महाराष्ट्र राज्यातील सध्या कार्यरत शिक्षणसेवकांच्या मानधनात प्रतिमाह रु. २०,०००/- वाढ करून शिक्षणसेवकांना सुधारित मानधन लागू करण्याबाबत shikshansevk sudharit mandhan circular
संदर्भः-१. शिक्षण सहसंचालक (प्रशासन, अंदाज व नियोजन) शिक्षण आयुक्तालय म.रा. पुणे यांचे पत्र दि. – १६/१०/२०२६ कार्यालयास प्राप्त आवक क्रमांक ८३५१८५४ दि. दि.२१/१०/२०२६ २. श्री. संदीप कांबळे, अध्यक्षः युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य. मु.पो. बिल्लाळी ता. मुखेड, जि. नांदेड यांचे पत्र दिनांक – ०१/१०/२०२६
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतच्या श्री. संदीप कांबळे, अध्यक्षः युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र राज्य. मु.पो.बिल्लाळी ता. मुखेड, जि. नांदेड महाराष्ट्र राज्य, यांचे संदर्भिय निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहे. संदर्भिय निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्यातील सध्या कार्यरत शिक्षणसेवकांच्या मानधनात प्रतिमाह रु. २०,०००/- वाढ करून शिक्षणसेवकांना सुधारित मानधन लागू करण्याबाबत विनंती केली आहे.
सदरहू निवेदनातील मागण्या या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असल्याने उपरोक्त संचालनालयास
सादर केलेले निवेदन उचित मार्गदर्शनास्तव शासनास सविनय सादर.










