सन २०२४-२५ संचमान्यतेनुसार शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे समायोजन करणेबाबत sanchmanyata samayojan
संदर्भः १. शासन निर्णय क्रमांक. संकीर्ण-२००/प्र.क्र.६७/टिएनटी-१ दि.०४.०४.२०२५.
२. मा. आयुक्त (शिक्षण) यांचेकडील दि.२७.०५.२०२५ रोजीची बैठकीतील निर्देश.
३. संचालनालयाचे पत्रक्र. शिसंमा/शिक्षकेत्तर पदभरती/कार्यासन – टि-४/२५९२ दि.२८.०५.२०२५.
४. संचालनालयाचे पत्रक्र. शिसंमा/शिक्षकेत्तर समायोजन/कार्यासन टि-४/१४८१६१६ दि.०९.१०.२०२५.
५. संचालनालयाचे पत्रक्र. शिसंमा/शिक्षकेत्तर समायोजन/कार्यासन टि-४/१५४८३८६
दि.१८.११.२०२५
उपरोक्त संदर्भिय संचालनालयाचे संदर्भ क्र.४ च्या पत्रान्वये सन २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार मंजूर व रिक्त, अतिरिक्त बाबत पदांची माहिती संचमान्यता प्रणालीच्या वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार वर्ग-३ च्या शिक्षकेत्तर संवर्गातील १३०१ ( अधीक्षक या संवर्गातील ०४ पदे वगळून) अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे अन्यत्र रिक्त असणा-या शाळांमधील पदावर समायोजन करण्याची कार्यवाही करावी तसेच समायोजन करण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय पदभरतीवाचत निर्णय घेत नसल्याने समायोजनाची कार्यवाही तात्काळ करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि. २१.११,२०२५ पर्यंत संचालनालयास तात्काळ सादर करणेबाबत संचालनालयाचे संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.
सबब सन २०२३-२४ च्या शिक्षकेत्तर संच मान्यतेमध्ये मुद्दा क्रमांक ०२ मध्ये ‘शासन निर्णय दिनांक २८.०१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार शिक्षकेत्तर पदांची संचमान्यता दिनांक ३०.०९.२०२३ रोजी नोंदविलेली व संच मान्यता निर्गमित केल्याच्या दिनांकाअखेर आधार वैध विदयार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करतांना अनुज्ञेय होणारी पदे मूळ पायाभूत (संच मान्यता सन २०१८-१९ शासन निर्णय दिनांक ०६.०२.२०२३ वगळून) पदांपेक्षा अधिक होत असतील तर अशा पदांच्या मंजूरीची कार्यवाही शासनाच्या पूर्व परवानगीने करावी लागेल असे नमुद केले आहे. तरी २०२४-२५ शिक्षकेत्तर संचमान्यतेनुसार मंजूर व रिक्त पदावर समायोजन करताना शासन निर्णय दि.२८.०१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेच्या पटसंख्येच्या आधारे मुळ पायाभुत पदापेक्षा अधिक होणा-या पदावर समायोजन न करता मुळ पायाभुत (सन २०१८-१९) पदाच्या मर्यादेत पदावर समायोजन करावे व २८.०१.२०१९ च्या आकृतीबंधानुसार शिक्षकेत्तर पदांची संचमान्यता दिनांक ३०.०९.२०२३ रोजी नोंदविलेली व संच मान्यता निर्गमित केल्याच्या दिनांकाअखेर आधार वैध विदयार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करतांना अनुज्ञेय होणारी पदे मूळ पायाभुत (संच मान्यता सन २०१८-१९ शासन निर्णय दिनांक ०६.०२.२०२३ वगळून) पदांपेक्षा अधिक होत असतील तर अशा पदाला प्रशासनची परवानगी घेणे आवश्यक आहे, तथापि सदर पदावर शासनाच्या परवानगीशिवाय नव्याने भरती अथवा समायोजन
अनुषंगिक कार्यवाही केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा प्रकारची कार्यवाही केल्याचे निदर्शनास आल्यास आपणांवर नियमानुसार कालवाई प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्याची.









