शुद्धलेखनाचे नियम मुद्देसूद स्पष्टीकरणासहित उदाहरणे shuddhalekhan niyam mudde
* अनुस्वार
१)स्पष्टोच्चारित अनुनासिकांबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदा. – गुलकंद, तंटा, निबंध, चिंच, आंबा.
संस्कृतातील जे शब्द मराठीत जसेच्या तसे आलेले आहेत. अशा तत्सम शब्दांच्या बाबतीत अनुनासिकांबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. उदा. गङ्गा, पण्डित, सन्त, चम्पक.
एकंदरीत ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो, त्या अक्षरावर एक बिंदू द्यावा. पर-सवर्ण म्हणजे व्यंजनांच्या पंचमवर्ण. जसे – ङ्, ञ, ण, न्, म् या पर-सवर्णांचा उपयोग अनुस्वाराऐवजी तत्सम शब्दांत आपण करू शकतो. तरीदेखील पर-सवर्णाचा वापर शक्यतो टाळावा.
२) य्, इ, ल्, व्, श्, स्, ह्, ज्ञ यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.
उदा. सिंह, संयम, संसार, संरक्षण, संवाद, संज्ञा या शब्दांचा आपण उच्चार केला तर – सिंव्ह, संय्यम, संव्सार, संरक्षण, संव्ज्ञा असा होतो. परंतु अनुस्वाराचा उच्चार पूर्ण व स्पष्ट केला की आपोआप ‘य्’, ‘व् ‘उच्चारले जातात. म्हणून ते न लिहिता केवळ अनुस्वार द्यावा.
३)नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
एकवचन – घरात, त्याचा, मुलास, त्यासाठी.
अनेकवचन- घरांत, त्यांचा, मुलांस, त्यांसाठी.
हा अनुस्वार आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही द्यावा.
उदा. आपणांस, तुम्हांस, वडिलांना, गुरुजींचे राष्ट्रपतींनी.
४) वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.
पूर्वी आपण जुन्या नियमांनुसार रूढी म्हणून, व्युत्पत्तीमुळे किंवा व्याकरणानुसार अनुस्वार देत होतो. ते आता देऊ नयेत.
उदा.
– रूढी म्हणून एकदां, कॅस, टोंक, कांही झोंप.
व्युत्पत्तीमुळे पांच, गांव, नांव, कीं, घोंट.
व्याकरणिक – केळें, तेव्हा, तिनें, वासरूं.
५)चालताना, येताना, जाताना, बोलताना, सांगताना अशा शब्दांतील ‘ता’ या अक्षरावर शीर्षबिंदू देऊ नये.
६) अनुस्वार दिल्यामुळे शब्दाच्या दोन अर्थामध्ये घोटाळा होण्याचा संभव असेल तर तो अनुस्वार पर सवर्णाने दाखवावा.
उदा.
देहांत (अनेक देहांत या अर्थाने),
देहान्त (मरण या अर्थाने)
शालांत शालान्त, वृत्तांत वृत्तान्त.
सुखांत – सुखान्त, कलांत कलान्त.
* हस्व-दीर्घ
७)मराठीतील तत्सम इकारान्त व उकारान्त शब्द दीर्घात लिहावेत.
उदा. कवी, मती, गती, गुरु, वायू, पशू, शिशू, संस्कृतात ही शब्द-हस्वान्त आहेत. पण मराठीत आपण त्यांचा उच्चार दीर्घ करतो, म्हणून ते दीर्घान्त लिहावे. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार, उकार दीर्घ लिहावा.
उदा. पाटी, विनंती, आई, दाढी, कडू, खेळू, चेंडू, जादू.
अपवाद – आणि, नि, परंतु, तथापि, यथामति अशी तत्सम अव्यये हस्वान्तच लिहावी.
तसेच सामाजिक शब्दांतही तत्सम हस्व इकारान्त व उकारान्त शब्द पूर्वपदी असाताना ऱ्हस्वान्तच लिहावे.
उदा.- कविमन, बुद्धिवैभव, गतिशील, लघुकथा, रविवार तसे पाहता, सुटे कवी, बुद्धी, गती, लघू, रवी हे शब्द दीर्घान्त असतात. पण ते मुळात संस्कृतात -हस्व आहेत. जेव्हा आपण त्यांचा उपयोग सामासिक व साधित शब्दांत करतो, तेव्हा ते मुळाप्रमाणे ऱ्हस्वांतच राहतात.
८) व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके, सुटे तत्सम ञ्हस्वान्त शब्द मात्र मराठीत दीर्घान्त लिहिले जातात.
उदा. – हरी, मनुस्मृती, कृषी, कुलगुरू, संधी, अन्योक्ती.
१)
सामासिक शब्दांत व साधित शब्दांत पहिले पद ई-कारान्त किंवा ऊ-कारान्त संस्कृत शब्द असेल तर ते मुळाप्रमाणे दीर्घान्त
लिहावे,
उदा. – पृथ्वीतल, वधूपरीक्षा, लक्ष्मीपुत्र, नदीतीर, भूगोल, श्रीधर, दासीजन, वधूवर,
१०) सामासिक किंवा पुनरुक्त शब्दांतील घटक शब्द स्वतंत्र मानून ते उच्चारानुसार न्हस्व किंवा दीर्घ लिहावे.
उदा. आईबाप, दूधदुभते, गडीमाणसे, विटीदांडू, भाजीभाकरी, दाढीमिशी.
११) विद्यार्थी, प्राणी, पक्षी, मंत्री, स्वामी असे शब्द समासात पहिल्या पदी आल्यास ऱ्हस्वान्त लिहावे.
उदा.- विद्यार्थिगृह, प्राणिसंग्रह, पक्षिगण, गुणिजन, मंत्रिमंडळ, स्वामिभक्त, शशिकांत, योगिराज.
१२) अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावे.
उदा. गरीब, वीट, सून, वसूल, फूल, पूर, कठीण, विहीर, दीर, नीट, बहीण, जमीन, मूल.
अपवाद – तत्सम शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे -हस्वच लिहावे.
जसे – गुण, युग, विष, अनिल, मंदिर, बुध, हिम, रसिक, नागरिक, सामजिक, प्रिय.
१३) मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग, जोडाक्षरे यांच्यापूर्वीचे इकार, उकार सामान्यतः हस्व असतात.
उदा. भिंग, सुंठ, खुंटी, विस्तव, निःपक्ष, दुःख, उंच, कुस्ती, चिंच, मुक्काम, शिस्त, पुण्य, कनिष्ठ.
१४) ईकारान्त व ऊकारान्त दीर्घ शब्दांती उपान्त्य इकार व उकार म्हस्व लिहावेत.
उदा. गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू, भूमिती.
अपवाद – हा नियम दीर्घोपान्त्य तत्सम शब्दांना लागू नाही.
जसे नीती, रीती, कीर्ती, प्रीती, दीप्ती.
१५) उपान्त्य दीर्घ ई, ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य इकार-उकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी -हस्व लिहावा.
उदा. गरीब गरिबांस, सून वकील वकिलांना, वीट विटांचे, मूल सुनेला, नागपूर नागपुरास, मुलाला, चुल- चुलीमध्ये.
अपवाद – दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.
जसे शरीर – शरीरास, गीता गीतेत, सूत्र सूत्रात, प्रथमेतील इकारान्त व उकारान्त शब्दांखेरीज सामान्यतः तत्सम शब्दांच्या मूळ रूपात बदल करू नये.
* इतर/किरकोळ
१६) ‘पूर’ हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा.
उदा. नागपूर, रायपूर, संबळपूर, कानपूर, तारापूर. परंतु सामान्यरूपाच्या वेळी ‘पूर’ मधील ‘पू’ -हस्व ‘पु’ होतो.
जसे – नागपुरास, रायपुरातून, कानपुरास.
१७) ‘कोणता’, ‘एखादा’ ही रुपे लिहावी. कोणचा, एकादा ही रूपे लिहू नयेत.
१८) हळूहळू, मुळूमुळू या शब्दांतील दुसरा व चौथा स्वर दीर्घ लिहावा.
आणखी उदा. – युट्युटू, तसूतसू, चुटुपुटु, कधीकधी, मधूनमधून, बारीकसारीक, दूरदूर अशा अभ्यस्त शब्दांतील घटकशब्द मूळ उच्चारानुसार
लिहावे.
पण हेच अभ्यस्त शब्द/ पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे -हस्व लिहावे.
जसे- रुणुझुणु, लुटुलुटु, दुङवुङ.
१९) एकारान्त शब्दांचे सामान्यरूप याकारान्त करावे.
उदा. फडके-फडक्यांना (शक्यतो ‘फडके यांना ‘असे लिहावे.)
करणे करण्यासाठी, पाहणे पाहण्याला, आमचे आमच्याकडे, त्यांचे – त्यांच्याशी.
२०) तत्सम रूढ व्यंजनान्त शब्द स्वरान्त लिहावे.
उदा. विद्वान, क्वचित, अकस्मात, विद्युत, अर्थात, कदाचित, पूर्वी या शब्दांना व्यंजनान्त लिहिले जायचे. म्हणजे शेवटच्या अक्षराचा पाय तोडला जायचा. आता तो तोडू नये. इंग्रजी शब्दांच्या बाबतीतही हाच नियम पाळावा.
उदा. जॉनसन, बायरन, कीट्स, एलएल. बी, एम. ए.
अपवाद – अन्.
२१) रहाणे, पहाणे, राहाणे, पाहाणे ही रुपे वापरू नयेत.
राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत.
आज्ञार्थी राहा, पाहा, वाहा याबरोबर रहा, पहा, वहा ही रूपे वापरण्यास हरकत नाही.
२२) ‘इत्यादी’ व ‘ही’ (अव्यय) हे शब्द दीर्घान्त लिहावे. ‘अन्’ हा शब्द व्यंजनान्त लिहावा.
‘ही’ नेहमी जोडूनच लिहावा. जसे तूही, मीही, तुम्हीही, कोणीही.
२३)लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्यावेळी तिचे स्वरुप बोलण्यातील उच्चारा-प्रमाणे असावे. अन्यप्रसंगी तसे लिहू नये.
उदा. ‘मला वाटतं, मी जायला हवं होतं.’
अशा ठिकाणी अकारान्त शब्द सानुस्वार लिहिले जातात. म्हणजेच एकारान्त शब्दाचा अकारान्त शब्द संवादात होतो. तेव्हा अन्त्यक्षरावर अनुस्वार येतो.
जसे वाटते वाटतं, हवे हवं, होते होतं.
२४)पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्वदीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.
२५)केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकर पूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावे. नंतरचे लेखन म. सा. महामंडळाच्या प्रस्तुत नियमांस अनुसरून छापावे.
२६) एकाक्षरी मराठी ईकार किंवा ऊकार दीर्घ लिहावे.
उदा. मी, ही, तू, ती, पी, पू, धू, जी.
२७) मराठी शब्दांतील अन्त्याक्षर दीर्घ स्वरान्त असले तर उपान्त्य
इकार व उकार हस्व असतो.
उदा. गुणी, किडा, सरिता, वकिली, पाहिजे, दिवा, तालुका, महिना, दिले, ठेविले, सुरी.
अपवाद – तत्सम शब्दांतील उपान्त्याक्षरे दीर्घ ईकारान्त व ऊकारान्त असतील तर ती मूळ संस्कृतातल्याप्रमाणे दीर्घच ठेवावी.
उदा. भीती, नीती, प्रीती, कीर्ती, पूर्व, पीडा, लीला, चूर्ण, पूर्ण, क्रीडा, परीक्षा.
२८) ‘न’ व ‘ण’, ‘श’ व ‘ष’, ‘ष्ट’ व ‘ष्ठ’ यांचा योग्य वापर करावा.
उदा.
न पान, मान, सून, जुने, मन, छान.
ण क्षण, ताण, मरण, प्राण, प्राणी, आणि
श- शाळा, शेव, विशद, काशी, विशेष.
ष विष, पुरुष, संतोष, विदूषक, विषाद.
ष्ट शिष्ट, नष्ट, समाविष्ट, कष्ट, विशिष्ट.
ष्ठ श्रेष्ठ, कनिष्ठ, प्रतिष्ठा, पृष्ठ, निष्ठा.
२९) काही तीन अक्षरी शब्दांतील पहिले अक्षर दीर्घ असेल व दुसरे /उपान्त्याक्षर ईकार किंवा ऊकारयुक्त असेल तर त्या जागी ‘आकार’ येतो. पहिले अक्षर हस्व असल्यास तो विकल्पाने होतो.
उदा. बेडूक बेडकाचा, उंदीर उंदराने, तारीख -तारखेला, शेपूट शेपटास, तांदूळ – तांदळात.
३०) उपान्त्याक्षर ‘ई’ किंवा ‘ऊ’ हा स्वर असेल तर सामान्यरुपात ‘ई’ बदल ‘य’ व ‘ऊ’ बदल ‘व’ लिहिले जाते.
उदा. देऊळ देवळात, पाऊस पावसात, कापूर -कापरास, फाईल फायलीत.
३९) तीन अक्षरी शब्दांत मधले अक्षर द्वित्त असेल तर (एकच अक्षर दोनदा येऊन जोडाक्षर झाले असल्यास) सामान्यरूपाच्या वेळी द्वित्व नाहीसे होते.
उदा. चप्पल चपलेचा, रक्कम रकमेचा, छप्पर -छपरावर, दुप्पट – दुपटीने, जिन्नस – जिनसाला.
३२) शब्दांच्या अंती ‘सा’ हे अक्षर असेल तर सामान्यरुपाच्या वेळी त्याचा ‘शा’ होतो.
उदा. – मासा – माशाचा, घसा घशात, पैसा पैशासाठी, आरसा – आरशात, कोळसा कोळशाची, कसा- कशासाठी, ससा-सशांचा, खिसा – खिशात.
३३) आकारान्त पुल्लिंगी शब्दाचे सामन्यरूप करताना शब्दाच्या शेवटी ‘जा’ हे अक्षर असेल तर त्यास ‘ज्या’ असे करता ‘जा’ असेच ठेवावे.
उदा. – राजा – राजाचा, दर्जा दर्जाला, मोजा – मोजात, फौजा – फौजांनी, दरवाजा दरवाजात.
३४) तीन अक्षरी शब्दात पहिले अक्षर सानुस्वार व दुसरे ‘म’ असेल तर सामान्यरूपाच्या वेळी पहिले अक्षर निरनुस्वार होते.
उदा. अमंल – अमलात, किंमत किमतीत, गंमत – गमंतीने, हिंमत – हिमतीचा, जंमत – जमतीने.
३५) धातूला ‘ऊ’ किंवा “ऊन’ प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी ‘व’ असेल तर ‘वू’ किंवा ‘वून’ होते.
उदा. गा गाऊ गाऊन, धाव धावू धावून, खा- खाऊ – खाऊन, ठेव ठेवू ठेवून, जेव जेव जेवून, दाखव दाखवू-दाखवून, पी पिऊ – पिऊन, धू धुऊन, जा जाऊन.
३६) जेव्हा नामांना ‘इक’ प्रत्यय लागून तत्सम विशेषणे तयार होतात, तेव्हा मूळ शब्दातील शेवटचा स्वर निघून जातो व त्या शब्दाच्या प्रारंभीच्या अक्षरातील स्वराची वृद्धी पुढीलप्रमाणे होते. अ आ ची वृध्दी आ, इ ई ची वृध्दी ऐ, उऊ ओ ची वृध्दी औ.
उदा. नगर – नागरिक, दिन दैनिक, भूगोल भौगोलिक, मास मासिक, उद्योग औद्योगिक, लोक लौकिक, वेद वैदिक, पुराण – पौराणिक.
अपवाद – परंतु ‘इक’ प्रत्यय युक्तार्थी असेल तर वृध्दी होत
नाही.
उदा. धन धनिक, श्रम श्रमिक, रस रसिक, सुवास – सुवासिक, क्रम – क्रमिक.
३७) वरील नियमाप्रमाणेच नामाला ‘य’ प्रत्यय लागताना व शब्दाला ‘त्य’ प्रत्यय लागताना पहिल्या स्वराची वृद्धी होते.
उदा. विशिष्ट वैशिष्ट्ये, कुशल कौशल्य, पवित्र-पावित्र्य, पश्चात – पाश्चात्त्य, दक्षिण दाक्षिणात्य, उचित औचित्य, निपुण – नैपुण्य, अतिथी – आतिथ्य.
३८) शब्दाच्या शेवटी ‘य’ आल्यास सामान्यरूपाच्या वेळी ‘बी’ ऐवजी ‘ई’ येतो. ‘य’ नंतर ‘ई’ आल्यास उच्चारात ‘य’ लोप पावतो. ईकारात स्त्रिलिंगी अनेकवचनी सामान्य रूपात ‘ई’
बदल ‘या’ येतो.
उदा. लढाई लढायांत, चढाई चढायांत, राई रायात, सुई – सुयांचा, बढाई बढायांनी, समई समयांचा, गाय गाईला.
३१) जोडशब्दाचे सामान्यरूप करताना काहीवेळा दोन्ही भागाचे सामान्यरूप होते. उदा. मुलाबाळांना, खेड्यापाड्यांची घराघरांतून,
लुळ्यापांगळ्यांना बायामाणसांनी.
४०) ऊकारात विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही.
उदा. – गणू – गणूस, रामू रामूला, बापू बापूस, शकू -शकूला, वासू – वासूचा.
४१) तत्सम नसलेल्या मराठी शब्दांना ‘ईक’ प्रत्यय लागून भाववाचक नामे किंवा धातुसाधित विशेषण तयार होतात. तेव्हा उतोन्त्याक्षर दीर्घ राहते.
उदा.- ठरावीक, आगळीक, पडीक, खर्चीक, जवळीक, सोयरीक, गि-हाईक, सोशीक, मोकळीक (तत्सम शब्दांसाठी नियम क्र. ३६ बघावा.)
४२) ‘इत’ हा संस्कृत प्रत्यय असून तो तत्सम शब्दांना लावताना उपान्त्याक्षर हस्व लिहावे.
उदा. – अपेक्षित, अगणित, अखंडित, इच्छित, चकित, त्वरित, प्रकाशित, मर्यादित, शिक्षित, सुधारित, सहित, विवाहित, संग्रहित.
४३) ‘ईत’ हा मराठी शब्दाला लागून येणारा प्रत्यय असून त्यामुळे विशेषणे तयार होतात. हा प्रत्यय जोडताना उपान्त्याक्षर दीर्घ राहते.
उदा. – कुरकुरीत, गुळगुळीत, चकचकीत, टवटवीत, बुडीत, तुळतुळीत, सराईत, सुटसुटीत, पटाईत, सुरळीत.
४४) ‘ईय’ (तसेच ‘कीय’ व ‘अनीय’) प्रत्यय लावताना
उपान्त्याक्षर दीर्घ राहते.
उदा. भारतीय, राष्ट्रीय, कुटुंबीय, शास्त्रीय, स्वर्गीय, पूजनीय, वर्णनीय, प्रेक्षणीय, स्मरणीय, शोचनीय, स्पृहणीय, शासकीय.
४५) जोडाक्षरे लिहिताना उच्चारानुसारच लिहावीत.
उदा. ब्रम्ह, ब्राम्हण, चिन्ह, हस्व, जिव्हा, स्पष्ट, सप्त, पर्याप्त (संस्कृतात ब्रम्ह, ब्राम्हण अशा शब्दांत ‘ह’ अगोदर येतो परंतु मराठीत वर्णविपर्यय होतो.)
अपवाद वह्या, हृदय.
४६) ‘मी जेवून राहिलो’, ‘पूजा करुन राहिलो’ अशी वाक्ये वापरू नयेत. त्याऐवजी ‘मी जेवतो आहे.’, ‘पूजा करतो आहे.’ असे लिहावे.