सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी शाळांना दयावयाच्या सुट्टयांची यादी educational year holidays 

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी शाळांना दयावयाच्या सुट्टयांची यादी educational year holidays 

संदर्भ :- ठराव समिती सभा दि-०८/०७/२०२५ मधील विषय क्र. ठराव क्रं.

अन्वये

सातारा जिल्हयातील प्राथमिक मराठी माध्यमांच्या शाळांना सन २०२५-२६ मध्ये दयावयाच्या सुट्टया मंजूर केल्या आहेत. सदर सुट्टयांचे परिपत्रकाच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी यांना कळविण्यात येते की, सदरची यादी तुमच्या विकास गटातील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीकडे पाठविण्यात यावी.

प्राथमिक मराठी माध्यमांच्या शाळांना दयावयाच्या सुट्टयांची यादी सन २०२५-२६

सुचना :-

१) शालेय कामकाजाच्या दिवशी तसेच रविवार, सरकारी सुटटी व मा. जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या सुटटीच्या दिवशी ज्या महापुरूषांची जयंती/पुण्यतिथी/ राष्ट्रीय सण येत असेल त्या दिवशी सदर कार्यक्रम शाळेमध्ये यथोचित साजरा करावा. (वेळोवेळी शासनाचे निर्गमित आदेशाप्रमाणे)

२) स्थानिक सुटटी शाळा व्यवस्थापन समितीने मंजुरी दिल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी / प्रशासन अधिकारी यांची ७ दिवस अगोदर मंजूरी घ्यावी.

३) किरकोळ रजा जून २०२५ ते मे २०२६ अखेर राहतील.

४) शनिवारी सकाळी शाळा ९.०० ते १.२० या वेळेत राहील.

५) योग दिनानिमित्त दिनांक २१/०६/२०२५ रोजी शाळेची वेळ सकाळी ७.००ते ११.१५ राहील.

१) दिवाळी सुटटी १५ दिवस गुरुवार दि.१६/१०/२०२५ ते शनिवार दि. ०१/११/२०२५ अखेर

(रविवार वगळून)

२) उन्हाळी सुटटी ३७ दिवस – शनिवार दि.०२/०५/२०२६ ते शनिवार दि.१३/०६/२०२६ अखेर

(रविवार वगळून)

३) इतर सुटया – २४ दिवस एकुण सुटया-७६ दिवस

खालील दिवशी सकाळी ९.०० ते १.२० या वेळेत शाळा घेउन सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन करावे.

१. उन्हाळी सुटटी असणा-या शाळांनी सोमवार दिनांक १६/०३/२०२६ पासून गुरुवार दि.३०/०४/२०२६ अखेर सकाळी ७.०० ते ११.१५ या वेळेत शाळा घेण्यात यावी.

२. पावसाळी सुटटी असणा-या शाळांनी शनिवार दिनांक ०२/०५/२०२६ पासून शनिवार दि.१३/०६/२०२६ अखेर सकाळी ७.०० ते ११.१५ या वेळेत शाळा घेण्यात यावी.

पावसाळी सुटटी

सोमवार दिनांक २९/०६/२०२६ ते शनिवार दि. ११/०८/२०२६अखेर (३८ दिवस) पावसाळी सुटटी राहील. (रविवार वगळून)

पावसाळी सुट्टी असणा-या शाळांना गुरुवार दिनांक २७/०५/२०२६ बकरी ईद सुट्टी राहील.

दि.१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून निकाल जाहीर करावा.

Leave a Comment