सन २०२५-२६ करिता कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेच्या नुतनीकरणाबाबत medical bill pratipurti shasan paripatrak 

सन २०२५-२६ करिता कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेच्या नुतनीकरणाबाबत medical bill pratipurti shasan paripatrak 

शासन निर्णय येथे पहा pdf download

प्रस्तावना-

उपरोक्त “वाचा” मधील अनुक्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये, कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी तसेच दि.३०.०६.२०११ नंतर सेवानिवृत्त झालेले शासकीय अधिकारी/कर्मचारी व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचेकरिता गटविमा तत्वावर आधारित वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना सन २०१४-१५ पासून लागू करण्यात आली आहे. उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक २ ते ११ येथील शासन निर्णयांन्वये सदर योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत दि.२५.०७.२०२५ ते दि.२४.०७.२०२६ या कालावधीसाठी सदर योजनेचे नुतनीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी यांचेकरिता सुरु असलेल्या वैद्यकिय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजनेचे दि.२५.०७.२०२५ ते दि.२४.०७.२०२६ या कालावधीसाठी नुतनीकरणास मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची राहणार नसून, स्वेच्छेने आवश्यक तो

वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी/कर्मचारी / निवृत्तीवेतन धारक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतील. तसेच या योजनेत केवळ दि.१ जुलै, २०२५ ते दि.३० जून, २०२६ या कालावधीत सेवानिवृत्त झालेले/होणारे अधिकारी/कर्मचारी आणि दि.१ जुलै, २०२५ ते दि.३० जून, २०२६ या कालावधीत सेवानिवृत्त झालेले/होणारे अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरतील. त्याचप्रमाणे योजनेमध्ये गतवर्षी समाविष्ट असलेले सर्व सदस्य स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन नुतनीकरण करण्यासाठी पात्र ठरतील. विमा हप्त्यासाठी वार्षिक हप्त्याचा एकमेव विकल्प आहे. (मासिक /त्रैमासिक / अर्धवार्षिक असे विकल्प उपलब्ध नाहीत.)

२. सन २०२४-२५ मध्ये सदर योजनेंतर्गत विमा कंपनीकडे एकूण विमा हप्ता रक्कम रू.१९.९१ कोटी जमा झाला आहे. तसेच दिनांक ३०.०६.२०२५ पर्यंत Incurred Claim Ratio ९२% इतका झाला आहे. अद्याप पॉलिसीची मुदत दिनांक २४.०७.२०२५ पर्यंत शिल्लक असल्याने उर्वरित कालावधीत उद्भवणाऱ्या दाव्यांची संभाव्य संख्या विचारात घेता, एकंदरीत Incurred Claim Ratio १००% पेक्षा जास्त होण्याची शक्यता विमा कंपनीने वर्तवली आहे.

शासन निर्णय येथे पहा pdf download

३. या पार्श्वभूमीवर, वयोगट ४६-५८ तसेच सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्याबाबतीत विमा हप्त्यांच्या दरांमध्ये बदल करण्यात येत असून सुधारित विमा हप्त्याचे दर खालील तक्ता “अ” व “ब” मध्ये दर्शविण्यात येत आहेत. जे अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे, त्यांना तक्ता “ब” मधील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी विमा हप्त्यांचे दर (GST सह) लागू राहतील.

तक्ता-(अ)

४६-५८ वर्षे वयोगटातील कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे वार्षिक दर (GST सह)

४. वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमाछत्र योजनेमध्ये सदस्य नोंदणी होण्याचे प्रमाण कमी होत असल्याने वर्ष २०२५-२६ मध्ये अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा, याकरिता कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांच्या करिता वयोगट १८-३५ वर्षे व वयोगट ३६-४५ वर्षे यांच्याकरिता विमा पॉलिसीमध्ये खालीलप्रमाणे नवीन बाबी समाविष्ट करण्यात येत आहेत. (परिशिष्ट-३ न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीचे युवा भारत पॉलिसी डॉक्युमेंट सोबत जोडले आहे.)

योजनेमध्ये समावशेनाचे वय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी १८ ते ४५ वर्षे आणि त्यांच्या अवलंबित अपत्यांसाठी ९१ दिवस ते २५ वर्षे.

कुटूंब १+३ (कर्मचारी, कर्मचाऱ्यांची पती पत्नी, २ अवलंबित मुले २५ वर्षे वयाच्या मर्यादेत).

विमाछत्र रक्कम रु.५ लाख, रु.१० लाख, रु.१५ लाख, रु.२५ लाख.

योजनेमध्ये समावेशनासाठी कोणतीही पूर्व वैद्यकीय चाचणी नाही.

योजनेच्या अटी व शर्तीनुसार वाजवी आणि वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक खालील खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.

५. १८-३५ व ३६-४५ वर्षे वय असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे (GST सह) दर खालील तक्ता “क” व “ड” मध्ये दर्शविण्यात येत आहेत.

शासन निर्णय येथे पहा pdf download

तक्ता-(क)

१८-३५ वर्षे वयोगटातील कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे वार्षिक दर (GST सह)

६. या योजनेतर्गत समाविष्ट होणाऱ्या अधिकारी/कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांना वैद्यकीय चाचणीची पूर्वअट राहणार नाही. तसेच या योजनेत समावेश करतेवेळी अस्तित्वात असलेल्या आजारांनाही विमाछत्र उपलब्ध असेल. (परिशिष्ट-२- न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीच्या पॉलिसी डॉक्युमेंटमधील अ.क्र.४.१ चे कृपया अवलोकन व्हावे.)

७. जे अधिकारी/कर्मचारी विमाछत्र योजना कालावधीमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत, परंतु सदर योजनेमध्ये समाविष्ट होऊ इच्छित नाहीत, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून सदर योजनेमध्ये भविष्यातही समाविष्ट न होण्याबाबतचे घोषणापत्र (Opting Out Declaration) परिशिष्ट-१ मधील विहीत नमून्यात घेण्याची दक्षता संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी. सदरचे घोषणापत्र सेवानिवृत्तीवेतन प्रकरणासोबत कोषागार कार्यालयास सादर करावे. अतः योजना कालावधीमध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळीच

सदर योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. तदनंतर त्यांना योजनेमध्ये सहभागी होता येणार

८. सदर योजनेमध्ये नव्याने समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना ९० दिवसांचा प्रतिक्षा कालावधी असेल, तसेच सोबत जोडलेल्या परिशिष्ट-२ मधील आजारांकरिता योजनेमध्ये नव्याने समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांना १८ महिन्यांचा प्रतिक्षा कालावधी असेल. तसेच सदर आजारांकरिता २०% Co pay लागू राहील.

९. योजनेमध्ये गतवर्षी समाविष्ट असलेल्या सदस्यांनी चालू वर्षी कोणत्याही परिस्थितीत ३० दिवसांच्या आत वार्षिक विमा हप्त्याचा भरणा करुन योजनेचे नुतनीकरण करणे, ही विमा धारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील. ३० दिवसांच्या मुदतीनंतर योजनेचे नुतनीकरण केल्यास असा सभासद योजनेमध्ये नव्याने समाविष्ट झाल्याचे समजले जाईल. (याकरिता आहरण व संवितरण अधिकारी अथवा कोषागार अधिकारी जबाबदार असणार नाहीत.)

१०. ज्या रुग्णालयांत दि न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि. यांचे PPN (Preferred Provider Network) आहे, तेथे रोकडरहीत (Cashless) सुविधा उपलब्ध असेल. PPN रुग्णालया व्यतिरिक्त अन्य रुग्णालयात उपचार घेतल्यास वैद्यकिय प्रतिपूर्ती उपलब्ध राहील. जेथे PPN रुग्णालय उपलब्ध आहेत, तेथे केवळ PPN पॅकेजेस प्रतिपूर्तीसाठी ग्राहय धरली जातील.

स्पष्टीकरण:-

अ) विमा धारकास कोणत्याही PPN रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची मुभा असेल, तथापि, प्रतिपूर्ती ही विमा कंपनीच्या PPN पॅकेजेसच्या दराप्रमाणे दिली जाईल. रुग्णालयाचे दर व PPN दर यातील फरक विमा धारकाने सोसावयाचा आहे.

ब) PPN बाहेरील रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचे स्वातंत्र्य विमा धारकास असेल, तथापि, अशा प्रकरणी विमा कंपनीच्या प्रचलित धोरणानुसार रुग्णालयाची अर्हता तपासून कंपनी दावा पारित करेल.

११. सदर शासन निर्णयाशी विसंगत नसतील, अशा मागील वर्षांच्या योजनेतील सर्व अटी व शर्ती सन २०२५-२६ साठीच्या योजनेकरिताही लागू राहतील.

१२. मागील वर्षी दाव्याच्या प्रतिपूर्तीचा लाभ घेतलेले जे सदस्य चालू वर्षी नुतनीकरण करणार नाहीत, त्यांना या योजनेत भविष्यात समाविष्ट होण्यास कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात येईल.

१३. विमा कंपनीच्या असे निर्देशनास आले आहे की, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विमा धारकाकडून त्याची माहिती त्रयस्थ प्रशासकास (TPA) विलंबाने दिली जाते. त्यामुळे दाव्याची सत्यता पडताळणी करण्यास अडचणी येतात. सबब, विमा धारकांनी प्रतिपूर्तीकरिता दावा सादर करतांना

दाव्याची सूचना त्रयस्थ प्रशासकास (TPA) रुग्णालयात दाखल झाल्याच्या दिनांकापासून ७२ तासांच्या आत न दिल्यास दाव्यावर १०% “Co Pay” लागु राहील.

१४. विमाधारकाने आंतररुग्ण कालावधी समाप्त झाल्यानंतर (Date of Discharge) ३० दिवसांच्या

आत विमा दावा विमा कंपनीस सादर करणे आवश्यक राहील. विमा दावा सादर करण्यास ३१ ते ५० दिवसांचा विलंब झाल्यास दाव्यावर २०% “Co Pay” लागू राहील. विमा दावा सादर करण्यास ५१ ते ७५ दिवसांचा विलंब झाल्यास दाव्यावर २५% “Co Pay” लागू राहील. विमा दावा सादर करण्यास ७६ ते १०० दिवसांचा विलंब झाल्यास दाव्यावर ३०% “Co Pay” लागू राहील व विमा दावा सादर करण्यास १०० दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास विमा दावा नाकारण्यात येईल.

१५. वयोगट ४५-५८ वर्षे तसेच निवृत्तीवेतनधारक अधिकारी / कर्मचारी यांचेबाबतीत विमाछत्र रक्कम रु.१० लाख ते रु.२० लाख मधील विमाधारकांना रुग्णालयातील वास्तव्य खर्च (Room Rent) यासाठी अधिकतम मर्यादा (Capping) खालीलप्रमाणे असतील.

१६. विमा पॉलिसीचे नुतनीकरण करताना, विमा हप्त्याचे प्रदान विमा कंपनीस https://easypay.axisbank.co.in/easyPay/makePayment?mid=NTg4MzQ%3D या लिंकद्वारे करणे बंधनकारक असणार आहे. सदर पेमेंट लिंकचा वापर करुन NEFT/RTGS/UPI अथवा Credit Card द्वारे विमा हप्त्याचे प्रदान करता येऊ शकते. मात्र सदर लिंकद्वारे Debit card द्वारे विमा हप्ता प्रदान करता येऊ शकणार नाही.

१७. विमाछत्र योजनेमध्ये नुतनीकरणासाठी उपरोक्त लिंक संबंधित विमाधारकास SMS द्वारे भ्रमण दूरध्वनीवर (Mobile Phone) अथवा ई-मेलद्वारे प्राप्त होणार आहे, अशा प्रकारची लिंक प्राप्त न झाल्यास The New India Assurance Co. Ltd. यांचेशी ९५०३०१९९६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

१८. नवीन नोंदणीसाठी योजनेमध्ये समाविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी खालील दिलेल्या गुगल फॉर्म वर अचूक माहिती विमा कंपनीस सादर करावयाची आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfbSX5g NHgnAWxOW hkl5kVarBC FOXgxM58Gr4sPkHAqb7pA/viewform?usp=dialog

१९. सर्व विवाहीत कर्मचाऱ्यांनी सदर योजनेमध्ये नवीन नोंदणी व नूतनीकरण करतांना १+३ या पर्यायाचा अवलंब करणे बंधनकारक आहे.

२०. विमाछत्र योजनेमधील वैद्यकीय दाव्यांसंदर्भात अथवा रोकडरहीत (Cashless) सुविधेबाबत कर्मचारी / अधिकारी/निवृत्तीवेतनधारक यांना काही शंका असल्यास MD India (IPA-त्रयस्थ प्रशासक) यांचेशी Toll Free No.१८००-२०९-७७७७ अथवा ९३७०५५०४४९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच विमा हप्ता भरण्यासंदर्भात काही शंका असल्यास The New India Assurance Co. Ltd. यांचेशी ९५०३०१९९६७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

२१. सदर योजनेच्या सविस्तर कार्यपध्दतीबाबत संचालक (लेखा व कोषागारे), मुंबई यांनी निर्गमित केलेल्या सूचना https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Circular & Order या पर्यायाखाली उपलब्ध असतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२५०७१८१५१०१३६४०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

शासन निर्णय येथे पहा pdf download

Leave a Comment