अंशतः शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने दि.८ व ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद असलेबाबत shala tappa vadha puravani magani
संदर्भः- शिक्षण समन्वयक संघ, महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन दिनांक १/०७/२०२५
उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय निवेदन सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.
अंशतः शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने दि.८ व ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद ठेवणेबाबत शिक्षण समन्वयक संघ, महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. तरी विद्यार्थी हीत लक्षात घेता दि.८ व ९ जुलै २०२५ रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही यांची आपले स्तरावरून दक्षता घ्यावी.










