शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा-२०२५ ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक परिपत्रक Elementary intermediate drawing exam timetable 

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा-२०२५ ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक परिपत्रक Elementary intermediate drawing exam timetable 

परिपत्रक येथे पहा pdf download

उपरोक्त संदर्भीय दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुर्नरचित अभ्यासक्रमास सन २०१५ पासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चे आयोजन दिनांक २४ सप्टेंबर, २०२५ ते दिनांक २७ सप्टेंबर, २०२५ या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे.

संबंधित केंद्र प्रमुख यांना कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी

करताना फक्त (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी नोंदणी करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्याच्या

नावामध्ये चूक होऊ नये याकरिता सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने

https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावर व https://dge.msbae.in या लिंकवर भरावयाचे असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांना शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५

एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक परिपत्रक येथे पहा pdf download

सर्व संबंधित केंद्रप्रमुख, सहभागी शाळा, विद्यार्थी आणि पालक यांना कळविण्यात येते की, १२ सप्टेंबर २०२५ नंतर विद्यार्थी नोंदणीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसेच आकस्मिक खर्चाकरिता आवश्यक असणाऱ्या रक्कमेचा तपशील स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येईल. ऑनलाईन पध्दतीने करावयाची नोंदणी व संबंधित माहिती

अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट

https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावर व https://dge.msbae.in या लिंकवर उपलब्ध राहील.

परिपत्रक येथे पहा pdf download

Leave a Comment