केंद्र पुरस्कृत पीएम श्री (PM Schools for rising India) योजनेसाठी सन २०२५-२६ मध्ये सर्वसाधारण घटकासाठी पुनर्वितरणाने प्राप्त निधी वितरित करण्याबाबत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र पुरस्कृत पीएम श्री (PM Schools for rising India) योजनेसाठी सन २०२५-२६ मध्ये सर्वसाधारण घटकासाठी पुनर्वितरणाने प्राप्त निधी वितरित करण्याबाबत

१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३१/एसडी-६ दि.२४.०९.२०२५.

प्रस्तावना :-

“पीएम श्री ” (PM Schools for Rising India) या योजनेअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील सर्व घटकांचा समावेश करण्याच्या उद्देशाने देशातील सुमारे १५,००० हून अधिक शाळा विकसित करण्यासाठी “पीएम श्री (PM Schools for Rising India) “ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. PM SHRI हि योजना SNA SPARSH या कार्यप्रणालीअंतर्गत कार्यान्वित करण्यात (On Boarding) करण्यात आलेली आहे. त्यामुळे, SNA SPARSH या कार्यप्रणालीअंतर्गत विहित कार्यपद्धती नुसार केंद्र शासनाकडून ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) (Recurring आवर्ती) या लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा समरुप राज्य हिस्सा (६० : ४०) लेखाशीर्ष ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) (Recurring आवर्ती) संदर्भ क्र.१ शासन निर्णयान्वये रु. ९१.७८ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

२. केंद्र शासनाकडून ज्या उद्दिष्टाअंतर्गत निधी प्राप्त झाला आहे त्याच उद्दिष्टाखाली निधिचा विनियोग करण्याबाबत केंद्र शासन तसेच वित्त विभागाच्या सुचना/निर्देश आहेत. राज्यात पीएम श्री शाळा विकसित करणे या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता केंद्र हिश्यापोटी लेखाशिर्ष २२०२ के ७६७ मधील उद्दिष्ट ३१-सहायक अनुदाने मधून ३५-भांडवली मत्तेच्या निमिर्तीकरिता अनुदान या उद्दिष्टामध्ये रु.२१.१९५६ कोटी, तसेच केंद्र हिश्याच्या समरुप राज्य हिश्यासाठी लेखाशिर्ष २२०२के७७६ मधील उद्दिष्ट ३१-सहायक

अनुदाने मधून ३५-भांडवली मत्तेच्या निमिर्तीकरिता अनुदान या उद्दिष्टामध्ये रु.१९.१३०४ कोटी इतका निधी पुनर्वितरणास व निधी वितरणास वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

३. त्यानुसार, पीएम श्री शाळा विकसित करणे योजनेकरिता सर्वसाधारण घटक उप योजनेंतर्गत प्राप्त केंद्र हिश्याकरिता रु.२१.१९५६ कोटी व राज्य हिश्याकरिता रु.१९.१३०४ कोटी असा एकूण रु.४०.३२६ कोटी इतका निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (BEAMS) वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती

शासन निर्णय :

१. पीएम श्री (PM Schools for Rising India) या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीकरिता सर्वसाधारण घटक उप योजनेंतर्गत पुनर्वितरणाने प्राप्त केंद्र हिश्याकरिता रु.२१.१९५६ कोटी व राज्य हिश्याकरिता रु.१९.१३०४ कोटी असा एकूण रु.४०.३२६ कोटी इतका निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना खालील तक्त्यामध्ये नमूद लेखाशिर्षनिहाय सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर निधी खर्च करताना केंद्र शासनाच्या दि.२४.०७.२०२५ रोजीच्या निधी वितरण आदेशामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करण्यात यावे. वरील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे ज्या घटकांसाठी व ज्या बाबींसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. त्याच मर्यादेत त्या घटकांसाठी व बाबींसाठी निधी खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी.

३. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी सदर तरतुद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तिय नियम तसेच संदर्भाधीन वित्त विभागाचे परिपत्रक दि.०७.०४.२०२५ अन्वये दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.

४. सदर निधी आहरीत करुन वितरीत करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व उप संचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तर म्हणून घोषित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. अनौ.सं.३९/२६/१८.२.२६, दि.१८.०२.२०२६ व वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.९६/व्यय-५, दि.२७.०२.२०२६ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०३१०१८१८५४८२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Download

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts: