शालेय परिपाठासाठी समूहगीते shaley paripath samuhgeet 

शालेय परिपाठासाठी समूहगीते shaley paripath samuhgeet 

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा (समूहगीत)

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा …

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

____________________________________

बलसागर भारत होवो (समूहगीत)

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ॥

हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो ॥१॥

वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो ॥२॥

हातात हात घालून हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो ॥३॥

करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो ॥४॥

या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो ॥५॥

ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो ॥६॥

____________________________________

हा देश माझा याचे, भान जरासे राहू दया रे (समूहगीत)

हा देश माझा याचे, भान जरासे राहू दया रे हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता या मरण दयावया, स्फुरण आपल्या बाहू पावू दया रे हा देश माझा याचे, भान जरासे राहू दया रे जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहीसा अर्थही येवू दया रे हा देश माझा याचे, भान जरासे राहू दया रे

जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती परी अभंग असुद्या, सदैव आपुली माणुसकीची नाती दया सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी संदेश रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊया रे हा देश माझा याचे, भान जरासे राहू दया रे

– सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)

____________________________________

WE SHALL OVERCOME, (समूहगीत)

We shall overcome, We shall overcome, We shall overcome, some day.

Oh, deep in my heart, I do believe We shall overcome, some day.

We’ll walk hand in hand, We’ll walk hand in hand, We’ll walk hand in hand, some day.

Oh, deep in my heart, I do believe We shall overcome, some day.

We shall live in peace, We shall live in peace, We shall live in peace, some day.

Oh, deep in my heart, I do believe We shall overcome, some day.

We are not afraid, We are not afraid, We are not afraid, TODAY

Oh, deep…

____________________________________

तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो। (समूहगीत)

तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो। तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो

तुम्ही हो साथी तुम्ही सहारे, कोई ना अपने सिवा तुम्हारे । तुम्ही हो साथी तुम्ही सहारे, कोई ना अपने सिवा तुम्हारे। तुम्ही हो नईया, तुम्ही खिवईया, तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो। तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो

जो खिल सके ना वो फूल हम हैं,तुम्हारे चरणों की धूल हम हैं। जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं दया की दृष्टि सदा ही रखना,

तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो। तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो। तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो।

____________________________________

अंजनीच्या सुता तुला (समूहगीत)

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण तळहातावर आला घेऊनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका तिथे रामनामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान

आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण

धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

Leave a Comment