राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने निर्गमित शासन निर्णय दि.१३.०५.२०२५ अन्वये आवश्यक कार्यवाही करण्याबाबत vidharthi suraksha samiti shasan paripatrak 

राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने निर्गमित शासन निर्णय दि.१३.०५.२०२५ अन्वये आवश्यक कार्यवाही करण्याबाबत vidharthi suraksha samiti shasan paripatrak 

संदर्भ :-

१. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.११९/एस.डी.४. दि.१३.०५.२०२५

२. या कार्यालयाचे आपणांस पत्र जा.क्र.१७८४, दि.१९.०५.२०२४

३. या कार्यालयाचे आपणांस पत्र जा.क्र.१३०८०२५, दि.०१.०७.२०२४

४. या कार्यालयाचे आपणांस पत्र जा.क्र.१३२१२७१, दि.१०.०७.२०२४

राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने निर्गमित शासन निर्णय १३.०५.२०२५ मधील मुद्दा क्रमांक १२ अनुसार विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करावयाचे आहे. सदर समितीचे सदस्य सचिव शाळेचे मुख्याध्यापक असून त्यांनी विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात वेळोवेळी विहित केलेले शासन निर्णय/परपित्रक यांची शाळास्तरावर अंमलबजावणीबाबत प्रत्येक महिन्यात आढावा घेऊन संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडे अहवाल सादर करावयाचा आहे. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत विहित प्रमाणपत्र शाळेच्या दर्शनी भागावर लावण्यात यावे. त्यासाठी विहित प्रमाणपत्र यासोबत जोडण्यात आले आहे.

तरी, आपल्यास्तरावरुन अधिनस्त सर्व शाळांना विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रमाणपत्र शाळेच्या दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश देण्यात यावेत. तसेच, शासन निर्णय १३.०५.२०२५ अन्वये विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणीबाबत प्राप्त अहवाल /माहिती यांची आपणांकडे स्वतंत्र नोंद घेण्यात यावी. जेणेकरुन तातडीच्या संदर्भासाठी सदर माहिती उपलब्ध करुन देता येईल.

(सोबत : प्रमाणपत्र नमूना)

Leave a Comment