शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना रक्कम घेतल्या बाबत marklist gunpatrika dakhala 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना रक्कम घेतल्या बाबत marklist gunpatrika dakhala 

संदर्भ : १

) श्री. गणेश मोहन गुप्ते यांचा ई-मेल द्वारे प्राप्त अर्ज, दिनांक १७/०५/२०२५.

२) श्री. प्रशांत कोरडे शहरप्रमुख, किनवट, जि. नांदेड यांचे १२/०५/२०२५ रोजीचे पत्र.

३) शासन निर्णय क्रमांकःसंकीर्ण-२०१५/ (५५/१५)/ समन्वय कक्ष, दि. ०४ जानेवारी, २०१६.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, “शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देत असताना रक्कम घेतल्याबाबत च्या तक्रारी संचालनालयास प्राप्त होत आहेत.

सद्यस्थितीत इ.१० वी, ११ वी व १२ वी चे निकाल जाहीर करण्यात आलेले असून विद्यार्थी पुढील शिक्षणाकरीता संबंधित शाळा, महाविद्यालयाकडे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट यांची मागणी करत आहे.

विशेषतः इंदापूर तालुक्यामधील सर्वच शाळा, महाविद्यालये वरील कागदपत्रे विद्यार्थ्यांस देताना प्रति विद्यार्थी २००/- बेकायदेशीरपणे गोळा करत आहे. त्यानुसार आपले अधिनस्त सर्व शाळा, महाविद्यालये यांना अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून कोणतीही वसुली विद्यार्थ्यांकडून करण्यात येवू नये याबाबत आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावेत. इंदापूर तालुक्यातील ज्या शाळांनी अशा पध्दतीने रक्कम घेतलेलो आहे अशा शाळांवर कार्यवाही करण्यात यावी व विद्यार्थ्यांकडून घेतलेले अतिरिक्त पैसे त्यांना परत करण्यात यावेत अशी मागणी तक्रारदाराने संबंधितांना केलेली आहे.

करीता संदर्भ क्र.३ मधील परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्याथ्यांना देत असताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही अवेध रक्कम वसूल केल्यास त्याविरुध्द कारवाई करणेबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास व अर्जदारास ई-मेल द्वारे सादर करण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment