विरामचिन्हे व त्यांचे उपयोग शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त viramchinhe scolarship exam
पूर्णविराम (.)
वाक्य पूर्ण झाले, हे समजण्यासाठी वापरतात.
__________________________________________
अर्धविराम (;)
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडतात, तेव्हा वापरतात.
__________________________________________
अपूर्णविराम (:)
वाक्याच्या शेवटी तपशील असल्यास अपूर्णविराम वापरावा. दयायचा
__________________________________________
स्वल्पविराम (,)
(1) एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात.
(2) हाक मारून काही सांगताना नावापुढे /संबोधनापुढे वापरतात.
__________________________________________
प्रश्नचिन्ह (?)
वाक्यात प्रश्न विचारला असेल; तर वाक्याच्या शेवटी वापरतात.
__________________________________________
उद्गारचिन्ह (!)
मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात.
__________________________________________
अवतरणचिन्ह ( ‘ ‘ ) (” ” )
(1) एकेरी – एखादया शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात.
(2) दुहेरी – बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात.
__________________________________________
संयोग चिन्ह (-)
(1) दोन शब्द जोडताना वापरतात.
(2) ओळीतील शेवटचा शब्द जर तोडावा लागत असेल, तर त्याचे दोन भाग करताना.
__________________________________________
अपसरण चिन्ह (_)
वाक्याच्या पुढे तपशील दयायचा नसल्यास अपसारणचिन्ह वापरतात.
__________________________________________
अवग्रह (ss)
एखादया वर्णाचा लांब (दीर्घ) उच्चार करताना वापरतात.
__________________________________________
लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठीची खूण