लिंगायत धर्माचा उपाध्याय
जंतर: तार काढण्याचे सोनाराचे यंत्र
जंतर: वद्य, वादन
जय: विजय, यश
जय: नाव
जर: ताप
जर: संकेतबोधक अव्यय
जर: सोन्याचांदीची बारीक तार
जरा: म्हातारपण, वार्धक्य
जरा: किंचित, थोडे
जव: सातू
जव: गती, वेग
जांब: पाणी पिण्याचे भांडे
जांब: कच्चा काजू
जाया: भार्या, पत्नी
जाया: नादुरूस्त, निरूपयोगी
जार: प्रियकर
जार: गर्भवेष्टन
जार: गांजलेला
जाळ: राग, संताप
जाळ: मळ, घाण
जाळी: दोरी, जाळे
जाळे: काटेरी झाडांचा समूह
जीवन: पाणी
जीवन: आयुष्य
जुवा: फासा
जुवा: सांधा, जोड
जोते: घडीव दगडांचा बांधलेला कट्टा
जोते: पट्टा
जोड: पादत्राणाचा जोड
जोड : : सांधणे
झ
झाक: चमक, चकाकी
झाक: झापड, मोहिनी
झारी: तोटी असलेले पाणी पिण्याचे भांडे
झारी: सोन्याचे कण शुद्ध करणारा कारागीर
झिगझिग: कटकट, त्रास
झिगझिग: तेज
ट
टका: पैसा
टका: निशाण, ध्वज
टका: कोंब, अंकुर
टका: अग्रभाग
टंक: छिन्नी
टंक: छाप, टाइप
टप: पाण्याच्या थेंबाचा आवाज
टप: तंबूचे आच्छादन
टपका: पाण्याचा थेंब
टपका: दोष, चूक
टाकी: पाण्याचा हौद
टाकी: घाव
टापर: दोष, गुन्हा
टापर: डोक्यावर बांधण्याचे फडके
टाळू: डोक्याचा वरील भाग
टाळू: तोंडाच्या आतील वरील भाग
टाळे: कुलूप
टाळे: पोटमाळा
टीप: शिवण
टीप: नेम
टीप: थेंब, अश्रू
टुकळा: झुरणी
टुकळा: छंद, नाद
ठ
ठाण: गर्व, ताठा
ठाण: कापडाचा गठ्ठा
ठाण: ठिकाण
ठीक: उचित, योग्य
ठीक: मोत्यांचा झुपका
ठेवा: संचय
ठेवा: आकार
ड
डगर: तुटलेला कडा
डगर: प्रसिद्धी
डाक: जोड
डाक: अंत्यविधी
डाक: टपाल, पोस्ट
डांग: सुरतजवळचा डोंगराळ प्रदेश
डांग: लांब काठी
डाव: डंख
डाव: पाळी, क्रम
डाव: लाकडाची पळी
डाव: खेळ
डोणी: द्रोण
डोणी: लहान तारू
डोंब: जातिविशेष
डोंब: वणवा
डोस: उपदेश
डोस: औषधाचा डोस
ढ
ढाळ: जुलाब
ढाळ : स्नान
ढाळ: पद्धत, प्रकार
ढोर: स्नान
ढोर: बैल, गुरे
ढोर: एका जातीचे नाव
त
तगारी: वनस्पतीविशेष
तगारी: थाळी, ताट
तरणि: सूर्य
तरणि: नौका
तट: किनारा
तट: पक्ष
तड: तडतड
तड: शेवट, अखेर
तनू: शरीर, देह
तनू: थोडे, अल्प
तंतू: अंकुर
तंतू: दोरा
तर: होडी, मचवा
तर: नंतर, तथापि
तरट: आसूड
तरट: गोणपाट
तरस: वन्य हिंस्त्र प्राणी
तरस: भीती
तव: तोपर्यंत
तव: आवेश
तव: घेरी
तळ: छावणी, मुक्कामी
तळ: बूड
ताट: घाट, ज्वारी-बाजरी यांचे कांडे
ताट: पात्र
ताटी: बिछाना
ताटी: आवरण
तालेवारी: श्रीमंत
तालेवारी: उत्कर्ष
तान: सूर
तान: तहान
ताफा: तरंगणारे लाकूड
ताफा: समुदाय, संच
ताटवा: फुलांचा वाफा
ताटवा: तक्ता
ताल: वृक्षविशेष
ताल: ठेका, सूर
ताल: जमिनीचा बांध
तिलक: श्रेष्ठ
तिलक: टिळा
ताप: ज्वर
ताप: त्रागा
तारोळा: अडथळा
तारोळा: तोटा
तेजी: भरभराट
तेजी: घोडा
तोडा: हातात किंवा पायात घालावयाचा दागिना
तोडा: सुतळीचा तुकडा
तोडा: नाणे भरलेली पिशवी
तंत्री: वीणा
तंत्री: तार
थ
थड: समूह
थड: किनारा
थाव: बळ
थाव: थांग
थाटी: टोळी
थाटी: वाटी
थित: मूळ असलेले
थित: हलका
थेर: बदल
थेर: खप्पड
द
दंड: शिक्षा
दंड: युद्ध
दंड: काठी
दंड: नमस्कार
दंड: दोन तुकडे जोडण्याकरिता घातलेली शिवण
दर: किंमत
दर: हरएक
दर: भय
दर्वान: फिरता व्यापारी
दर्वान: द्वाररक्षक
दल: पाकळी
दल: सैन्य, फौज
दशमी: दूध घालून केलेली भाकरी
दशमी: दहावी तिथी
दस्तूर: जकात
दफेरफे: सफाई
दफेरफे: कर्जाची फेड
दस्तूर: पारशी आडनाव
दाणा: धान्याचा कण
दाणा: धूर्त, चतुर
दार: दरवाजा
दार: पत्नी
दार: स्वामित्वदर्शक फारसी प्रत्यय
दारू: स्फोटक द्रव्य
दारू: मद्य
दावण: घोळ
दावण: दावे
दिंडी: एक वृत्त
दिंडी: एक वाद्य
दिंडी: खिडकी, दार
दिंडी: भक्तांचा समूह
दिंडी: डोणी
दिव्य: दैवी, स्वर्गीय
दिव्य: कठीण परीक्षा
दीन: गरीब, दुबळा
दीन: धर्म (महंमदी शब्द)
दुवा: आशीर्वाद
दुवा: साखळीतील कडी
दोष: वैगुण्य
दोष: रात्र
ध
धडा: इंगा
धडा: नेमून दिलेला पाठ
धडा: एक वजन (दहा शेरांइतके)
धत्तूरा: फसवणूक
धत्तुरा: धोत्रा
धाड: संकट, सल्ला
धाड: नाश
धाय: टाहो, आकांत
धाय: दाई
धार: पात्याचे पाणी
धार: लहान प्रवाह
धारण: भाव, किंमत
धारण: धरणे
धिंग: दंगल
धिंग: खर्चीक, उधळ्या
धीर: गंभीर
धीर: सहनशीलता
धुरा: मर्यादा
धुरा: जोखड
न
नग: पर्वत
नग: वस्तू, भूषण
नजर: दृष्टी
नजर: वरिष्ठास भेट
नस: नाडी
नस: तपकीर
नाट: नाच, नृत्य
नाट: तोटा, नुकसान
नाट: स्थान
नाथ: वेसण
नाथ: मालक, धनी
नाद: आवाज
नाद: छंद, वेड
नाना: पुष्कळ
नाना: संबोधण्याचा एक शब्द
नार: बायको
नार: गाभा
नाळ: नाभिवलय
नाळ: कमळाचा देठ
नाळ : तोफ
नापिक
नापीक: न्हावी
नापीक: निसत्व जमीन
निका: चांगले, बरोबर
निका: मुसलमान धर्माप्रमाणे लग्न
निगुत: स्पष्ट, यथार्थ
निगुत: कुशलता
निधा: आहळी, आंच
निधा: भोवऱ्याचे आपल्याभोवती फिरणे
निशा: रात्र
निशा: कैफ आणणारा मद
निशा: खात्री, विश्वास
नीच: दुष्ट
नीच: सतत, नित्य
निज: स्वतःचे, आपले
नीज: झोप, निद्रा
नीट: दयाळू
नीट: सरळ, थेट
नीत: नेलेला
नीत: नीती
नीत: सततचा, नेहमीचा
नीस: सारांश, तात्पर्य
नीस: उसण, ताठर
नीस: दगड
नीस: लेखक
नुक्ता: गाणे, सुभाषित
नुक्ता: आळ, ठपका
नुक्ता: इतक्यात, आताच
प
पच्ची: फजिती
पच्ची: घट्ट
पंच: पाच
पंच: लवाद
पंचम: तंबाखू
पंचम: गायनातील एक स्वर
पट: पट्टा
पट: आवृत्ती
पठाण: उत्तरेकडील मुसलमानांची एक जात
पठाण : रुंद पाठ
पदळ: थवा, जमाव
पडळ : मोकळे आवार
पण: परंतु
पण: शर्त
पण: एक नाणे
पत्ता: शोध, माग
पत्ता: पत्यांचा डाव
पत्ता: हिरवे पान
पद: पाय, पाऊल
पद: श्लोक, काव्य
पदर: वस्त्राचा शेवट, टोक
पदर: ऋतुप्राप्ती
पर: सर्व
पर: पंख
पर: चाल, रीत
पर: परंतु
परिकर: रीत, पद्धत
परिकर: सुंदर
परी: अप्सरा
परी: प्रकार, जात
परीस: पेक्षा, अधिक
परीस: लोखंडाचे सोने करणारा दगड
पर्व: पुस्तकाचे प्रकरण, भाग
पर्व: पुण्यकर्माविषयीचा काल
पलिस्तर: गिलावा
पलिस्तर: कातड्यावर फोड आणणारे औषध
पल्ला: काठ
पल्ला: लांबी, विस्तार
पल्ला: तीस पायल्यांचे माप
पवित्र: शुद्ध
पवित्र: दर्भ
पसारा: व्यापारी, दुकानदार
पसारा: पसरलेली अवस्था
पक्ष: बाजू
पक्ष: पंधरवडा
पाउड: दक्षिणा
पाउड: पावडी
पाक: अर्क, काढा
पाक: स्वच्छ, शुद्ध, निर्मळ
पाखर: आसुरा
पाखर: पाण्याचा ओघ
पाट: कापडाचा पट्टा
पाठ: मागील बाजू
पाठ: पाठ्यपुस्तकातील एक गद्य-पद्य भाग
पाड: पूर्ण, पिकलेले
पाडा: खोंड
पाड: भाव, किंमत
पाडा: खोपट
पाडा: वस्ती, खेडेगाव
पाणी: धार
पाणी: उदक, जीवन
पात्र: भांडे
पात्र: रक्षा
पान: पर्ण
पान: पिणे
पाबळ: ओढा, नाला
पाबळ: पामर, दुर्बळ
पारा: रागाचा पारा
पारा: तापमानातील पारा
पायरी: जिन्याचा एक टप्पा
पायरी: दर्जा
पाल: प्राणीविशेष
पाल: दुकान
पासाव: पेक्षा, पासून
पासाव: आश्रय
पीक: पक्षीविशेष
पीक: धान्य
पीठ: चूर्ण
पीठ: आसन
पुडा: करंडक
पुडा: कागदाची गाठोडी
पुडी: चूर्ण
पुडी: संन्याशाचे भोजन
पुडी: कागदाची गाठ
पुण्य: चांगले
पुण्य: सत्याचरणाचे फळ
पुरा: पूर्वी
पुरा: पूर्ण
पुस्त: पिछाडी
पुस्त: पिढी
पुस्ती: पुरवणी, ठिगळ
पुस्ती: पाठबळ
पुस्ती: अक्षरांचा नमुना
पुत: पवित्र
पूत: मुलगा
पूर: नगर
पूर: पाण्याचा लोंढा
पूर्व: प्राचीन
पूर्व: दिशा
पेड: वळ, पदर
पेड: मैदान, पठार
पोत: मणी
पोत: तलम सूत
पोलो: गाल
पोलो: एक प्रकारचा खेळ
पोहा: भाजलेले भात
पोहा: थवा
पोळ: बोळ
पोळ: तट
पोळ: वळू
फ
फट : खाच
फट: वाईट शब्द
फरारी: बेपत्ता
फरारी: ओढ
फळ: परिणाम
फळ: फायदा
फळ: खाण्याची वस्तू
फासा: पकड, पाश
फासा: तुकडा
फाळ: नांगर
फाळ: चपटा
फुली: झुडूप
फुली: शिक्का
फोल: टरफल
फोल: निरर्थक
ब
बंद: झाकलेला
बंद: दोरा, नाडी
बंद: कागद
बंदी: अडथळा
बंदी: भाट
बळद: बैल
बळद: भुयार
बाज: भीती, दरारा
बाज: खाट
बाज: ससाणा
बांडगुळ: अडचण
बांडगुळ: झुडुपवजा अर्धजीवोपजीवी वनस्पती
बार: वेळ
बार: स्फोट
बार: हंगाम
बार: नोंद
बाव: डावा हात
बाव: विहीर
बावळा: दंड
बावळा: अव्यवस्थित
बिन: मुलगा
बिन: शिवाय, खेरीज
बूट: टूम
बूट: नक्षी
बूट: इंग्रजी पद्धतीचे पादत्राण
बूट: प्राणीविशेष
बेत: उन्माद
बेत: उद्देश, हेतू
बीभत्स: अभद्र
बीभत्स: नवरसांपैकी एक रस
भ
भग: वैभव
भग: भोक
भगीरथ: सगर कुळातील राजा
भगीरथ: मोठे कष्ट करून यश मिळवणे
भाट: कवी
भाट: पडीक जमीन
भाव: निष्ठा
भाव: किंमत, दर
भाव: अर्थ
म
मगर: सुसर
मगर: परंतु
मंजिरी: मोहर
मंजिरी: लहान टाळ
माबजत: मजबुती
माबजत: रक्षणाची जबाबदारी
मान: शरीराचा एक अवयव
मान: प्रतिष्ठा, सन्मान
मंडळ: समूह
मंडळ: वर्तुळ
मध: गोड रस
मध: मधील भाग
मलई: स्निग्ध पदार्थ
मलई: दांडगाई
मसाला: माल
मसाला: संड
मस्त: गर्विष्ठ
मस्त: पुष्कळ
माग: विणण्याचे यंत्र
माग: शोध, तपास
माडी: घरातील वरील मजल्याचा भाग
माडी: आई
माडी: माडाचा चीक
मात: बुद्धिबळातील एक डाव
मात: वार्ता, हकीकत
माया: अवसर
माया: दया
माया: जादू, चमत्कार
माया: पैसा
मार: आघात
मार: पुष्कळ
मासा: पाण्यातील प्राणी
मासा: एक परिमाण
मुंड: डोके
मुंड: ती (संख्या)
मूळ: झाडाचे मूळ
मूळ: आमंत्रण
मेतकूट: एकी, मेळ
मेतकूट: पीठ
मोट: कातड्याची मोठी पिशवी
मोट: मूठ
मोस: पत्रा
मोस: कपट
मोस: सूचक चिन्ह
मोहोर: फुलांचा गुच्छ
मोहोर: एक सोन्याचे नाणे
मंतरणे: मंत्राने मारणे
मंतरणे: वश करून घेणे
य
याद: मासा
याद: स्मरण, आठवण
युक्त: जोडलेला, सहित
युक्त: कल्पना
येवा: प्राप्ति
येवा: शोभा
र
रंग: वर्ण
रंग: सुख, मजा
राख: रक्षण
राख: अग्नी विझल्यानंतरची पांढरी भुकटी
राजी: ओळ
राजी: खूष
राड: भांडण
राड: चिखल
राग: क्रोध
राग: शास्त्रीय संगीतातील एक प्रकार
रास: ढीग
रास: तारकापुंज
रास: संख्यावाचक शब्द
राळ: धान्यविशेष
राळ: एक ज्वालाग्रही पदार्थ
रेवडी: फजिती
रेवडी: गोड पदार्थ
ल
लक्ष्य: ध्येय
लक्ष्य: ज्या वस्तूवर नेम धरायचा ती वस्तू
लाख: संख्याविशेष
लाख: चिवट पदार्थ
लाख: उत्तम
लाट: भले
लाट: पाण्याचा तरंग
लाट: मोठा सरदार
लोण: क्षार, मीठ
लोण: माती
व
वजन: माप, किलो
वजन: प्रतिष्ठा
वर: वरच्या बाजूस
वर: नवरा मुलगा
वरात: नवरानवरीची मिरवणूक
वरात: हुंडी
वर्ग: जातीव्यवस्थेचे वर्गीकरण
वर्ग: तुकडी
वर्ग: संघ
वळी: धोरण
वळी: ओळ, रांग
वर्ण: रंग
वर्ण: जात
वर्ण: अक्षर
वर्म: चिलखत
वर्म: शरीरातील नाजूक भाग
वही: कुंपण
वही: रोजनिशी, चोपडी
वाड: भव्य
वाड: वसतिस्थान
वाण: रंग
वान: कमतरता
वाण: ब्राह्मणास द्यावयाचे दान
वानी: वाचा
वाणी: कीटक
वाणी: दुकानदार
वानवा: शंका
वानवा: वर्णन
वानवा: अनिश्चितपणा
वानवा: कमतरता
वार: दिवस
वात: शरीरातील एक विकार
वात: कापसाची वात
वास: सुगंध
वास: सहवास
वार: समूह
वार: अर्भकावरील आवरण
वारी: यात्रा
वारी: साहाय्याने
वाव: परिमाण
वाव: वारा
वाव: व्यर्थ
वाव: लहान चौकोनी विहीर
वाळ
वाळ: शेपूट
वाळ: बहिष्कार
वाळा: केस
वाळा: हातापायातील दागिना
विभक्ती: प्रत्यय
विभक्ती: अलगपणा
विवसा: उद्योग
विवसा: इच्छा
विषय: कार्य
विषय: प्रदेश
विषय: अडचण
विषय: अभ्यासक्रमातील विषय
विसुरा: विचार
विसुरा: चमत्कार
वीण: शिवाय
वीण: विणणे
वीत: द्रव्य
वीत: एक मापन
वीळ: तिसरा प्रहर
वीळ: भरती
वैरण: पांघरण्याचे वस्त्र
वैरण: कडबा
वैजयंती: मुलीचे नाव
वैजयंती: विष्णूच्या गळ्यातील माळ
वैजयंती: पताका, ध्वजा
व्याज: मिष, कपट
व्याज: पैशाच्या वापरासाठी दिलेले भाडे
व्यास: एका ऋषीचे नाव
व्यास: भूमिती-रेषा विस्तार (वर्तुळाच्या एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत त्याच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा)
व्यास: व्यास पौर्णिमा
श
शक: कालगणना
शक: संशय
शिकस्त: पराकाष्ठा, कमाल
शिकस्त: दुर्दशा, हार
शिळा: दगड
शिळा: जुना
शीण: थकवा
शीण: वय, उमर
शीत: थंड
शीत: शिजलेल्या तांदळाचा एक दाणा
शुक्र: एक ग्रह
शुक्र: विशेषनाम
शेज: शय्या
शेज: क्रम
शेर: सिंह
शेर: एक माप
शेरा: टीका
शेरा: सरासरी
शेष: नागांची देवता
शेष: उरलेला बाकीचा अंश
श्वेत: पूल, सेतू
श्वेत: पांढरा स्वच्छ
स
सई: मैत्रीण
सई: कबुली
सई: आठवण
सई: व्यक्तिनाम
संगीन: जड, वजनदार
संगीन: बंदुकीच्या तोंडास लावलेले टोकाचे हत्यार
सण: तृणविशेष
सण: उत्सव
सण: वस्त्र
सण: ताग
सडा: पाणी शिंपडणे
सडा: एकटा, स्वतंत्र
सत्ता: हक्क, अधिकार
सत्ता: अस्तित्व
सदर: प्रकरण
सदर: मुख्य
सदी: शतक
सदी: नशीब, सुदैव
संधी: अवसर, मोक्याची वेळ
संधी: तडजोड, तह, समेट
संधी: व्याकरणातील एक प्रकार
सपिंड: पिण्डासहित
सपिंड: खडा
समान: पाच प्राणांपैकी एक प्राण
समान: सारखे
संपात: तडाखा, प्रहार
संपात: संयोग, संमिलन
संबळ: एक वाद्य
संबळ: पहार
संभ्रम: गोंधळ, गडबड
संभ्रम: गैरसमज
संमत : मान्य
संमत : बाजू
सर: बाण
सर: डोके
सर: आवाज, ध्वनी
सर: माळ, हार
सरद: थंड, गार
सरद: सीमा, मर्यादा
सरळ: थेट
सरळ: एक भूषण
सरा: मद्य
सरा: नदी
सराई: धर्मशाळा
सराई: हंगाम, सुगी
सरी: सारखा, समान
सरी: स्त्रियांचा दागिना
सर्ग: अध्याय
सर्ग: उत्पत्ती, सृष्टी
सल: शल्य, काटा
सल: दोरा, वादी
सल: पहारा, संरक्षण
सव: उत्तर दिशा
सव: रूची, चव
सवड: फुरसद
सवड: समक्ष
सवा: चतुर्थांश
सवा: बरोबर
सवा: प्रकार, पद्धती
सवा: बाजू, कड
सहज: भाऊ
सहज
सहज: सोपे
सही: स्वतःचे नाव
सही: मैत्रीण, सखी
सळ: गांजणूक, त्रास
सळ: आवेश, त्वेष
सळ: बाणाचे टोक
सळी: लोखंडाची काडी
सळी: कुचाळी, कुचेष्टा
सळी: हाव, ईर्षा
सपुरता: समर्थ
सपुरता: पूर्ण
साई: फायदा
साई: छाया, सावली
साईर: ओळ, रांग
साईर: झुंड, घोळका
साईर: वसुलीचा कर
सागळ: बकऱ्याचे कातडे
सागळ: पाण्याचे भांडे
सांज: संध्याकाळ
सांज: अंदाजलेले पीक
साटी: सट्टा
साटी: आश्रय
साटी: संगत
साण: सहाण
सान: होळीचा कोनाडा
सादर: आदरयुक्त
सादर: अद्भुत
साम: समेट
साम: ‘साम’ नावाचा वेद
समुद्र: शरीरावरील खूण
सामुद्र: दर्यावर्दी
साय: सावली, छाया
साय: सागवान
साय: दुधावरील पापुद्रा
सायर: जकात
सायर: सागर
सार: एक प्रकारचे कालवण, चिंच
सार: तात्पर्य, तथ्यांश
सार: अर्क, रस
सारंग: खलाशी, नावाडी
सारंग: मोर
सारंग: संगीतातील एक राग
सारा: सगळा, पूर्ण
सारा: पापुद्रा
सारा: जमिनीवरील कर
साल: वर्ष
साल: आवरण
साल: त्वचा
साव: चांगला
साव: सावकार
साव: नाडी
सुआर: आचारी
सुआर: वस्त्रे देणारा
सुकट: बारीक, काटवुळा
सुकट: सुकलेले झिंगे
सुत: मुलगा, पुत्र
सूत: धागा, दोरा, कापूस
सूत: संबंध
सुधा: अमृत
सुधा: चुना
सुधा: प्रामाणिक
सूत: सारथी
सूत: वस्त्रतंतू
सूर: आवाज, ध्वनी
सूर: मुख्य
सोपा : ओसरी
सोपा: सरळ
सोवानी: आसन
सोवाणी: गोड वाणी
सोहागा: सवागी सार
सोहागा: दैववान मनुष्य
सौर: त्रूर
सौर: सूर्याचे
स्नेह: तेल
स्नेह: मैत्री, प्रेम
स्वस्त: थोड्या किमतीला
स्वस्त: शांत
स्वस्तिक: शुभाशीर्वाद
स्वस्तिक: चिन्ह, धार्मिक प्रतीक
स्वार्थ: लाभ
स्वार्थ: व्याकरणातील अर्थ
ह
हवा: वायू
हवा: पाहिजे
हकीम: वैद्य
हकीम: अधिकार
हट्ट: रणांगण
हट्ट: हेका, आग्रह
हडप: पान, विडा
हडप: जामीन, तारण, पत
हल्या: रेडा
हल्या: निकृष्ट मनुष्य
हात: हस्त, बाहू
हात: डाव, खेळ
हार: पराभव, पराजय
हार: माळ, फुलांचा हार
हाल: दुःख, यातना
हीर: हल्ली, सध्या
हीर: ईर्ष्या
हेवा: माडाच्या झावळ्याची काडी
हेवा: मत्सर
हेवा: हव्यास
ज्ञ
ज्ञापन: चिन्ह
ज्ञापन: ज्ञान