विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ मतदार नोंदणी करीता विशेष शिबिरे आयोजित करणेबाबत Special Intensive Revision paripatrak
संदर्भ :
१) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक- २३/२०२५-ERS (Vol-II),
दिनांक १४.०५.२०२६.
२) या कार्यालयाचे समक्रमांकाचे पत्र दि.०४.०९.२०२६ व ०९.०९.२०२६.
३) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक २३/२०२५-ERS (Vol-II),
दिनांक १२.१०.२०२६
महोदय/महोदया,
भारत निवडणूक आयोगाने दिनांक १२.१०.२०२६ च्या पत्रान्वये विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहिर केलेले आहे. त्यानुसार दावे व हरकती सादर करण्यासाठी दिनांक ३१.०८.२०२६ ते २६.१०.२०२६ अशी मुदतवाढ दिलेली असून, अंतिम मतदार यादी दिनांक १६.११.२०२६ रोजी प्रसिध्द करावयाची आहे.
२. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत मतदार नोंदणी करीता सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबीरे आयोजित करण्याबाबत दिनांक ०९.०९.२०२६ च्या पत्रान्वये आपणांस कळविण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबीरे आयोजित करण्यात आलेली आहेत. आता, भारत निवडणूक आयोगाने दावे व हरकती सादर करण्याकरीता देण्यात आलेली दिनांक २६.१०.२०२६ पर्यतची मुतदवाढ विचारात घेवून, जास्तीत जास्त नागरीकांना / नव मतदारांना आपली नावे मतदार यादी मध्ये नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने दिनांक १७, १८, २४ व २५ ऑक्टोबर, २०२६ (शनिवार/रविवार) या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबीरे आयोजित करण्यात यावीत,
३. दिनांक ०९.०९.२०२६ च्या पत्रान्वये यासंदर्भात देण्यात आलेल्या सर्व सूचना उपरोक्त दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष नोंदणी शिबीराकरीता लागू राहतील. याबाबतचा नियमित अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा, ही विनंती.











