केंद्र शासनाव्दारे आयोजित आखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमासाठी दि.२९/०७/२०२५ रोजी वेळ: सकाळी ९.०० वाजता ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित राहणेबाबत akhil bhartiya shiksha samagam
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.२९ जुलै २०२५ रोजी नवी दिल्ली भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमादरम्यान माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्याव्दारे PM SHRI योजनेतंर्गत प्रत्येक जिल्हयातून एक उत्कृष्ट PM SHRI शाळा म्हणून नामांकित झालेल्या शाळा राष्ट्रास समर्पित केल्या जातील.
२ केंद्र शासनाने सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने सदर शाळांमध्ये शाळांच्या नावांचे फलक दर्शनी भागात लावण्याकरिता फलकाचा मजकूर आपणांस पाठविण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे शाळांमध्ये फलक व्दिभाषिक किंवा इंग्रजी भाषेत तयार करू शकता.
३ केंद्र शासनाव्दारे उपरोक्त कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात प्रत्यक्ष ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे दि.२८/०७/२०२५ रोजी वेळः दुपारी ३.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीत शाळांचे मुख्याध्यापक व जिल्हा नोडल अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
४ भारत मंडपम येथील अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमाचे दि.२९/०७/२०२५ रोजी वेळ: सकाळी ९.०० वाजतापासून थेट प्रसारण करण्यात येणार असून त्या कालावधीत सदर कार्यक्रम सामूहिकपणे समुदायास पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना पाहण्यासाठी एक मोठी स्क्रीन लावण्यात यावी. स्थानिक मान्यवरांची उपस्थित असल्याबाबतची खात्री करण्यात
यावी. यासाठी सदर कार्यक्रमाची युट्युब लिंक https://www.youtube.com/live/zjUe_vxdflc सोबत देण्यात येत आहे.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
५ प्रत्येक जिल्हयातून एक नामांकित झालेली PM SHRI शाळा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग लिंकद्वारे दि.२९/०७/२०२५ रोजी वेळ: सकाळी ९.०० वाजता कार्यक्रमात थेट सहभागी होतील. त्याबाबतची Live लिंक आपणांस लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. सदर कार्यक्रमादरम्यान सुलभ इंटरनेट सुविधा, शक्यतो डोंगल, लॅपटॉप, प्री-इंस्टॉल केलेले वेबएक्स किंवा सबंधित ब्राउझर, योग्य स्क्रीन आणि कॅमेरा सेटअप फलकासमोर असल्याची खात्री करावी. सदर कार्यक्रमाचे प्रसारण करण्यासाठी स्थानिक मीडिया/सोशल मीडियाचा वापर करावा. त्यासाठी खालील हॅशटॅग वापरावेः प्री-कॅम्पेनः #ABSS2025
TransformingEducation, Launch Day: #5YearsOfNEP2020A
उपरोक्त कार्यकम यशस्वी होणेबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात् य याव्यात.