निधी वितरण- सन २०२६-२७ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लेखाशिर्ष २२१० के ५४२ (सर्वसाधारण) ३१-सहायक अनुदाने (वेतनेतर) अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांचे दावे अदा करण्यासाठी रु. ९४०.०० कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत nidhi vitaran circular
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांकः- मफुयो-२०२६/प्र.क्र.७४/MJPJAY&AB-PMJAY/E-१६६४८७३
गो.ते. रुग्णालय संकुल, १० मजला, नवीन मंत्रालय, मुंबई- ४०० ००१
दिनांक: २७ ऑक्टोबर, २०२६
वाचा :-
१) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र.मफुयो-२०२३/प्र.क्र.१६०/आरोग्य-६, दि.२८ जुलै, २०२३.
२) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र. लेखाप्र-२०२४/प्र.क्र.२१७/LB/आरोग्य-६,
दि. २० फेब्रुवारी, २०२५.
३) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांकः अर्थसं २०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि. ०९ एप्रिल, २०२६
४) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांकः अर्थसं-२०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३, दि. ०७ मे, २०२६ शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र. मफुयो-२०२६/प्र.क्र.७४/ MJPJAY&AB-PMJAY/E-१६६४८७३, दि.१८ जून, २०२६
५) राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई यांचे पत्र क्र. राआहसो/लेखा/कास/१२३००/१४९८/२०२६, दि.०९ जुलै, २०२६
६) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र. लेखाप्र-२०२६/प्र.क्र.१६५/ E-९८८९०४/MJPJAY&AB-PMJAY दि. २७ ऑक्टोबर, २०२६
प्रस्तावना :-
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची दि. १ जुलै, २०२४ पासून विस्तारित स्वरूपात अंमलबजावणी राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत सुरू आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी योजनेंतर्गत अर्थसंकल्पित तरतुदीपैकी अंगीकृत रुग्णालयांचे दावे अदा करण्याकरिता राज्य आरोग्य हमी सोसायटीस तरतूद उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णयः-
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत होत असल्यामुळे योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांचे दावे अदा करण्याकरिता सन २०२६-२७ साठी २२१० के ५४२ (सर्वसाधारण), ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली अर्थसंकल्पित रु. १४९०.२५०५ कोटी व जून २०२६ अधिवेशन पुरवणी मागणीत मंजूर ७४०.३४३२ कोटी अशा एकूण २२३०.५९३७ कोटी तरतुदीपैकी संदर्भ क्र.५ च्या शासन निर्णयान्वये रु. २४४,१८,६६,०००/-(रुपये दोनशे चव्वेचाळीस कोटी अठरा लक्ष सहासष्ठ हजार मात्र) इतका सशर्त निधी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरीत रू. १,९८६,४०,७१,०००/- (अक्षरी एक हजार नऊशे शहाऐंशी कोटी चाळीस लक्ष एक्काहत्तर हजार फ़क्त) तरतूदीपैकी रु. ९४०.०० कोटी इतका सशर्त निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या ८४४३- नागरी ठेवी, १०६ वैयक्तिक लेखा, (००) (०२) आभासी वैयक्तिक ठेव लेखा खाते (VPDA) यामध्ये, आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक यांच्या नावे सुपुर्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२.
यावरील खर्च खालील लेखाशिर्षांतर्गत खर्ची टाकण्यात यावा.
मागणी क्र. आर-१
२२१०
(০৭)
११०
(०६)
वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य
नागरी आरोग्य सेवा- विषमचिकित्सा
रुग्णालये व दवाखाने
(०६) (३६)
पंचवार्षिक योजनांतर्गत योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना-हमी तत्त्वावर राबविणे (सर्वसाधारण) (राज्य योजना) (कार्यक्रम) २२१० के ५४२
३१ – सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)
३. शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. मुंविनि-२०२२/प्र.क्र.२७/२०२२/विनियम, दिनांक १२.०१.२०२३ मधील खालील नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून निधी वितरीत करण्यात येत आहे:-
१) सदरचा निधी हा विस्तारीत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या आरोग्य संरक्षणापोटी रुग्णालयांच्या दाव्यांच्या अदायगीसाठी करण्यात यावा.
२) सदरचा निधी योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांचे दावे अदा केल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र विहीत नमुन्यात आहरण व संवितरण अधिकारी तसेच सहसंचालक (अर्थ व प्रशासन), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांना सादर करावे.
४. राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई या कार्यालयास निधीचा विनियोग करण्यासाठी “आभासी वैयक्तिक ठेव लेखा (Virtual Personal Deposit Account-VPDA)” ही व्यवस्था संदर्भ क्र. ०२ येथील दिनांक २०.०२.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच संदर्भ क्र. ६ येथील
दि. २७.१०.२०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये लागू केलेली आहे. आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक यांनी वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.११०/२०२३/कोषा प्रशा-५, दिनांक १४.०२.२०२४ व संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, दिनांक २०.०२.२०२५ मधील तरतुदींचे तंतोतंत पालन करावे. सदर अनुदानाचे देयक अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई यांच्याकडे सादर करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी तसेच सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई हे नियंत्रक अधिकारी असतील.
५. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौसं ५९८/२०२६/व्यय-१३ दि.०९.०९.२०२६ अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६१०२७११५०४६९९१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










