केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमासह शिक्षण संचालनालय (योजना) यांचे मार्फत राबविल्या जाणा-या शिष्यवृत्ती व शैक्षणिक सवलत योजनांची जनजागृती व सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये अंमलबजावणीसाठी जिल्हास्तर व तालुकास्तरावर बैठकी/कार्यशाळेचे आयोजन करणेबाबत ullas navbharat saksharta karyakram
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
संदर्भ: जा.क्र. शिर्सयो/नभासाका/व्हीसी आयोजन फेज-१/२०२५-२६/०१२१९ दिनांक: २४/०६/२०२५
उपरोक्त संदभौय विषयानुसार शिक्षण संचालनालय (योजना) यांचेमार्फत राबविल्या जाणा-या केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमासह शिष्यवृत्ती व शैक्षणिक सवलत योजनांची जनजागृती व अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावरुन ऑनलाईन बैठकांचे (VC) आयोजन करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही शाळांमध्ये योजनांची जनजागृती करण्यासाठी जिल्हयातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळा मुख्यध्यापकांची बैठक जिल्हास्तरावर आयोजित करावी व प्राथमिक शाळा मुख्यध्यापकांची बैठक तालुकास्तरावर आयोजित करावी. जिल्हास्तरावरील बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करावे. तसेच तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी मार्गदर्शन करावे. शाळा मुख्याध्यापकांनी देखील शाळास्तरावर शिक्षक व पालक यांची बैठक आयोजित करुन योजनांची जनजागृती व अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करावे. शाळास्तरावर बैठक घेणेबाबत लेखी सूचना जिल्हास्तरावरुन सर्व मुख्याध्यापकांना देण्यात याव्यात, राज्यस्तराबर घेण्यात आलेल्या बैठकीप्रमाणे सर्व योजना माहिती PPT व तासिका वेळापत्रकाप्रमाणे नियोजन करुन बैठकांचे आयोजन करावे. प्रत्येक स्तरावर घेण्यात आलेल्या बैठक/कार्यशाळेचे इतिवृत्त उपस्थितांच्या स्वाक्षरीसह ठेवावे. बैठक/कार्यशाळांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे,
बैठकीमध्ये खालील विषयांवर मार्गदर्शन करावे.
१. उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम उहिष्ट व नियोजन :-
१) सन २०२५-२६ साठी जिल्हानिहाय असाक्षर उद्दिष्ट संख्या
२) उल्लास अॅपवरील असाक्षर नोंदणी / स्वयंसेवक नोंदणी
३) उल्लास अॅपवरील असाक्षरांचे स्वयंसेवकासोबत टॅगींग
४) अध्ययन-अध्यापन वर्ग सुरु करणे
५) असाक्षरांची मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी ( FLNAT) सप्टेबर २०२५ पूर्वतयारी
६) निधी वितरण
७) वार्षिक नियोजन आराखडा
८) गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांचे NBSK साठी बँकेत खाते उघडणे.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
२. शिक्षण संचालनालय योजनाकडील शिष्यवृत्ती विषयक योजना :-
१) NSP पर्टिलवरील शिष्यवृत्ती राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMS), दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती योजना, अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना (प्री-मॅट्रिक स्कॉलरशिप)
२) इयत्ता ५ वी / इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती योजना माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्या ग्रामीण भागातील हुशा प्रज्ञावंत
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्या खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती पूर्व माध्यमिक शाळा, माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सहाय्य, माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्या महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने.
३) कनिष्ठ महाविद्यालयातील खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्टया मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती.
४) भाषा विकास संस्कृत शिक्षण माध्यमिक शाळांमध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती.
५) राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्ती.
६) मराठी भाषा फाऊंडेशन योजना.
४. शैक्षणिक सवलती विषयक योजना :-
१) राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
२) इयत्ता १ ली ते दहावीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण, इयत्ता १२ वी पर्यंत मुलीना मोफत शिक्षण,
व अ) जि.प. अभिकरण आकार, माजी सैनिकाच्या पाल्यांना शैक्षणिक सबलती अ) अभिकरण आकार. ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु १०००००/- पेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्यांना (मुलांना) फी माफी. अ) अभिकरण आकार.
३) अवर्षणग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/प्रतिपूर्ती
४) प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना विहित दराने अर्थसहाय्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विदयालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत विहित दराने अर्थसहाय,
५) दिनांक २६ ते २९ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, गृहरक्षक दल व इतर राज्य शासनाच्या कर्मचा-यांच्या कुटुंबियाना विशेष मदत देणेबाबत व इतर सवलतीबाबत/मोफत शिक्षणाची सवलत देणेबाबत.
६) नक्षलविरोधी कारवाईत/नक्षलवादी हल्ल्यात मृत वा जखमी झालेल्या पोलीस अधिकारी/कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांना विशेष मदत व इतर सवलती बाबत.
मा.पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांनी घोषित केलेले विशेष पॅकेज. विदर्भातील शेतक-याच्या आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांतर्गत द्यावयाच्या शैक्षणिक सघलती. (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम व वर्धा या जिल्हयासाठी)
५. इतर संचालनालयातील शिष्यवृत्ती योजना
१) आदिवासी विकास
२) समाजकल्याण
३) बार्टी
४) सारथी
५) इतर मागास बहुजन कल्याण विभाग
६) महाज्योती
७) दिव्यांग कल्याण
सोबत योजनांच्या माहितीची PPT