इ.३री ते १०वी साठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा- २०२५ ठळक वैशिष्ट्ये shaley shikshan abhyaskram masuda
शासन निर्णय येथे पहा pdf download
अभ्यासक्रमाच्या मसुद्याची रचनाः सदर अभ्यासक्रम मसुदा राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२३ व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ यांचा आधार घेऊन तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२३ नुसार सांगितलेली अभ्यासक्रमाची ध्येये व अध्ययन क्षमतांचा महाराष्ट्राच्या संदर्भात बदल करून स्वीकार करण्यात आलेला आहे.
विषयः
१. मराठी
२. इंग्रजी
३. गणित
४. कलाशिक्षण
५. कार्यशिक्षण
६. व्यावसायिक शिक्षण
७. शारीरिक शिक्षण व निरामयता
८. आपल्या सभोचतांचे जग-१
९. विज्ञान
१०. आपल्या सभोवतालचे जग-२
११. इतिहास
१२. भूगोल
१३. नागरिकशास्त्र
१४. राज्यशास्त्र
१५. अर्थशास्त्र
१६. समाजातील व्यक्तो
१७. पर्यावरण शिक्षण
१९. वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण
१८. संरक्षणशास्त्र
१९. वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण
२०. समाजसेवा
स्तरनिहाय अध्ययन क्षमतावरून इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती तयार करण्यात आलेल्या आहेत. अध्ययन निष्पत्तींना अनुसरून, घटक / उपघटक, द्यावयाचे अध्ययन अनुभव, अध्ययन-अध्यापन साधने, मूल्यमापन निर्देश आणि पहिल्यांदाच अध्यापन तासिका सुद्धा प्रस्तावित केल्या आहेत.
शासन निर्णय येथे पहा pdf download
इयत्ता सहावी पासून व्यावसायिक शिक्षण या स्वतंत्र विषयाचा पाठ्यक्रम तयार केलेला आहे.
* आंतरसमवाय क्षेत्रेः अभ्यासक्रम तयार करत असताना भारतीय ज्ञानप्रणाली, मूल्ये आणि स्वभाववृत्ती, पर्यावरण विषयक अध्ययन आणि काळजी, शाळांमधील समावेशन, शाळांमध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशन, शाळेतील शैक्षणिक तंत्रज्ञान या आंतरसमवाय क्षेत्रांचा विविध विषयांमध्ये एकात्मिक स्वरूपात समावेश करण्यात आलेला आहे.
सद्यस्थितीतील इ.३री ते ५ वी साठी असणाऱ्या ‘परिसर अभ्यास (भाग-१ व भाग-२)’ विषयांऐवजी ‘आपल्या सभोवतालचे जग (TWAU) (भाग-१ व भाग-२)’ विषय लागू करण्यात येतील. भाग-१ मध्ये विज्ञान व भूगोल विषयातील आशयाचा समावेश असेल आणि भाग-२ मध्ये इतिहास व नागरिकशास्त्र विषयातील आशयाचा समावेश असेल. इ.४थी साठीचे विद्यमान पाठ्यपुस्तक (‘शिवछत्रपती’) आहे तसे चालू ठेवण्यात येईल. इ.३ री साठी जिल्हा, ४ थी साठी राज्य व इ.५वी साठी देश अशा पद्धतीने क्रमागत आशय समाविष्ट करण्यात आला आहे.
इयत्ता सहावी पासून इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांसाठी स्वतंत्र पाठ्यक्रम तयार करण्यात आलेले आहेत तसेच इयत्ता नववी पासून राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांसाठी स्वतंत्र पाठ्यक्रम तयार करण्यात आलेले आहेत
* आंतरविद्याशाखीय शिक्षणः इयत्ता नववी साठी समाजातील व्यक्ती व इयत्ता दहावीसाठी पर्यावरण शिक्षण विषयांचे पाठ्यक्रम प्रथमच स्वतंत्रपणे तयार करण्यात आलेले आहेत.
मराठी भाषेचा अभ्यासक्रम अंतिम झाल्यानंतर, मराठी भाषेचा आधार घेऊन अन्य प्रथम व द्वितीय स्तराचा भारतीय भाषांचा अभ्यासक्रम संबंधित भाषेच्या अनुषंगाने बदल करून तयार करण्यात येईल.
इयत्ता अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (NCERT) यांनी अंतिम केल्यानंतर त्या अभ्यासक्रमाच्या आधारे राज्य मंडळाच्या इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे (SCERT) मार्फत तयार करण्यात येईल.
* मराठी भाषा विद्यार्थ्यांना मातृभाषेतून आत्मविश्वासाने अभिव्यक्त होण्याची संधी, मौखिक भाषा विकासावर भर, त्यांच्यातील प्रतिभाशक्तीच्या अविष्काराला संधी, स्व-मत प्रकटीकरणाला संधी, उत्तम वाचक आणि संवादक होण्यासाठी मातृभाषेच्या उपयोजनेला संधी, उपयोजित मराठीवर भर, एकूणच श्रवण-भाषण-संभाषण-वाचन-लेखन या कौशल्यांच्या व विविध क्षमतांच्या विकासाचे वयानुरूप उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
English Language: This curriculum is grounded in the vision of making English a language of empowerment, not alienation. It recognizes the multilingual reality of Indian classrooms and leverages the richness of India’s linguistic landscape to help learners acquire English in a natural, integrated, and joyful manner. It views language as a means of expression, creativity, reflection, and social participation not just a subject to be mastered for the purpose of examination and career. The Curriculum therefore shifts focus from grammar-dominated instruction to functional, skill-based, and culturally rooted language acquisition, enabling learners to use English effectively in real-life situations.
गणित : विषयाच्या माध्यमातून मूलभूत संख्याज्ञान, गणितीय विचार, समस्या निराकरण, कल्पनाचित्रण, सादरीकरण, संप्रेषण, गणितीय प्रारूपे यासारख्या गणितीय कौशल्यांचा विकास, गणिताचे स्वयंसिद्ध व अनुभवात्मक स्वरूप समजून घेण्यावर भर, भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये गणित विषयाचे स्थान, भारतीय व इतर गणितज्ञाचे गणितक्षेत्रातील योगदान, गणितीय तर्क, संकल्पना आकलन व कौशल्य विकसनावर भर या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनानुभवाला गणित शिक्षणाची जोडणे हे गणित शिक्षणाचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे.
विज्ञानः अधिकाधिक प्रश्न विचारणे, निरीक्षण व परिकल्पना मांडणे, प्रयोग करणे, युक्तिवाद करणे, अंदाज बांधणे, माहितीचे विश्लेषण करणे या क्षमतांचा विकास विद्यार्थ्यामध्ये करणे, भारताचा वैज्ञानिक इतिहास आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांचे विज्ञानातील योगदान याची माहिती विद्यार्थ्यांना होणे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवा द्वारे वैज्ञानिक ज्ञान मिळवण्यास प्रवृत्त करणे हा प्रयत्न करण्यात आला आहे.
* इतिहास: प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास या विविध कालखंडातील घटनांचा तसेच जागतिक इतिहासातील घडामोडी, तत्कालीन शोध व तत्वप्रणाली तसेच मानवी सभ्यतेतील सातत्याने होणारे बदल, याबरोबरच त्याचा आधुनिक जीवनावर होणारा परिणाम, निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संवाद आणि त्याचा मानवी जीवनावरील परिणाम, सामाजिक, प्रादेशिक, सांस्कृतिक विविधता आणि त्यांच्या पद्धती बद्दल जागरूकता, विविध राजकीय सामाजिक आणि आर्थिक संस्थाबद्दल जागरूकता, त्यांची
उत्पत्ती, कार्यप्रणाली आणि त्यामुळे कालांतराने होणारे परिवर्तन इत्यादी बद्दल सुयोग्य मांडणी करण्यात आलेली आहे.
* भूगोल : विषयाच्या माध्यमातून सुरुवातीच्या इयत्तांमध्ये विद्यार्थ्यांच्या भौगोलिक संकल्पना स्पष्ट होण्यावर भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील, जिल्हास्तर, राज्यस्तर, देशस्तर व जागतिक स्तरावरील भूगोलातील संकल्पनांचा, घटनांचा परिचय आणि त्याचा मानवी जीवनाशी असलेला सहसंबंध यांचा परिचय करून देण्यात येणार आहे.
* नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र या विषयात आपल्या भारताचे संविधान, राज्यव्यवस्था, नागरी हक्क व जबाबदाऱ्या तसेच लोकशाही मूल्ये यांचा अभ्यास समाविष्ट आहे. संविधान हे भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा असून त्यात समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय यासारखी मूलभूत तत्वे अंतर्भूत आहेत. या तत्त्वांची विद्यार्थ्यांना माहिती देण्याबरोबरच त्यांची प्रत्यक्ष जीवनात अंमलबजावणी कशी करता येईल हे शिकवण्याचा या अभ्यासक्रमाचा हेतू आहे.
अर्थशास्त्र : विषयाच्या माध्यमातून वर्तमान अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये, मागणी, पुरवठा, अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची क्षेत्रे, भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल, भारतातील व इतर देशांमधील क्षेत्रनिहाय योगदानाची तुलनात्मक माहिती, भारतीय व्यापार, भारताची समृद्ध प्राचीन अर्थव्यवस्था या घटकांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेची विशिष्ट समज विकसित करणे हे ध्येय ठेवण्यात आलेले आहे.
कार्यशिक्षण: या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती, रचनात्मकता आणि समस्या सोडवण्याची, क्षमता विकसित करणे व त्याला भविष्यातील जीवनासाठी तयार करणे, नवनवीन कौशल्य आत्मसात करणे व पुढील व्यावसायिक कौशल्य विकासाची पायाभरणी होऊन पुढील शिक्षणात व्यावसायिक तंत्रे, क्षमता विकासासाठी विद्यार्थ्यांची मानसिक, भावनिक व सामाजिक तयारी करणे हे ध्येय ठेवण्यात आलेले आहे.
शासन निर्णय येथे पहा pdf download
व्यावसायिक शिक्षण: या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उत्पादक कामाचे मूलभूत पातळीवर तीन श्रेणीमध्ये विभाजन करण्यात आले आहे. सजीव आधारित कार्य, साहित्य व यंत्राद्वारे कार्य, मानवी सेवांमधील कार्य या तीन प्रकारातील कार्याचे अनुभव देण्यासाठी विविध प्रकारचे प्रकल्प देण्यात आलेले आहेत. यातील अनेक कृतीतून विद्यार्थी या तीन प्रकारच्या कार्य प्रकारातील व्यवसायिक क्षमता विकसित करतील. कृषी विषय घटक, कुक्कुटपालन, बागकाम, मेकेट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अन्नप्रक्रिया, लाकूड काम, सौंदर्य आणि निरामयता, पर्यटन यासारख्या रोजगार कौशल्याचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमातून संप्रेषण कौशल्य, स्व व्यवस्थापन कौशल्य, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य, उद्योजकता कौशल्य, हरित कौशल्य इ. प्राप्त करून समाजाचा सक्षम घटक म्हणून तयार होणार आहे.
* कृषि विषय घटकांचा विविध विषयाच्या माध्यमातून एकात्मिक स्वरुपात समावेश करण्यात आला आहे.
कला शिक्षण विषयाच्या माध्यमातून सादरीकरण कला, रंगमंच, संगीत, नृत्य, नाट्य, वादन या घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून प्रत्येक कलाप्रकार विकसित करण्यासाठी आवश्यक असलेले प्रगत साधनसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान, तंत्राचा व्यापक उपयोग करण्याचा विचार आणि शोधक व नावीन्यपूर्ण पैलूंचा आनंद घेण्याची संधी अभ्यासक्रमात दिली आहे. यातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती, निरीक्षण क्षमता, अभिव्यक्ती आणि सौंदर्यदृष्टी याचा विकास करण्यावर भर देण्यात आलेला आहे.
शारीरिक शिक्षण व निरामयता हा विषय फक्त क्रीडा किंवा शरीर विकासापुरता मर्यादित न राहता विद्याथ्यांचे एकूण आरोग्य विषयक दृष्टिकोन, जीवन कौशल्य, सकारात्मक जीवनशैली निर्माण करणारा व आधारभूत विषय म्हणून मांडण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सशक्त, जागरूक, मानसिक दृष्ट्या संतुलित आणि सामाजिक दृष्ट्या उत्तरदायी उत्पादक पिढी घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
समाजातील व्यक्ती हा विषय विद्याथ्यांना सामाजिक प्रश्नांचे अनेक अंगांनी विश्लेषण करण्यास प्रवृत्त करतो. हा विषय नैतिक तर्क, एक नागरिक म्हणून जबाबदारी, ऐतिहासिक भान, वर्तमान घडामोडींचे भान आणि भारतीय मूल्यांची जपणूक यांचा समतोल साधतो. हा विषय रचनात्मक विचार, चिकित्सक निरीक्षण आणि सक्रिय सहभाग या सर्व बाबींना चालना देणारा आहे. आणि यामुळेच विद्यार्थी भविष्यात सजग, उत्तरदायी आणि नैतिकतेने प्रेरित नागरिक म्हणून निश्चितच घडतील.
‘पर्यावरण शिक्षण’ जागतिक पातळीवर वाढत असलेल्या पर्यावरणीय समस्यांमुळे पर्यावरण रक्षण, संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होत आहे. हवामान बदल, प्रदूषण, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास व जैवविविधतेचा हास या समस्या मानवी जीवनावर थेट परिणाम घडवून आणत आहेत. या पार्श्वभूमीवर, पर्यावरण शिक्षण हा विषय केवळ अभ्यासक्रमाचा भाग न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक अनिवार्य घटक बनतो.
संरक्षणशास्त्र : भारताच्या राष्ट्ररक्षणाच्या परंपरा, आधुनिक सुरक्षा व्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेतील विविध घटकाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करणे हे संरक्षणशास्त्र विषयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
* समाजसेवा: हा विषय सामाजिक घडामोडी, अभिरुची, आत्मविश्वास आणि सामाजिक समस्या ओळखण्याची क्षमता निर्माण करण्याच्या अर्थाने दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सार्वजनिक जीवनाबद्दल आत्मीयता निर्माण होते. हा विषय विद्याथ्यांना निःस्वार्थ सामाजिक सेवा देण्याबरोबरच स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविण्याची योग्य संधी प्रदान करतो. विद्यार्थ्यांच्या तार्किक विचार क्षमतेबरोबरच कार्यकौशल्यांचा विकास याद्वारे होतो. हा विषय निरोगी सामाजिक वातावरण विकसित करण्यासाठी एक मौलिक साधन आहे.
वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण या अभ्यासक्रमाद्वारे विद्याथ्यांना वाहतूक सुरक्षिततेचे आणि नागरी संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगून त्यांना जबाबदार, सुरक्षित आणि सक्षम नागरिक बनण्यास मदत करणे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे. सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुजाण समाज घडविण्यास महत्त्वपूर्ण हातभार लागेल.
वरील इ.३ री ते १० वी साठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा २०२५ ची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आपल्याला सोबत प्रसिद्धी निवेदनमध्ये दिलेला QR कोड स्कॅन करून संपूर्ण मसुदा वाचून आपले महत्वपूर्ण अभिप्राय द्यावेत म्हणजे आपला अभ्यासक्रम आणखी दर्जेदार होण्यास मदत होईल. आपल्या महत्वपूर्ण सूचना, अभिप्रायांचे स्वागत आहे.
धन्यवाद