पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) सन 2022, 2023, 2024 व 2025 मधील शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरणेबाबत scolarship student bank account information
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
संदर्भ । या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2024/2917 दि. 10/07/2024. 2. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2024/4198 दि. 20/09/2024. 3. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2024/4658 दि. 25/10/2024.
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वो) सन 2022, 2023 व 2024 मध्ये शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याच्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गटशिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024 च्या लॉगीनमध्ये एकत्रितरीत्या बैंक खात्याची माहिती ऑनलाईन भरणेसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेलो होती.
तथापि सदर संधिचा फायदा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्याच्यर्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्याच्या अनुषंगाने प्रलंबित असलेली बँक खात्याची माहिती पूर्णतः भलेली नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित आहेत. सदर बाब खेदजनक आहे. तरी परीक्षेत स्पृहणीय यश संपादन करून शिष्यवृत्तीधारक ठरणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी / सदर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम विनाविलंब मिळावी यादृष्टीने परिषदस्तरावरुन संबंधित क्षेत्रिय अधिकारी व योजना कार्यालयास शिष्यवृत्ती परीक्षा 2025 च्या लॉगीनमध्ये सन 2022, 2023, 2024 व 2025 मधील विद्यार्थ्यांच्या बैंक खात्याची माहिती एकत्रितरीत्या भरण्यासाठी सुविधा उपलव्ध करुन देण्यात आली आहे.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
तरी सन 2022, 2023 व 2024 मधील शिष्यवृत्तीधाकर विद्यार्थ्यांपैकी बैंक खात्याची माहिती प्रलंबित असलेल्या तसेच सन 2025 मधील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बैंक खाते व अधार क्रमांकाची अचूक माहिती भरुन घेण्यासाठी जिल्हा / तालुकास्तरावर प्रथम प्राधान्याने कैम्पचे आयोजन करुन दि. 15 ऑगस्ट, 2025 पूर्वी सर्व माहिती जमा होईल याचे नियोजन आपल्या स्तरावरुन करण्यात यावे,
सन 2022, 2023 व 2024 मधील शिष्यवृत्तीधारक विद्याथ्यांचे बैंक खाते व आधार क्रमांकाची अचुक माहिती भरण्यासाठी अंतिम संधी देण्यात येत आहे. सदर मुदतीत माहिती न भरल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर निश्चित करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
तरी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकास्तरीय अधिकारी यांनी त्वरीत प्रथम प्राधान्याने सदर कॅम्पचे आयोजन करण्याबाबत आपल्यास्तरावरुन आवश्यक त्या सुचना देऊन तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या कॅम्प आयोजनाबाबतची माहिती या कार्यालयास दि. 20 जुलै, 2025 पूर्वी कळविण्याची दक्षता घ्यावी. सदर कंम्प आयोजनाचे गांभीर्य लक्षात घेऊन अंमलबजावणी करण्याबाबतच्या सक्त सूचना आपल्यास्तरावरुन निर्गमित कराव्यात. शिष्यवृत्तीधारक विद्याथी बैंक खाते अभावी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.