राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत nagri sahkari bank bharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत nagri sahkari bank bharti 

वाचा :- शासन आदेश, सहकार, पणन व वस्त्रोदयोग विभाग क्र. युआरबी १८१८/प्र.क्र.९/शिकाना/७-स, दिनांक २१.०१.२०१९

शासन शुध्दीपत्रक :-

राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेश दिनांक २१.०१.२०१९ मधील अ.क्र.३ नागरी सहकारी बँकेमार्फत करावयाची कार्यवाही मधील

v) “रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रत्येक संवर्गाची अंतीम गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी. सदर अंतीम यादीनुसार भरावयाच्या रिक्त पदांच्या २० % पात्र उमेदवारांची प्रतिक्षा यादी संस्थेकडून उपलब्ध करुन घ्यावी. ही यादी नियुक्तीच्या प्रथम आदेशापासून ३६५ दिवसांपर्यंत अंमलात राहील.”

याऐवजी

v) “रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रत्येक संवर्गाची अंतीम गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी. सदर अंतीम यादीनुसार भरावयाच्या रिक्त पदांच्या २०% पात्र उमेदवारांची प्रतिक्षा यादी संस्थेकडून उपलब्ध करुन घ्यावी. ही यादी नियुक्तीच्या प्रथम आदेशापासून ३६५ दिवसांपर्यंत अंमलात राहील. तथापि, रु.१०० कोटीपेक्षा कमी ठेवी असलेल्या लहान बँकांसाठी प्रतिक्षा यादीची मर्यादा अंतिम यादीनुसार भरावयाच्या रिक्त पदांच्या ५०% राहील.” असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक२०२६०३१७१४५१०८४२०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Related posts:

Leave a Comment