महत्त्वाचे मराठी वाक्यप्रचार व त्याचे अर्थ marathi vakyaprachar artha
नाक खुपसणे – नको त्या गोष्टीत उगाचच सहभाग होणे
नाक घासणे – माफी मागणे
नाक दाबणे – बोलायला प्रवृत्त करणे
नाक मुरडणे – नापसंती दाखवणे
नाकाने कांदे सोलणे – आगाऊपणा शहाणपणा दाखवणे
नजर चुकवणे – न दिसेल अशी हालचाल करणे
नवल वाटणे – आश्चर्य वाटणे
नाक उडवणे – उपहास करणे
नाक कापणे – घोर अपमान करणे
नाकी नऊ येणे – फार धकधक होणे
पाय काढणे – प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे
पाय घसरणे – तोल जाणे
पाय धरणे – माफी मागणे
पाय मोकळे करणे – फिरायला जाणे
पाठ थोपटणे – कौतुक करणे
पाठ दाखवणे – समोरून पळून जाणे
पाठ पुरवणे – सारखे मागे लागने
पाठबळ असणे – आधार असणे
पाठीला पोट लागणे – उपाशी राहिल्याने हडकुळा होणे
पायबंद घालणे – पाळा घालणे
(स्वतःच्या) पायावर उभे राहणे – स्वावलंबी होणे
(हसून हसून) पोट दुखणे – खूप हसणे
पोटात आग पडणे – खूप भूक लागणे
पोटात कावळे कोकलणे – खूप भूक लागणे
पोटात ठेवणे – काही उघड न करणे
पोटात शिरणे – मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे
पोटाला चिमटा घेणे – अत्यंत काटकसरीने राहणे
पोटावर पाय देणे – रोजंदारी बंद करणे
पोटाशी धरणे – माया करणे
प्राणापेक्षा जपणे – स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे
बोटावर नाचवणे – पूर्ण ताब्यात ठेवणे
मनात अढी धरणे – एखाद्या विषयी मनात राग ठेवणे
मांडीवर घेणे – दत्तक घेणे
मुठीत असणे – ताब्यात असणे