अर्जित रजा अथवा वैद्यकीय रजा मंजूर करण्याबाबत arjit raja vaidhyakiy raja
कर्मचा-यांमध्ये नैमित्तिक रजा खर्च करुन टाकण्याची व नैमित्तिक रजा शिल्लक नसल्यामुळे अल्पकालावधीसाठी अर्जित रजा मागण्याची प्रवृत्ती वावत चालल्याचे निदर्शनास आल्यामुळे शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-आस्था-१०९६/प्र.क्र.१२७/९६/१९, दि.२५ ऑक्टोबर, १९९६ अन्वये कमीत कमी पाच दिवसांचा परिवर्तित / अर्जित रजेची मागणी असेल तरच रजा मंजूर करण्याचा विचार करण्यात येईल असे ठरविण्यात आले होते. तथापि, अल्प कालावधीसाठी बिशिष्ट कारणांकरिता रजा आवश्यक असतांना नाईलाजास्तव अधिकारी / कर्ममा-यान किमान पाच दिवसाची अर्जित रजा परिवर्तित रजा येणे भाग पडत होते हे विचारात घेऊन तसेच कर्मचा-यांच्द विनंतीचा विचार करुन असा निर्णय घेण्यात माला आहे की, जर अशी रजा संयुक्तिक कारणासाठीच घेतली माहे अरे आस्थापना अधिका-यांचे समाधान झाल्यास तीन दिवसांची अर्जित रजा अथवा परिवर्तित रजा मंजूर करण्यायाबा विचार करण्यात यावा.
मंत्रालयातील सर्व विभागांतील आस्थापना शाखांस कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्या विभागातंत्र अधिकारी / कर्मचा-यांस तीन दिवसांची अर्जित / परिवर्तित रजा मंजूर करताना सदर परिपत्रकातील सूचनांर काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच सदर परिपत्रक त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख व कार्याल मुख यांच्या निदर्शनास आणावे.











