फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत ssc chitrakala lokakala 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत ssc chitrakala lokakala

संदर्भ- १. शालेय शिक्षण व कीडा विभाग, शासन निर्णय संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/एस.डी.२.

दि.२४/११/२०१७.

Download

२. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांचे पत्र क. कशिमं/शारेप/सहा/२०२५/१३००

दि.०४ डिसेंबर २०२५.

३. अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ, जळगांव, ता. जि. जळगांव यांचे पत्र दि.०८/१२/२०२५.

उपरोक्त संदर्भिय विषयांस अनुसरून कळविण्यात येते की, संदर्भिय क. १ च्या शासन निर्णयानुसार शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची कार्यवाही मंडळामार्फत करण्यात येते. सदर शासन निर्णयातील मुद्दा क. ५ मध्ये याबाबतचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेकडे दि.१५ डिसेंबर अखेर व माध्यमिक शाळांनी संबंधित विभागीय मंडळाकडे सदरचे प्रस्ताव सादर करावयाची अंतिम तारीख १५ जानेवारी अशी नमूद आहे.

तथापि, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांनी संदर्भिय क. २ च्या पत्रान्वये कळविल्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिडीएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चा निकाल जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवडयात जाहीर करण्यात येणार असल्याने शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव शाळांनी विभागीय मंडळांकडे सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे मुटनवाढ या वर्षापुरतीच देण्यात येत आहे.

तरी उपरोक्तनुसार सर्व विभागीय मंडळांनी योग्य ती कार्यवाही करावी. सदर मुदतवाढ आपल्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून देवून त्याप्रमाणे मुदतीत कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित करावे. तसेच आपल्या स्तरावरून याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी व कोणताही पात्र विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment