200+ सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz general knowledge questions 

200+ सामान्य ज्ञान प्रश्न gk quiz general knowledge questions 

महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?

– अरबी समुद्र

आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?

-मोर

भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता ?

– तिरंगा

भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

– कमळ

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

-वाघ

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

-हॉकी

भारताचे राष्ट्रगीत कोणते ?

– जनगणमन

 भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?

– वंदे मातरम्

 फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?

– गुलाब

 फळांचा राजा कोणाला म्हणतात ?

-आंबा

प्राण्यांचा राजा कोणला म्हणतात ?

– सिंह

पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?

-गरूड

 तेलबियांचा राजा कोणाला म्हणतात ?

 – शेंगदाणा

महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?

-३६

महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता ?

-आंबा

महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता ?

– शेकरू

महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

– हरियाल

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते ?

– कळसूबाई

कळसूबाई शिखराची उंची किती आहे ?

– १६४६ मीटर

महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ? 

– गोदावरी

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

– इंदिरा गांधी

भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

– इंदिरा गांधी

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ?

– डॉ. राजेंद्र प्रसाद

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण ?

– पंडित जवाहरलाल नेहरू

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

– प्रतिभाताई पाटील

भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळविरांगणा कोण ?

– कल्पना चावला

राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रात किती आ-या आहेत ?

-२४

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या ?

-सावित्रीबाई फुले

सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर किती वेळेत पोहचतो ?

-८ मिनिटे २० सेकंद

महाराष्ट्रातील सर्वांत मोठी (लांब) नदी कोणती ?

-गोदावरी

चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ?

-डहाणू – घोलवड

भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली ?

-मुंबई

महाराष्ट्रातील सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे ?

-साल्हेर

केळीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?

-जळगाव

महाराष्ट्रात राज्यातील सर्वांत मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?

-कोयना

संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे ? -पैठण

भारतातील पहिली प्रवाशी रेल्वे कोठून कोठे धावली ?

-मुंबई – ठाणे

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

-मुंबई शहर

महाराष्ट्रात लढाऊ विमाने बनविण्याचा कारखाना कोठे आहे ?

-ओझर (नाशिक)

आधार (Aadhar) क्रमांकामध्ये किती अंक आहेत ?

-१२

बीजमाता’ या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते ?

-राहीबाई पोपरे

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव कोणते ?

-आंबवडे (दापोली- रत्नागिरी)

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला ?

-नायगाव (सातारा)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?

-महू (मध्यप्रदेश)

महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी सुरु केली ?

-महात्मा फुले

महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला ?

-साबरमती (गुजरात)

महात्मा गांधींनी आपल्या कार्याचा सुरूवात कोणत्या देशातून केली ?

-दक्षिण आफ्रिका

ताजमहाल हे कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

-यमुना

पणजी हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे ?

-गोवा

ताजमहाल कोणत्या राज्यात आहे ?

-उत्तरप्रदेश

सापूतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

-गुजरात

‘मसूरी’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

-उत्तराखंड

अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?

-गुजरात

जगातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ कोणते ?

— अटलांटा (अमेरिका)

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते ?

– शांघाय (चीन)

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता ?

— भारत

जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता ?

– व्हॅटिकन सिटी

जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?

— शहामृग

जगातील सर्वात लहान पक्षी कोणता ?

— हमिंगबर्ड

जगातील सर्वात उंच प्राणी कोणता ?

— जिराफ

जगातील जमिनिवरील सर्वात मोठा प्राणी कोणता ?

हत्ती

जगातील सर्वात मोठा जलचर प्राणी कोणता ?

— निळा देवमासा

भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?

– गंगा

भारतीय राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचे श्रेय कोणाला दिले जाते ?

— पिंगली वेंकय्या

|भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो ?

– केशरी

आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे ?

– निळा

भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा खालच्या बाजूस असतो ?

— हिरव्या

भारताच्या राष्ट्रध्वजाचे उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे ?

-2:3

भारताच्या राष्ट्रचिन्ह / राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून कारण्यात आले आहे ?

— सारनाथ

भारतीय राजमुद्रेवर कोणते प्राणी आहेत ?

— सिंह, घोडा, बेल.

भारतीय राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते वाक्य छापले आहे ?

— सत्यमेव जयते.

सारनाथ येथील स्तंभावर एकूण किती सिंह आहेत.

–४ (चार)

घटना समितीने’ जन-गण-मन’ या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता?

— २४ जानेवारी १९५०

‘जन गण मन’ हे भारतीय राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

— रविंद्रनाथ टागोर

‘वंदे मातरम्’ हे गीत कोणाच्या आनंदमठ या कांदबरीतून घेण्यात आले ?

– बंकिमचंद्र चटर्जी

भारतामध्ये मतदान करण्यासाठी कमीतकमी वयाची अट काय आहे ?

— १८ वर्षे

भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

— दिल्ली

विधानसभा सदस्यत्वाकरिता (आमदार) वयाची किमान पात्रता किती आहे ?

– २५ वर्षे

लोकसभा खासदार / सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे ?

– २५ वर्षे

सरपंच होण्यासाठी किमान वय किती पाहिजे ?

२१ वर्षे

भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळविरांगणा कोण ?

– कल्पना चावला

एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारा भारतीय पुरूष कोण ?

– शेरपा तेनसिंग नोके (१९५३)

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

– राजस्थान

लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?

– उत्तरप्रदेश

भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?

– धरचे वाळवंट

भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती ?

– जामा मशिद (दिल्ली)

भारतातील (पात्राने) सर्वात मोठी नदी कोणती ?

– ब्रम्हपूत्रा

भारतातील सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय कोणते ?

– इंडिया म्युझियम, कोलकाता

भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते ?

– गंगानगर (राजस्थान)

भारतातील सर्वात उंच धरण कोणते ?

– तिहरी (भागीरथी नदी, उत्तराखंड)

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?

– गोवा

लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?

– सिक्कीम

भारतातील सर्वप्रथम शंभर टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

– एर्नाकुलम (केरळ)

भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते ?

– आंध्र प्रदेश (१९५३)

भारतातील सर्वात पहिले १००% साक्षर राज्य कोणते ?

– केरळ

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण ?

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?

– मौसिनराम (मेघालय, भारत)

जगातील सर्वात उंच इमारत कोणती ?

– बुर्ज खलिफा, दुबई

जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणते ?

– गोरखपूर (उत्तरप्रदेश)

जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?

– सहारा वाळवंट

जगातील सर्वात उंच शिखर कोणते ?

– माऊंट एव्हरेस्ट

जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणती ?

– भारताची

जगातील सर्वात मोठा देश कोणता ?

– रशिया

जगातील सर्वात लांब धरण कोणते ?

– हिराकूड

जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

– नाईल

जगातील सर्वात मोठी / रुंद नदी कोणती ?

– अमेझॉन

जगातील सर्वात लांब भिंत कोणती ?

– चीनची भिंत

जगातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ कोणते ?

– अटलांटा (अमेरिका)

Leave a Comment