बालविवाह मुक्त भारत अभियानाविषयी जनजागृती करण्याबाबत balvivah mukta bharat circular
संदर्भ:-१. सचिव, महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. १३८/२०२०-WW- Part (६), दि. २१.१०.२०२६
२. शासन पत्र क्रमांकः संकीर्ण-२०२६/ई- १९१५७५५/एस.डी.४ दि. ३ नोव्हेंबर, २०२६
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भाधीन शासन पत्र व सहपत्राची प्रत सोबत पाठविण्यात येत आहे.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क्रमांक २ च्या शासन पत्रान्वये शासनाने “महिला आणि बाल विकास मंत्रालयाने बालविवाहाची प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी “संपूर्ण शासन” आणि “संपूर्ण समाज” हा दृष्टिकोन स्वीकारून २७ नोव्हेंबर, २०२४ रोजी “बाल विवाह मुक्त भारत” (BVMB) अभियान सुरू केले. या हानिकारक प्रथेविरुद्ध जनजागृती, सामुदायिक सहभाग आणि समन्वित कृती बळकट करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेला सातत्यपूर्ण गती देण्यासाठी, १०० दिवसाचे ‘बाल विवाह मुक्त भारत’ (BVMB) जनजागृती अभियान दि. २१ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर, २०२६ या कालावधीत पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या अभियानास पाठिंबा देण्याची विनंती संदर्भाधीन पत्रान्वये करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने दि. २७ नोव्हेंबर, २०२६ च्या सुमारास राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना बालविवाह रोखणे आणि बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे याबाबत वयाला साजेसा जनजागृती उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहित करावे. क्षेत्रीय अधिकारी आणि नागरिकांना देखील “बाल विवाह मुक्त भारत” (BVMB) पोर्टलद्वारे बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रवृत्त करावे. व्यापक प्रसार सुनिश्चित करण्यासाठी “बाल विवाह मुक्त भारत’ (BVMB) अभियानाशी संबंधित सृजनशील साहित्य, चित्रफिती, प्रतिज्ञा साहित्य आणि इतर सबंधित माहिती आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रसारित करावी. या अभियांतर्गत प्रतिज्ञा घेण्यासाठी सविस्तर मार्गदर्शिका सुलभ संदर्भासाठी आणि प्रसारासाठी सोबत जोडली आहे.
उपरोक्त निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करून राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांना “बाल विवाह मुक्त भारत’ (BVMB) अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ते निर्देश आपल्या स्तरावरून निर्गमित करावेत व केलेल्या कार्यवाही बाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा,” असे संचालनालयास सूचित करण्यात आलेले आहे.
त्याअनुषंगाने आपल्या विभागातील /जिल्हयातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या शासन पत्रातील सूचना निदर्शनास आणून “बाल विवाह मुक्त भारत’ (BVMB) अभियान प्रभावीपणे राबविणेबाबत सर्व संबंधितांस आपल्या स्तरावरून सूचित करावे.











