100 मराठी अलंकारिक शब्द pdf स्वरूपात उपलब्ध marathi alankarik shabda
1. कळीचा नारद – कळ लावणारा
2. कुंभकर्ण – अतिशय झोपाळू
3. काडीपहिलवान – हडकुळा
4. कोल्हेकुई – क्षुद्र लोकांची बडबड
5. कुपमंडूक – संकुचित वृत्तीचा
6. खडाष्टक जोरदार भांडण
7. खडाजंगी – मोठे भांडण
8. खेटराची पूजा – अपशब्दाने खरडपट्टी काढणे
9. खुशालचेंडू – चैनीखोर माणूस
10. गंगा-यमुना अश्रू
11. गर्भश्रीमंत – जन्मापासून श्रीमंत
12. गाजरपारखी – कसलीही पारख
13. अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस
14. अष्टपैलू – सर्वगुणसंपन्न
15. अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस
16. अरण्यरुदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
17. अक्षरशत्रू – निरक्षर, अडाणी
18. अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारे
19. अकलेचा कांदा – मूर्ख
20. उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा
21. ओनामा – सुरुवात, प्रारंभ
22. उंबराचे फूल – दुर्मिळ वस्तू
23. कर्णाचा अवतार – उदार मनुष्य
24. कळसूत्री बाहुले – दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
बिनभाड्याचे घर – तुरुंग
25. बृहस्पती – बुद्धिमान
26. बोलाचीच कढी केवळ शाब्दिक वचने
27. भाकडकथा – बाष्कळ गोष्टी
28. भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न
29. मंथरा – दुष्ट स्त्री
30. भीष्मप्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा
31. मारूतीचे शेपूट – लांबत जाणारे काम
32. मायेचा पूत – पराक्रमी मनुष्य, मायळू
33. मेषपात्र – बावळट
34. मृगजळ – केवळ आभास
35. लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री
36. रामबाण औषध – अचूक गुणकारी
37. वाटाण्याच्या अक्षता नकार
38. लंबकर्ण – बेअकली
39. वाहती गंगा – आलेली संधी
40. वामनमूर्ती – ठेंगू किंवा बुटका माणूस
41. शेंदाड शिपाई – भित्रा
42. शकुनीमामा – कपटी मनुष्य
43. सव्यसाची – उलटसुलट कामकरणारा
44. सांबाचा अवतार अत्यंत भोळा माणूस
45. गाजरपारखी – कसलीही पारख नसलेला, मूर्ख
46. गंडांतर – भीतिदायक संकट
47. गुळाचा गणपती – मंद बुद्धीचा
48. गुरुकिल्ली – मर्म, रहस्य
49. घरकोंबडा – घराबाहेर न पडणारा
50. गोगलगाय – गरीब निरुपद्रवी मनुष्य
51. चर्पटपंजरी- निरर्थक बडबड
52. घोरपड चिकाटी धरणारा
53. छत्तीसचा आकडा – शत्रुत्व
54. चौदावे रत्न – मार
55. टोळभैरव – कामात नासाडी करणारे लोक
56. जमदग्नीचा अवतार – रागीट
57. त्रिशंकू – धड ना इकडे, धड ना तिकडे
58. ताटाखालचे मांजर – दुसऱ्याच्य तंत्राने वागणारा
59. दळुबाई – भेकड मनुष्य
60. दगडावरची रेघ कधीही न बदलणारे
61. धोपट मार्ग – सरळ, नेहमीचा मार्ग
62. देवमाणूस – चांगला सज्जन माणूस
63. नंदीबैल – हो ला हो म्हणणारा
64. नवकोट नारायण – खूप श्रीमंत
65. पाताळयंत्री कारस्थान करणारा
66. पर्वणी – अतिशय दुर्मिळ योग
67. पिकले पान – म्हातारा
68. पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू
69. पोपटपंची अर्थ न कळता पाठांतर करणारा
70. बोकेसंन्यासी – ढोंगी मनुष्य