राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये एक विशेष बाब म्हणून निवड करणेबाबत gunvant students scholarship circular
महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांकः-शिवृत्ती-२०२६/प्र.क्र.६०/शिक्षण-२ नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- १२ नोव्हेंबर २०२६.
वाचा :-
१) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, क्र. शिवृत्ती २०१८/प्र.क्र.११८/शिक्षण, दिनांक ११.१०.२०१८.
२) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, क्र. शिवृत्ती २०२६/प्र.क्र.१५/शिक्षण, दिनांक १८.०८.२०२६.
३) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, क्र. शिवृत्ती २०२६/प्र.क्र.१५/शिक्षण, दिनांक ०४.११.२०२६.
प्रस्तावना :-
राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन २०१८-१९ पासून संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेली आहे. त्यानुसार, सन २०२६-२७ करीता संदर्भ क्र.३ व ४ अन्वये ७५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे.
सन २०२६-२७ मध्ये छाननी समितीने पात्र ठरविलेल्या १७२ विद्यार्थ्यांपैकी कु. रेवती सूर्यकांत कोरवी यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑस्ट्रेलीयातील University of Sydney या विद्यापीठामध्ये Master of Computer Science या २ वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्राप्त झाला असून, त्यांचा अर्ज पात्र ठरविण्यात आला आहे. तथापि, कु. रेवती यांना मार्च २०२५ पासून Ewing Sarcoma (कर्करोग) या गंभीर आजाराचे निदान झाले असल्यामुळे व त्यांचे वडील सेवानिवृत्त शिपाई असल्यामुळे या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी विशेष बाब म्हणून परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
कु. रेवती सूर्यकांत कोरवी, यांना ऑस्ट्रेलीयातील University of Sydney या विद्यापीठामध्ये Master of Computer Science या २ वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अभियांत्रिकी या शाखेत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता परदेशी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एक विशेष बाब म्हणून याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
२. कु. रेवती सूर्यकांत कोरवी यांनी त्यांच्या निवड अर्जासोबत सादर केलेल्या जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र तसेच, इतर कागदपत्रांची व तत्सम बाबींची पडताळणी प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या गृहचौकशीच्या अटीच्या अधिन राहून करण्यात येत आहे. यासंदर्भात कु. कोरवी यांची गृहचौकशी बाबतची कार्यवाही क्षेत्रीय कार्यालयामार्फत संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांनी ५ दिवसात पूर्ण करावी. शासन निर्णय दि.११.१०.२०१८, दि.२०.०७.२०२३, दि.३०.१०.२०२३ व दि.२५.०७.२०२४ मधील नमूद सर्व अटी व शर्ती यांची पूर्तता करण्याच्या अधीन राहून त्या अंतिम निवडीस पात्र राहतील. गृहचौकशीअंती कु. कोरवी अपात्र ठरल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
३. परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरीता निवड करण्यात आलेल्या कु. रेवती सूर्यकांत कोरवी यांना अनुज्ञेय शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.
४. परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरीता निवड करण्यात आलेल्या कु. रेवती सूर्यकांत कोरवी यांच्याकडून संदर्भाधीन दि.११.१०.२०१८ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विहीत करण्यात आलेली हमीपत्रे, तसेच मूळ कागदपत्रांची तपासणी करूनच त्यांना शिष्यवृत्ती वितरीत करावी. कु. कोरवी यांना कोणत्याही परिस्थितीत अभ्यासक्रम तसेच विद्यापीठ बदलून मिळणार नाही अथवा अभ्यासक्रमाच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार नाही.
५. कु. रेवती सूर्यकांत कोरवी यांना शासनामार्फत परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली असल्याने त्यांचे शिक्षण संपल्यानंतर देशाची सेवा करणे व त्यांच्या ज्ञानाचा फायदा देशाला करुन देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने शिष्यवृत्ती मंजूर करण्यापूर्वी हमीपत्र (BOND) लिहून घेणे बंधनकारक राहील. कु. कोरवी यांच्याकडून विद्यापीठ बदल करणे, अभ्यासक्रमात बदल करणे, अभ्यासक्रमासाठी मुदतवाढ देणे इत्यादी बाबतीत मागणी होणार नाही, अशा आशयाचे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून लिहून घेणे बंधनकारक राहील.
६. परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेल्या कु. कोरवी यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ज्या शैक्षणिक संस्थेत / विद्यापीठात अथवा अभ्यासक्रमास मान्यता दिलेली आहे, ते ठिकाण वा अभ्यासक्रम परस्पर बदलल्यास त्यांच्याकडून शिष्यवृत्तीची रक्कम संपूर्णतः वसूल करण्यात येईल.
७. शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या एकूण खर्चाच्या रकमेपैकी संबंधित शैक्षणिक वर्षाचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता (अनुज्ञेय), आरोग्य विमा, जाण्या-येण्याचा विमान प्रवास खर्च व आकस्मिक खर्च (अनुज्ञेय) यांची रक्कम संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांनी संबंधित विद्यापीठाकडून प्रमाणित माहिती प्राप्त करून घेऊन, शिक्षण फी संबंधित विद्यापीठाच्या बँक खात्यात आणि निर्वाह भत्ता व अनुषंगिक खर्चाची रक्कम नियमानुसार कु. रेवती कोरवी यांच्या बँक खात्यात जमा करावी.
८. याबाबत होणारा खर्च हा मागणी क्रमांकः झेडजी ०३, प्रधानशीर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक यांचे कल्याण ०३, मागासवर्गीयांचे कल्याण, २७७- शिक्षण, ०२ शिष्यवृत्ती विद्यावेतन (०२) (१८) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परेदशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती (२२२५ एफ २१८) (कार्यक्रम), ३४ शिष्यवृत्त्या /विद्यावेतने या लेखाशिर्षाखाली खर्ची घालून त्या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.
९. याकरीता संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांना नियंत्रक अधिकारी तसेच लेखा अधिकारी, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
१०, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२६१११२१२५९४७५८३४ आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










