1. उराशी बाळगणे – अंतःकरणात जतन करून ठेवणे.
2. उष्ट्या हाताने कावळा न हाकणे – कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे
3. अंगाची लाही लाही होणे – क्रोधाने क्षुब्ध होणे
4. अंगावर काटा उभा राहणे – भीतीने अंगावर शहारे येणे
5. अंगावर मूठभर मांस चढणे – धन्यता वाटणे
6. अंगाचा तिळपापड होणे – अतिशय संताप येणे
7. कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे
8. कपाळमोक्ष होणे – मरण पावणे
9. कान फुंकणे – मनात किल्मिष उत्पन्न करणे
10. कानावर पडणे – सहजगत्या माहीत होणे
11. कानावर हात ठेवणे – माहीत नसल्याचा बहाणा करणे
12. कानउघाडणी करणे – कडक शब्दात चूक दाखवून देणे
13. काखा वर करणे – आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे
14. कान टवकारून ऐकणे – अगदी लक्षपूर्वक ऐकणे
15. कानाडोळा करणे – दुर्लक्ष करणे
16. कावराबावरा होणे – बावरणे
17. काळजाचे पाणी पाणी होणे – दुःखी होऊन धैर्य व उत्साह नाहीसा होणे
18. कंठशोष करणे – ओरडून गळा सुकवणे, उगाच घसाफोड करणे
19. कंठस्नान घालणे- ठार मारणे
20. कंबर कसणे – एखाद्या गोष्टीसाठी हिंमत धरून तयार होणे
21. केसाने गळा कापणे – वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे
22. कोपरापासून हात जोडणे – संबंध न राखण्याची इच्छा करणे
23. खाजवून खरूज काढणे – मुद्दाम भांडण उकरून काढणे
24. गर्भगळित होणे – अतिशय घाबरणे
25. गळ्यात पडणे – एखाद्याला फार फार भीड घालणे
26. गळ्याशी येणे – नुकसानीबाबत अतिरेक होणे
डी/118
विद्याभारती
27. गळ्यात धाँडा पडणे इच्छा नसताना जबाबदारी अगावा
पडणे.
28. घाम गाळणे खूप कष्ट करणे
29. चतुर्भुज होणे लग्न करणे, कैद होणे
30. छातीला हात लावून सांगणे खात्रीपूर्वक, आत्मविश्वास-पूर्वक सांगणे
31. जिभेला हाड नसणे वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे
32. जिवात जीव नसणे खूप काळजी करणे, धैर्य नसणे
3.3. जिवात जीव येणे काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे
34. जीव भांड्यात पडणे काळजी दूर होणे, हायसे वाटणे
35. जीव मेटाकुटीस येणे त्रासाने अगदी कंटाळून जाणे
36. जीव अधीर होणे -उतावीळ होणे
37. जिवाची मुंबई करणे खूप चैन करणे
38. जीव टांगणीला लागणे चिंताग्रस्त होणे
39. जिवावर उदार होणे प्राण देण्यास तयार होणे
40. जिवाचे रान करणे खूप कष्ट सोसणे
41. जिवाचा धडा करणे पक्का निश्चय करणे
42. जिवावर उठणे एखाद्याचा जीव घेण्यास उद्युक्त होणे
44. जिवाला घोर लावणे खूप काळजी वाटणे
43. जिवावर उड्या मारणे दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे
46. जीव खाली पडणे काळजीतून मुक्त होणे
45. जिवाला जीव देणे एखाद्यासाठी प्राण देण्याची तयारी असणे
47. जीव की प्राण असणे प्राणाइतके प्रिय असणे
– 48. जीव तुळतिळ तुटणे एखाद्या गोष्टीसाठी तळमळणे
49. जीव गहाण ठेवणे कोणत्याही त्यागास तयार असणे
550. जीव थोडा थोडा होणे अतिशय काळजी वाटणे
51. डोक्यात घोळणे – एकसारखे मनात येणे
52. डोक्यावर मिरी वाटणे वरचढ होणे
53. डोक्यावर खापर फोडणे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे
7 54. डोळ्यांत धूळ फेकणे- फसवणूक करणे
55. डोळ्यावर कातडे ओढणे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे
56. डोळा चुकवणे अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देण्यास टाळणे
57. डोळे निवणे समाधान होणे
58. डोळ्यांत खुपणे सहन न होणे
59. डोळ्यांचे पारणे फिटणे पूर्ण समाधान होणे
60. डोळे खिळून राहणे-एकसारखे एखाद्या गोष्टीकडे बघत राहणे
61. डोळे दीपवणे – थक्क करून सोडणे
62. डोळे पाणावणे – डोळ्यांत पाणी येणे
63. डोळ्यात प्राण आणणे एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे 64. डोळे फाडून पाहणे तीक्ष्ण नजरेने पाहणे, आश्चर्यचकित होऊन पाहणे
65. डोळ्याशी डोळा लागणे – झोप लागणे
66. डोळ्यांत तेल घालून राहणे – अतिशय जागृत राहणे, दक्ष राहणे
67. डोळे भरून पाहणे – समाधान होईपर्यंत पाहणे
68. तळपायाची आग मस्तकाला जाणे अतिशय संताप होणे
69. तोंड काळे करणे – दृष्टिआड होणे, नाहीसे होणे
70. तोंडाला पाने पुसणे चांगलेच फसवणे
71. तोंडचे पाणी पळणे अतिशय घाबरणे, भयभीत होणे
72. तोंडाला पाणी सुटणे लोभ उत्पन्न होणे
73. तोंडात बोट घालणे – आश्चर्यचकित होणे
74. तोंड टाकणे अद्वातद्वा बोलणे
75. तोंडावाटे ब्र न काढणे एकही शब्द न उच्चारणे
76. तळहातावर शीर घेणे जिवावर उदार होणे
77. धुंकी झेलणे एखाद्याची अतिनिंद्यप्रकारे खुशामत करणे
78. थोबाड रंगवणे – तोंडात मारणे
79. दात धरणे वैर बाळगणे, डुक ठेवणे
80. दाढी धरणे विनवणी करणे
81. दातांच्या कण्या करणे अनेक वेळा विनंती करून सांगणे
82. दाती तृण धरणे- शरणागती पत्करणे
83. दातखिळी बसणे बोलणे अवघड होणे
84. दातओठ खाणे द्वेषाची भावना दाखवणे
85. दोन हाताचे चार हात होणे विवाह होणे
86. दुसऱ्याच्या ऑजळीने पाणी पिणे दुसऱ्याच्या तंत्राने चालणे
87. दात कोरून पोट भरणे मोठ्या व्यवहारात नगण्य काटकसर करून त्यात यशस्वी होण्याचा प्रयत्न करणे
88. दातास दात लावून बसणे – काही न खाता उपाशी राहणे
89. नजरेत भरणे – उठून दिसणे
90. नाक ठेचणे नक्षा उतरणे
91. नाक घासणे – स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे
92. नाक मुरडणे नापसंती दाखवणे
93. नाकावर राग असणे – लवकर चिडणे
94. नाक वर असणे ऐट असणे, दिमाख असणे, ताठा असणे
त्याला राग येणे
95. नाकाला मिरच्या झोंबणे एखाद्याचे वर्म काढल्यामुळे
96. नाकीनऊ येणे मेटाकुटीला येणे, फार त्रास होणे
97. नाकाने कांदे सोलणे स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे
98. नक्राश्रू ढाळणे अंतर्यामी आनंद होत असता बाह्यतः दुःख दाखवणे
99. नाकापेक्षा मोती जड होणे गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त होणे
स्थिती होणे
100. नाकाशी सूत धरणे आता मरतो की घटकेत मरतो अशी
101. पाठीशी घालणे संरक्षण देणे
102. पदरात घेणे स्वीकारणे
103. पदरात घालणे चूक पटवून देणे, स्वाधीन करणे
104. पाचवीला पुजणे कायमची सोबत असणे
105. पाठ न सोडणे एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे
106. पाठ दाखवणे पळून जाणे
107. पाऊल वाकडे पडणे वाईट मागनि जाणे
108. पायमल्ली करणे उपमर्द करणे
109. पायाखाली घालणे पादाक्रांत करणे
110. पोटात कावळे काव काव करणे अतिशय भूक लागणे, भूकेने जीव व्याकूळ होणे
111. पोटात घालणे क्षमा करणे
112. पोटात शिरणे मर्जी संपादन करणे
113. पोटावर पाय देणे उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे
114. पोटाची दामटी वळणे खायला न मिळणे
115. पोटाला चिमटा घेणे पोटाला न खाता राहणे
116. पोटात ब्रह्मराक्षस उठणे अतिशय खावेसे वाटणे
117. प्राण कानात गोळा होणे होणे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक
118. प्राणावर उदार होणे जिवाची पर्वा न करणे
119. बत्तीशी रंगवणे जोराने थोबाडात मारणे
120. बत्तीशी दाखवणे हसणे
121. बोटावर नाचवणे आपल्या इच्छेप्रमाणे वागायला लावणे
122. मनात मांडे खाणे व्यर्थ मनोराज्य करणे
123. मान ताठ ठेवणे स्वाभिमानाने वागणे
124. मनात घर करणे मनात कायमचे राहणे
125. मन मोकळे करणे सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखवणे
पक्का विचार येणे 126. मनाने घेणे मनात
127. मन साशंक होणे मनात संशय वाटू लागणे
128. मनावर ठसणे मनावर जोरदारपणे विचणे
129. मिशीवर ताव मारणे बढ़ाई मारणे
130. मूक गिळणे उत्तर न देता गप्प राहणे
131. मधाचे बोट लावणे आशा दाखवणे
132. रक्ताचे पाणी करणे अतिशय मेहनत करणे
133. लहान तोंडी मोठा घास घेणे आपणास न शोभेल अशा प्रकारे मोठ्यांशी वरचढपणाने बोलणे
134. वकीलपत्र घेणे एखाद्याच्या बाजूने बोलण्याचे पत्करणे
135. वाचा बसणे एक शब्दही बोलता न येणे
136. विचारांना पंख फुटणे वाढणे विचारांना गती येणे, विचारशक्ती
137. सर्वस्व पणाला लावणे सर्व शक्य मार्गाचा अवलंब करणे
138. हसता हसता पुरेवाट होणे अनावर हसू येणे
139. हात पाय गळणे धीर सुटणे
140. हात ओला करणे फायदा होणे
141. हात टेकणे नाइलाज झाल्याने माघार घेणे
142. हात देणे मदत करणे
143. हात मारणे ताव मारणे, भरपूर खाणे
144. हात दाखवणे – बडवून काढून वा अन्य प्रकारे आपले सामर्थ्य
दाखवणे, इंगा दाखवणे
145. हात चोळणे चरफडणे
146. हात हलवत परत येणे काम न होता परत येणे
147. हात झोडून मोकळे होणे अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी
टाळून मोकळे होणे
148. हात धुऊन पाठीस लागणे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या
मागे लागणे
150. हाताचा पाळणा करून सांभाळणे अत्यंत काळजीपूर्वक
149. हातचा मळ असणे — सहज शक्य असणे
पालनपोषण करणे
151. हातावर तुरी देणे डोळ्यादेखत फसवून निसटून जाणे
152. हातात कंकण बांधणे प्रतिज्ञा करणे
153. हातापाया पडणे गयावया करणे
154. हाताला हात लावणे – थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे
श्रेय घेणे
155. हातावर शीर घेणे जिवावर उदार होणे, प्राणाचीही पर्वा न करणे
156. अकांडतांडव करणे रागाने आदळआपट करणे
157. अग्निदिव्य करणे कठीण कसोटीस उतरणे
158. अटकेपार झेंडा लावणे फार मोठा पराक्रम गाजवणे
160. अडकित्यात सापडणे पेचात सापडणे
159. अठरा विश्वे दारिद्र्य असणे पराकोटीचे दारिद्रय असणे
161. अत्तराचे दिवे लावणे भरपूर उधळपट्टी करणे
162. अन्नास जागणे – उपकार स्मरणे
163. अन्नास मोताद होणे- आत्यंतिक दारिद्र्यात जगणे,
उपासमार होणे
164. अन्नास लावणे – उपजीविकेचे साधन मिळवून देणे
165. अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे – थोड्याशा यशानेच चढून जाणे
166. आकाश ठेंगणे होणे अतिशय गर्व होणे, गर्वाने फार फुगून जाणे
167. आकाशपाताळ एक करणे फार मोठ्याने आरडाओरडा करून थैमान घालणे
168. आकाश फाटणे चारी बाजूंनी संकटे येणे
आवाक्याबाहेरची गोष्ट 169. आकाशाला गवसणी घालणे करण्याचा प्रयत्न करणे
170. आगीत तेल ओतणे अगोदर झालेल्या भांडणात भर टाकून भांडण विकोपाला जाईल असे करणे
171. आगीतून निघून फोफाट्यात जाणे लहान संकटातून
मोठ्या संकटात सापडणे
172. आच लागणे झळ लागणे
173. आयत्या पोळीवर तूप ओढणे दुसऱ्याचा मुळीच विचार न करता साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे
174. आभाळ कोसळणे एकाएकी फार मोठे संकट येणे
175. आनंदाला पारावर न उरणे अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे
176. इकडचा डोंगर तिकडे करणे फार मोठे कार्य पार पाडणे
177. आयत्या पिठावर रेषा ओढणे दुसऱ्यापासून आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे
178. आवळा देऊन कोहळा काढणे – स्वस्त वस्तू देऊन तिच्या मोबदल्यात दुसऱ्याकडून मोठे कार्य करून घेणे.
179. उखळ पांढरे होणे पुष्कळ द्रव्य मिळणे
180. उखाळ्या-पाखाळ्या काढणे एकमेकांचे उ-दुका
181 उचलबांगडी करणे एखाद्याला जबरदस्तीने हलवणे शेळ्या
182. उंटावरून हाकणे मनापासून काम करणे 183. कुत्रा हाल न खाणे अतिशय वाईट
स्थिती येणे 184. कोंबडे झवणे दुसऱ्याचे भांडण लावून आपण मजा पाह
योग्य मार्गाला येणे
185. गाडी पुन्हा रूळावर येणे चुकीच्या पुन्हा
धन्यता वाटणे
186. गंगेत घोडे न्हाणे कार्य तडीस गेल्यामुळे कृत्यता
187. घर डोक्यावर घेणे अतिशय गोगाट करणे
188. घर धूऊन नेणे सर्वस्वी लुबाडमे
वेळ जवळ येणे
189. घोडामैदान जवळ असणे एखाद्या गोष्टीबाबत कसोटीची
191. घोडे मारणे नुकसान करणे
190. घोडे मध्येच अडणे – प्रगतीत खंड पडणे
192. घोडे पुढे ढकलणे – स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे
193. घोडे पेंड खाणे अडचण निर्माण होणे
194. पराचा कावळा करणे क्षुल्लक, मामुली गोष्टीला मलतेच
महत्त्व देणे
195. माशा मारणे कोणताही उद्योग न करणे
196. कागदी घोडे नाचवणे – ज्याच्यापासून काही लाभ होण्याजोगा नाही अशा लेखनाचा खटाटोप करणे
197. उदक सोडणे – एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे
198. उद्ध्वस्त होणे नाश पावणे
199. उन्मळून पडणे मुळासकट कोसळणे
200. उन्हाची लाही फुटणे अतिशय कडक ऊन पडणे
201. उलटी अंबारी हाती येणे भीक मागण्याची पाळी देणे
202. ऊत येणे अतिरेक होणे
203. एक घाव दोन तुकडे करणे ताबडतोब निर्णय घेऊन गो निकालात काढणे
204. अंथरूण पाहून पाय पसरणे ऐपतीच्या मानाने खर्च करण
205. कणिक तिंबणे खूप मार देणे
206. काटा काढणे आपल्या मार्गातील शत्रूला दूर करणे, दुःखा
मूळ कारण नष्ट करणे
207. कायापालट होणे पूर्णपणे स्वरूप बदलणे
208. काट्याने काटा काढणे एका शत्रूच्या साहाय्याने दुस
शत्रूचा पराभव करणे
209. काट्याचा नायटा करणे साधी गोष्ट वाईट थराला नेणे
210. काट्याचा नायटा होणे होणे क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम
211. काळाच्या उदरात गडप होणे नष्ट होणे
212. कुंपणाने शेत खाणे विश्वासातील माणसाने फसवणे
213. खडा टाकून पाहणे अंदाज घेणे
214. खडे चारणे शरण येण्यास भाग पाडणे
215. खापर फोडणे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे
216. खाल्ल्या घराचे वासे मोजणे उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतणे
217. खिळवून ठेवणे एखाद्या गोष्टीपासून हलू न देणे
218. खूणगाठ बांधणे पक्के ध्यानात ठेवणे
219. खो घालणे विघ्न निर्माण करणे
220. गळ घालणे अतिशय आग्रह करणे
221. गुजराण करणे निर्वाह करणे
222. गुण दाखवणे नकली स्वभाव टाकून खरे स्वरूप प्रकट करणे
223. गाशा गुंडाळणे एकदम पसार होणे
224. गौडबंगाल असणे गूढ गोष्ट असणे. काहीतरी काळेबरे असणे
225. घडी भरणे विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे
226. घालून पाडून बोलणे दुसऱ्याला लागेल असे बोलणे
1227. चव्हाट्यावर आणणे उघडकीस आणणे. जाहीर करणे
228. चंग बांधणे निश्चय करणे
229. चार पैसे गाठीला बांधणे थोडीफार बचत करणे
230. चारी दिशा मोकळे होणे पूर्ण स्वातंत्र्य असणे
व्यवस्थित चाललेल्या 231. चालत्या गाडीला खीळ घालणे
कामात व्यत्यय आणणे.
232. चाहूल लागणे कुठलीही गोष्ट घडणार असल्याचा अंदाज
बांधणे
233. चौदावे रत्न दाखवणे मार देणे
234. जमीनदोस्त होणे पूर्णपणे नष्ट होणे
गे 235. जंग जंग पछाडणे निरनिराळ्या रीतीने प्रयत्न करणे, कमालीचा
प्रयत्न करणे
च 236. जोपासना करणे काळजीपूर्वक संगोपन करणे
237. झळ लागणे लागणे एखाद्या गोष्टीचा थोडाफार दुष्परिणाम भोगावा
या 238. टक लावून पाहणे एकसारखे रोखून पाहाणे
239. टाहो फोडणे मोठ्याने आकांत करणे
240. टाके दिले होणे अतोनात श्रम झाल्यामुळे कोणतेही काम
करण्याची अंगी ताकद न राहणे
241. टेंभा मिरवणे दिमाख दाखवणे
242. डाव साधणे संधीचा फायदा घेऊन जिंकणे, युक्तीने इष्ट वस्तू
मिळवणे
थारा मिळणे, सोय जुळणे 243. डाळ शिजणे
244. डांगोरा पिटणे जाहीर करणे
245. तडीस नेणे यशस्वी रीतीने पूर्ण करणे
246. ताळ्यावर आणणे योग्य समज देणे
247. ताकाला जाऊन भांडे लपवणे एखाद्या गोष्टीसाठी दुसऱ्याकडे
याचना करणे, परंतु त्याचाबत गुप्तता राखण्याचा प्रयत्न करणे.
248. तहान लागल्यावर विहीर खणणे गरज लागली की
आयत्यावेळी धावाधाव करणे
249. तारांबळ उडणे अतिशय घाई होणे
250. तिलांजली देणे सोडणे, त्याग करणे
251. तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे मिळालेल्या संधीचा
लाभ उठवणे
252. थांग न लागणे कल्पना न येणे
253. दगा देणे फसवणे
254. दबा धरून बसणे एखादी गोष्ट अनपेक्षित रीतीने पार
पाडण्यासाठी टपून बसणे
255. दाद न देणे थांगपत्ता लागू न देणे, पूर्णपणे दुर्लक्ष करणे
256. दाद मागणे तक्रार करून किंवा गा-हाणे सांगून न्याय मागणे
257. दत्त म्हणून उभे राहणे एकाएकी हजर होणे
258. द्राविडी प्राणायाम करणे सरळ मार्ग सोडून लांबच्या
मागनि जाणे
259. दुधात साखर पडणे अधिक चांगले घडणे
260. दुःखावर डागण्या देणे दुःख झालेल्या माणसाला वाईट
वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे
261. धरणे धरणे हट्ट करून बसणे
262. धारातीर्थी पडणे रणांगणावर मृत्यू येणे
263. धाबे दणाणणे खूप घाबरणे
264. धर्मावर सोमवार सोडणे परभारे गोष्टी भागवून स्वतःला
मोठेपणा मिळवणे
265. धूम ठोकणे वेगाने पळून जाणे
266. धूळ चारणे पूर्ण पराभव करणे
267. नजर करणे भेट म्हणून देणे
268. नांगी टाकणे हातपाय गाळणे
269. नक्षा उतरवणे गर्व उत्तरवणे
270. नामकरण करणे विधीपूर्वक नाव ठेवणे
271. पाणी दाखवणे सामर्थ्य दाखवणे
273. पाणी मुरणे कपटाने काही तरी लपवून ठेवणे, गुप्त कट
272. पाणी पडणे वाया जाणे
शिजत असणे
274. पाणी पाजणे पराभव करणे
275. पाणी सोडणे आशा सोडणे, त्याग करणे
276. पडझड होणे जमिनीवर कोसळणे, मोडतोड होणे
277. पाढा वाचणे सविस्तर हकीकत सांगणे
278. पादाक्रांत करणे जिंकणे
279. पार पाडणे यशस्वी रीतीने पूर्ण करणे
280. पाण्यात पाहणे अत्यंत द्वेष करणे
281. पुंडाई करणे दांडगाईने वागणे
282. पायमल्ली करणे उपमर्द करणे
283. पदरमोड करणे स्वतःचा पैसा खर्च करणे
284. प्रश्नांची सरबत्ती करणे एकसारखे प्रश्न विचारणे
285. प्रक्षुब्ध होणे खवळणे
286. फाटे फोडणे उगाच अडचणी निर्माण करणे, एखादे काम टाळण्यासाठी हरकती काढणे
287. फुटाण्यासारखे उडणे रागाने एकदम एखाद्या कार्यास प्रवृत्त
होणे
288. बट्ट्याबोळ करणे किंवा बट्ट्याबोळ होणे विचका
करणे किंवा विचका होणे
289. बभ्रा करणे बोभाटा करणे, सगळीकडे प्रसिध्दी करणे 290. बारा वाजणे पूर्ण नाश होणे
291. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे दुसऱ्याच्या उठाठेवी करणे
292. बादरायण संबंध असणे ओढून ताणून संबंध आणला जाणे
गोंधळून जाणे 293. बुचकळ्यात पडणे
294. बेत हाणून पाडणे बेत सिध्दीला न जाऊ देणे
295. बोचणी लागणे एखादी गोष्ट मनाला लागून राहणे
296. बोल लागणे दोष देणे
297. बोळ्याने दूध पिणे बुध्दिहीन असणे
जमून येणे
298. बोलाफुलाला गाठ पडणे दोन गोष्टींची सहजासहजी एकवेळ
199. भगीरथ प्रयत्न करणे चिकाटीने प्रयत्न करणे 300. भान नसणे जाणीव नसणे
302. भारून टाकणे 301. भान हरपणे सावधपणा नष्ट होणे पूर्णपणे मोहून टाकणे
303. मधून विस्तव न जाणे अतिशय वैर असणे
मराठी
3
32
32
3
304. घुसळाला अंकुर फुटणे 305. मशागत करणे मेहनत करून निगा राखणे अशक्य गोष्ट पडून येणे
3
306. मात्रा चालणे परिणाम होणे
307. राईचा पर्वत करणे गोष्ट बुद्धक पण तिला उगाच मोठे स्वरूप
3
देणे
308. राख होणे पूर्णपणे नष्ट होणे
3-
309. राब राब राबणे सतत खूप मेहनत करणे
3
310. राम नसणे अर्थ नसणे
311. लक्ष वेधून घेणे लक्ष ओढून घेणे
3
3
312. लक्ष्मीचा वरदहस्त असणे लक्ष्मीची कृपा असणे, श्रीमंती
असणे
3
313. लौकिक मिळवणे – सर्वत्र मान मिळवणे
3
314. वाट लावणे – विल्हेवाट लावणे, मोडून तोडून टाकणे
315. वाटाण्याच्या अक्षता लावणे स्पष्टपणे नाकारणे
316. वठणीवर आणणे ताळ्यावर आणणे, नम्र व्हायला लावणे
317. वणवण भटकणे एखादी गोष्ट मिळण्यासाठी खूप फिरणे
318. विचलीत होणे मनाची चलबिचल होणे
319. विसंवाद असणे एकमेकांशी न जमणे
321. वड्याचे तेल वांग्यावर काढणे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे
320. वेध घेणे चौकस नजरेने पाहणे
322. विडा उचलणे निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे
323. वेड घेऊन पेडगावला जाणे मुद्दाम ढोंग करणे
324. शब्द जमिनीवर पडू न देणे दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच
कार्यवाही करणे
325. शहानिशा करणे एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री
327. शितावरून भाताची परीक्षा करणे थोड्यावरून संपूर्ण
करून घेणे
326. शिगेला पोहोचणे शेवटच्या टोकाला जाणे
गोष्टीची परीक्षा करणे
328. शंभर वर्ष भरणे नाश होण्याची वेळ जवळ येणे
329. श्रीगणेशा करणे
आरंभ करणे
330. सहीसलामत सुटणे दोष न येता सुटका होणे
331. सळो की पळो करणे अतिशय हैराण करणे
332. समरस होणे (एखाद्या गोष्टीशी) एकरूप होणे
333. साखर पेरणे गोड गोड बोलून आपलेसे करणे
334. सामोरे जाणे – निधड्या छातीने (संकटास) तोंड देणे
335. साक्षर होणे – लिहिता वाचता येणे
336. साक्षात्कार होणे – आत्मिक ज्ञान होणे
337. सुताने स्वर्गाला जाणे – थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करणे
338. सूतोवाच करणे – पुढील गोष्टीची प्रस्तावना करणे, आरंभकरणे
339. सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे
340. संधान बांधणे – जवळीक निर्माण करणे
341. संपादन करणे – प्राप्त करून घेणे, मिळवणे
342. संभ्रमात पडणे – गोंधळात पडणे
343. स्वप्ने रंगवणे – खोटी आशा मनाशी बाळगून त्यात रंगून जाणे
344. स्वप्न भंगणे – मनातील विचार कृतीत न येणे
345. स्वर्ग दोन बोटे उरणे- गर्वाने अतिशय फुगून जाणे
346. हट्टाला पेटणे – हट्ट मुळीच न सोडणे
347. हमरीतुमरीवर येणे – जोराने भांडू लागणे
348. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे – खोटी स्तुती करून मोठेपणा देणे
349. हस्तगत करणे – ताब्यात घेणे
350. हाय खाणे- धास्ती घेणे
351. हूल देणे – चकवणे








