उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा सुधारित दिनांक 29 मार्च 2026 बाबत ullas navbharat saksharata karyakram
संदर्भ
:- 1) शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र F.No. 6-1/2023-AE-2 दि. 20/02/2026.
2) अवर सचिव आणि समन्वयक शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याशी झालेली चर्चा दि. 10/3/2026.
उपरोक्त विषयानुसार, केंद्र शासनाच्या शिक्षण विभाग व साक्षरता विभागाचे पत्र व शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यास दिलेले भौतिक उद्दिष्ट 6.20 लक्ष गाठण्याच्या अनुषंगाने भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाची अवर सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आपल्या राज्याचे यावर्षी दिलेले उद्दिष्ट प्रयत्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार दिनांक 15 मार्च, 2026 रोजी घेण्यात येणारी परीक्षा ही आता रविवार दिनांक 29 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
तरी असाक्षर नोंदणी व जोडणी (Tagging) चे कामकाज तात्काळ 100% पूर्ण करण्यात यावे. साक्षरता वर्ग नियमित सुरू ठेवावेत. साक्षरता वर्गांना भेटी द्याव्यात. FLNAT प्रश्नपत्रिकांचा पुरेसा सराव करून घ्यावा. पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेस नोंदणी झालेले, पूर्वीच्या परीक्षेस उपस्थित न राहू शकलेले व कामगिरीत सुधारणा आवश्यक (Need Improvement) शेरा प्राप्त असे सर्व 100% असाक्षर प्रविष्ट होतील यासाठी प्रयत्न करावेत.










