महत्त्वाचे वाक्यप्रचार त्याच्या अर्थासहित important vakyaprachar artha
खळगी भरणे – पोट भरणे
खंड पडणे – काम मधेच थांबणे
खंत वाटणे – खेद वाटणे
खजील होणे – केलेल्या चुकीची लाज वाटणे शरम वाटणे
खडे चारणे – पराभव करणे
खडे फोडणे – दुसऱ्याला दोष देत राहणे
खाजवून खरूज काढणे – भांडण उकरून काढणे
खालावत जाणे – कमी होत जाणे
खो घालणे – एखाद्या कामात विघ्न आणणे
खोड मोडणे – अद्दल घडवणे
गणती होणे – मोजणी करणे
गराडा पडणे – घेराव पडणे
गहिवरून जाणे – मनातून गलबलून जाणे
गर्क असणे – गुंतून राहणे
‘ग’ची बाधा होणे – गर्व होणे
गट्टी जमणे – मैत्री होणे
गंध नसणे – अजिबात ज्ञान नसणे
गौरव करणे – सन्मान करणे
गुजराण करणे – पोट भरणे
घाम जिरवणे – खूप कष्ट करणे
घास मोडणे – जेवणे
घोकंपट्टी करणे – पाठांतर करणे
घर चालणे – कुटुंबाचा निर्वाह होणे
घर डोक्यावर घेणे – खूप गोंगाट करणे
घरोबा असणे – जिव्हाळ्याचे संबंध असणे
चाहूल घेणे – अंदाज घेणे
चिटपाखरू नसणे – निरव शांतता असणे
चक्र फिरणे – त्वरित परिस्थिती बदलणे
चंग बांधणे – निश्चय करणे
चाल करून येणे – हल्ला करणे
चीज होणे – घेतलेली मेहनत सफल होणे
चुळबूळ करणे – अस्वस्थ होऊन हालचाल करणे
जंग जंग पछाडणे – कसून शोध घेणे
जळून खाक होणे – पूर्ण जळणे