राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) सलग १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा कालावधी पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत प्राप्त तक्रारींचे निराकरण याकरिता राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करणे व समितीच्या कामकाजाबाबत national health abhiyan circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) सलग १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा कालावधी पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत प्राप्त तक्रारींचे निराकरण याकरिता राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करणे व समितीच्या कामकाजाबाबत national health abhiyan circular 

संदर्भ

: १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. एनएचएम-११२५/प्र.क्र.४५५/एनएचएम

(ई-१३२०९२५), दि.३०.०६.२०२६.

२) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग क्र. एनएचएम-११२५/प्र.क्र.४५५/एनएचएम (ई-१३२०९२५), दि.२७.१०.२०२६.

३) मा.आयुक्त, आ.से. तथा संचालक, रा. आ. अभियान, मुंबई यांचे मंजुर नस्तीनुसार.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सलग १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा कालावधी पूर्ण केलेल्या पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांची एक वेळची विशेष बाब म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग व इतर विविध विभागांतील नियमित समकक्ष पदांवर अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांच्या सेवा वर्ग करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

आवश्यकता : प्राप्त तक्रारींचे निराकरण एकसमान निकषांनुसार, पारदर्शक पद्धतीने व विहित कालावधीत होणे आवश्यक आहे. तसेच विविध संवर्गातील उमेदवारांच्या संबंधित बाबी असल्याने प्रथम विभागीय व त्यानंतर राज्यस्तरावरील समितीमार्फत या तक्रारींचा आढावा घेणे संयुक्तिक ठरेल.

प्रस्ताव : वरील पार्श्वभूमीवर, १) राज्यस्तरावर नियमित आरोग्य वरिष्ठ अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची एक तक्रार निवारण समिती गठीत करण्यास मान्यता मिळावी, आणि २) संबंधीत विभागस्तरावर देखील मुख्य प्रशासकिय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावा. असा प्रस्ताव आहे. समितीची प्रस्तावित रचना, कार्यकक्षा व कार्यपद्धती खालील प्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे.

अ) समितीची रचना-

ब) समितीचे कामकाज-

१. कार्यकक्षा: संदर्भ क्र. १ व २ च्या शासन निर्णयांशी संबंधित, (अ) सेवा वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांच्या व (ब) सेवा वर्ग न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्राप्त तक्रारींचा आढावा घेऊन त्यावर निर्णय/शिफारस करणे.

२. तक्रार सादर करण्याची पद्धत :

१) तक्रारदार कर्मचाऱ्याने सोबतच्या जोडपत्रातील नमुन्यात लेखी अर्ज त्या संबंधीत परिमंडळ कार्यालयस्तरावर त्या त्या परिमंडळांतर्गत असलेल्या जिल्हे/मनपा व इतर आरोग्य संस्थास्तरावरील कार्यरत कर्मचा-यांनी दि. ३०/११/२०२६ पर्यंत सादर करावा.

२) अर्जासोबत नियुक्ती आदेश, सेवा कालावधीबाबतचे वेतन स्लीप, सेवा खंड असल्यास मंजुरीचे पत्र, सेवा कालावधीबाबतचे अनुभव प्रमाणपत्र व इतर आवश्यक सर्व सर्व कागदपत्रे जोडावीत.

३) संबंधीत परिमंडळ कार्यालयस्तरावर सदर प्राप्त तक्रारींचे सोबतच्या नमुन्यात माहिती तयार करुन विभागीय समितीचे अभिप्राय घेण्यात येवून सदरील सर्व माहिती हार्ड व सॉफ्ट प्रतीत (तक्रार दारांच्या कागदपत्रांसह) राज्यस्तरावरील समिती समोर सादर करणेची जबाबदारी विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक यांची राहील इ. कार्यवाही करुन माहिती सादर करणेबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.

४) राज्यस्तरावरील सर्व तक्रारींचे (फक्त राज्यस्तरावरुन नियुक्ती आदेश निर्गमित पदांच्या तक्रारी ह्या NHM आस्थापनाकक्षस्तरावर घेवून त्याचे एकत्रिकरण करण्यात येईल. व राज्यस्तर समितीच्या बैठकित सादर करण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापना कक्षातील प्रशासकिय अधिकारी यांची राहील.

५) सर्व परिमंडळ कार्यालयस्तरावरुन प्राप्त तक्रारींचे अनुषंगाने राज्यस्तरावर गठीत समितीच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या प्राप्त सर्व तक्रारींचा आढावा आणि तक्रारींचे विभागनिहाय सादरीकरण घेऊन त्यावर निर्णय/शिफारस करणे व आश्यकता असल्यास शासनास प्रस्ताव सादर करणेची कार्यवाहीकरणे इत्यादी कार्यवाही व जबाबदारी राहील.

३. नोंदणी व छाननी : सदस्य सचिवांनी प्राप्त तक्रारींची स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन अर्जदारास पोच द्यावी. राज्यस्तरावर आस्थापनाकक्षात सदरील तक्रारींचे सकंलन करण्यात येईल. तक्रारींची प्राथमिक छाननी संबंधीत जिल्हास्तरावर करून संबंधित जिल्हा / कार्यालयाकडून आवश्यक अभिप्राय व अभिलेख पुढील ७ दिवसांत त्यांच्या सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी फाईल संबंधीत परिमंडळ कार्यालयस्तरावर एकत्रीतरित्या मागवावेत. सर्व तक्रारी संबंधीत परिमंडळस्तरावरुन प्राप्त होणे आवश्यक आहे. परस्पर राज्यस्तरावर तक्रारी सादर करु नयेत. त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

४. बैठका विभागीय व राज्यस्तरावरील समितीची बैठक अध्यक्षांच्या निर्देशानुसार घेण्यात यावी. प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त सदस्य सचिवांनी तयार करावे. आवश्यक वाटल्यास समिती तक्रारदारास व संबंधित कार्यालयाच्या प्रतिनिधीस म्हणणे मांडण्याची संधी देईल. त्यानुसार समितीव्दारा कार्यवाही करण्यात यावी.

६. निर्णयाचा आधार समितीने तक्रारींचा निर्णय संदर्भाधीन शासन निर्णयांतील तरतुदी व पात्रता निकषांनुसार, तसेच नियुक्ती प्राधिकारी यांच्या अभिप्रायास अनुसरुन कारणमीमांसेसह करण्यात यावा. निर्णय तक्रारदारास त्या त्या स्तरावरुन लेखी कळविण्यात यावा.

७. कालमर्यादा : समितीने तक्रारींचे निराकरण समिती गठीत झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांत पूर्ण करावे व कामकाजाचा अहवाल मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, रा.आ.अभियान तसेच शासनास सादर करावा.

८. मर्यादा : समितीस शासन निर्णयातील धोरणात बदल करण्याचा अधिकार असणार नाही. धोरणात्मक निर्णय आवश्यक असलेल्या प्रकरणांत समितीने शासनास शिफारस करावी.

९. सहकार्य : समितीने मागितलेली माहिती व अभिलेख सर्व संबंधित कार्यालयांनी ७ दिवसांत उपलब्ध करून द्यावा.

सदर समितीच्या कामकाजासाठी सदस्यांना कोणतेही मानधन अथवा भत्ता देय असणार नाही.

वरील दोन्ही स्तरावरील समितीने तक्रारींचा निर्णय संदर्भ क्र. १ व २ च्या शासन निर्णयांतील तरतुदी य पात्रता, सदर बाबत शासनाच्या वेळोवेळी निर्गमित समायोजन संदर्भातील मार्गदर्शक सुचनां व निकषांच्या अधीन राहून करावा, धोरणात्मक बदल आवश्यक वाटल्यास त्याबाबत शासनास शिफारस करावी.

सदर आदेश तात्काळ अंमलात येतील. कृपया त्यानुसार पुढील कार्यवाही करावी.

(मा. आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या मान्यतेने)

Related posts:

Leave a Comment