वचन व वचनाचे प्रकार एकवचन अनेकवचन उदाहरणे स्पष्टीकरणासहित पाहूया vachan and types of vachan 

वचन व वचनाचे प्रकार एकवचन अनेकवचन उदाहरणे स्पष्टीकरणासहित पाहूया vachan and types of vachan 

➡️झाड या नामावरून एका झाडाचा बोध होतो.

➡️झाडे या नामावरून अनेक झाडांचा बोध होतो.

➡️माणूस या नामावरून एका माणसाचा बोध होतो.

➡️माणसे या नामावरून अनेक माणसांचा बोध होतो.

➡️वस्तू एक आहे की अनेक आहेत हे कळते, त्यास नामाचे वचन म्हणतात.

मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत ते खालील प्रमाणे पाहू या

(1) एकवचन

(2) अनेकवचन.

(1) एकवचन – जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो, तेव्हा त्याचे एकवचन असते.

जसे घर, माणूस, पुस्तक

एकवचनी सर्वनामे – मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण.

(2) अनेकवचन – जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो, तेव्हा त्याचे अनेकवचन असते.

जसे – घरे, माणसे, पुस्तके

अनेकवचनी सर्वनामे – आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे, ह्या, त्या.

खालील तक्त्यामध्ये काही एकवचन व अनेकवचन शब्द दिलेले आहेत

अणु.एकवचनअनेकवचन
1तार तारा 
2कावळाकावळे
3वाटवाटा
4खाटखाटा
5लाटलाटा
6चटईचटया
7सुईसुया 
8समई समया 
9लढाईलढाया
10रजईरजया
11भुवई भुवया 
12भिंतभिंती
13घागरघागरी
14पंगत पंगती 
15सहलसहली
16वरातवराती
17नथनथी 
18सरसरी
19नदीनद्या 
20साडी साड्या 
21खाडी खाड्या 
22भाकरी भाकऱ्या 
23चांदणी चांदण्या 
24नक्कल नक्कला
25रक्कम रकमा 
26किंमत किमती 
27गंमत गमती 
28पक्कड पकडी 
29थप्पड थपडी 
30चप्पल चपला 
31नक्कल नकला 
32शिग शिगा 
33शिर शिरा 
34विट विटा 
35स्त्री स्त्रिया
36बी बिया 
37जीभ जीभा 
38वीज वीजा 
39बहीण बहिणी 
40तारीख तारीखा 
41चूक चुका 
42खारीक खारिका 
43मिरवणूक मिरवणुका 
44म्हैस म्हशी 
45मैत्रीण मैत्रिणी 
46विहीर विहिरी 
47पोरगी पोरी 
48मुलगी मुली 
49चूल चुली 
50जळू जळवा 
51ऊ उवा 
52पिसू पिसवा 
53सासू सासवा 
54सोय सोयी 
55गाय गायी 
56आंबा आंबे 
57कुत्रा कुत्रे 
58ससा ससे 
59मासा मासे 
60मळा मळे 
61कोल्हा कोल्हे 
62घोडा घोडे 
63माळा माळे 
64वाडा वाडे 
65रस्ता रस्ते 
66गाव गावे 
67फळ फळे 
68मत मते 
69घर घरे 
70दार दारे 
71गाणे गाणी 
72तळे तळी 
73डोके डोकी 
74खेडे खेडी 
75खेळणे खेळणी 
76मडके मडकी 
77लिंबू लिंबे 
78पिल्लू पिल्ले 
79वासरू वासरे 
80पाखरू पाखरे 
81लेकरू लेकरे 
82कोकरू कोकरे 
83छप्पर छप्परे 
84गळू गळवे 
85डुक्कर डुकरे 
86शिड शिडे 
87शीत शिते 
88मूल मुले 
89फूल फुले 
90मूळ मुळे 
91कुळ कुळे 
92हरीण हरिणे 
93देव देव 
94प्रतिज्ञाप्रतिज्ञा
95झाड झाडे 
96चूक चुका 
97मळा मळे 
98नदी नद्या 
99घागर घागरी 

Leave a Comment