तंबाखू मुक्त शाळा अभियान निकषासाठी आवश्यक पुरावे यादी tambakhu mukt shala abhiyan
1.शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन शिक्षक, विदयार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, आणि अभ्यागत ह्यांकडून करण्यास बंदी असणे. | ⏭️मुख्याध्यापकांनी काढलेल्या नोटिसचा फोटो ⏭️शाळेत जनजागृती करतानाचा फोटो ⏭️तंबाखूविरोधी पथनाट्य, रॅली आदींचा फोटो |
2. शाळेत तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना करावी आणि समितीच्या त्रैमासिक बैठका आयोजित होणे. जर वेगळ्या समितीची स्थापना करणे शक्य नसल्यास शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकांमध्ये ११ निकषांचा आढावा घेणे आणि त्याचे प्रोसिडिंग नोंदवहीत लिहून ठेवणे. | ⏭️समितीच्या फलकाचा फोटो ⏭️समितीच्या मिटिंगचा फोटो ⏭️तंबाखूमुक्त शाळा निकषांचा आढावा बैठकींच्या प्रोसिडिंगचा फोटो |
३. धूम्रपान आणि तंबाखू निषिद्ध क्षेत्र शालेय परिसरात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे गुन्हा आहे. असे फलक शाळेच्या मुख्य ठिकाणी पेंट केलेला असणे. | ⏭️शालेय विदयार्थी, मुख्याध्यापक ह्यांसोबत धूम्रपान आणि तंबाखू निषिद्ध क्षेत्र या फलकाचा फोटो. |
४. तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायदयाची माहिती व्हावी ह्यासाठी शाळेत पोस्टर्स, घोषणापट्टया आणि नियम विद्याथ्यांद्वारे तयार करून वर्गावर्गात चिकटवलेले असणे. | ⏭️शालेय विद्यार्थी, शिक्षक ह्यांसोबत तंबाखूविरोधी पोस्टर्सचे |
५. तंबाखू विरोधी संदेश (‘घोषणापट्टया’) शाळेच्या सर्व स्टेशनरी, विद्याथ्यीच्या वांवर लिहिलेले अथवा चिकटवलेले असणे. | ⏭️शालेय विद्यार्थी, शिक्षक हांसोबत घोषणा लिहिलेल्या, चिकटविलेल्या स्टेशनरीचे फोटो. |
६. मुख्याध्यापकांनी आपल्या कार्यालयात तंबाखू नियंत्रण कायदा, २००३ आणि अध्यादेश ह्यांची प्रत ठेवावी. | ⏭️कायद्याच्या प्रतीसोबत मुख्याध्यापकांचा फोटो |
७. तंबाखू नियंत्रणासाठी नियुक्त राज्य सल्लागार प्रतिनिधी, मुंबई/प्राथमिक आरोग्य केंद्र/खाजगी दवाखाना/ इंडियन डेन्टिस्ट असो. चे सदस्य ह्यांची तंबाखूमुक्त शाळेसाठी पत्र लिहून मदत घेतलेली असणे. | ⏭️आरोग्य अधिकाऱ्यांच्या सही शिक्कासहित पत्रव्यवहाराच्या कॉपीचा फोटो. |
८. शाळेने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाना, डेन्टिस्ट, इंडियन डेन्टिस्ट असो. चे सदस्य ह्यापैकी एका वैदयकीय अधिकाऱ्यास बोलावून शाळेत तंबाखूचे दुष्परिणाम, कॅन्सरची लक्षणे ह्या विषयांवर एक रात्र आणि आरोग्य/मुख तपाराणी असे उपक्रम आयोजित करावे. | ⏭️तंबाखूमुक्त शाळा अभियान अशा फलकासोबत आरोग्य व्यवसायिक, उद्धोधन आणि मुखतपासणी करतानाचा फोटो |
९. शाळेच्या १०० यार्ड (१२.३३ मी.) परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णतः बंदी असणे आणि शाळेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ COTPA, २००३ कायद्यानुसार फलक पेंट केलेला असणे. | ⏭️शालेय विद्यार्थी, मुख्याध्यापक हांसोबत फलकाचा फोटो. |
१०. शाळेमध्ये जे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी जे तंबाखू नियंत्रणासाठी हिरिरीने कार्य करीत आहेत. त्यांचा ट्रॉफी/प्रमाणपत्र / ग्रीटींगकार्ड/पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करणे. | ⏭️तंबाखूमुक्त शाळा अभियान अशा फलकासोबत सत्कार करतानाचा फोटो. |
११. सर्व १० निकष पूर्ण केल्यावर शाळेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ तंबाखूमुक्त शाळा किंवा तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था परिसर असा फलक लावलेला असणे. | ⏭️शालेय विद्यार्थी, मुख्याध्यापक हह्यांसोबत फलकाचा फोटो. |
तंबाखू मुक्त शाळा अभियान
1 thought on “तंबाखू मुक्त शाळा अभियान निकषासाठी आवश्यक पुरावे यादी tambakhu mukt shala abhiyan ”