प्रसिध्दीपत्रक निवडणूक साक्षरता मंडळांमार्फत निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांना सुरुवात Electoral Literacy Clubs – ELCs
आजपासून निवडणूक साक्षरता मंडळांमार्फत निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांना सुरुवात
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील निवडणूक साक्षरता मंडळांमार्फत (Electoral Literacy Clubs – ELCs) निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली आहे. सदर स्पर्धा ह्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच भावी आणि तरुण मतदारांमध्ये सुजाण व सहभागात्मक संस्कृती घडविणे, या उद्देशाने घेतल्या जात आहेत.
ह्या स्पर्धा संस्था, विधानसभा मतदारसंघ आणि जिल्हा अशा तीन स्तरांवर होणार आहेत. संस्थास्तरीय फेरी दि.१८ ते २७ नोव्हेंबर, २०२६ दरम्यान होईल. फेरीतील दोन्ही स्पर्धांमधून प्रत्येक शैक्षणिक संस्थेतून २ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यानंतर दि.०७ ते १२ डिसेंबर, २०२६ दरम्यान होणाऱ्या विधानसभा मतदारसंघस्तरीय फेरीतून प्रत्येक मतदारसंघातून १० विद्यार्थी निवडले जातील. निवडलेले विद्यार्थी दि.१४ ते १८ डिसेंबर, २०२६ दरम्यान होणाऱ्या जिल्हास्तरीय अंतिम फेरीत सहभागी होतील. निकाल जाहीर करणे आणि प्रमाणपत्र वितरण दि.१९ ते २२ डिसेंबर, २०२६ दरम्यान केले जाईल.
स्पर्धांचे वेळापत्रक :

निकालानंतर जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि शैक्षणिक संस्थास्तरावर विजेत्यांना प्रमाणपत्रे दिली
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य.










