CTET परीक्षा PYQ ८ फेब्रुवारी, २०२६ पेपर क्रमांक – १ विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरसूचि उपलब्ध ctet exam pyq series available 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CTET परीक्षा PYQ ८ फेब्रुवारी, २०२६ पेपर क्रमांक – १ विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरसूचि उपलब्ध ctet exam pyq series available 

1. पुढीलपैकी गोष्ट सांगण्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे ?

गोष्ट ऐकण्याने मुलांना मदत मिळते.

(१) प्रश्न सोडवण्याची क्षमता विकसित करण्यास

(२) जीवनात नीती मूल्यांचे अनुसरण करण्यास

(३) नवीन शब्द आणि शब्दसंग्रह विस्तारण्यात

(४) वाक्य रचना शिकण्यास

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

2. शिक्षिकेला पाठातील एका घटकाशी सुसंगत अशी चित्रफीत सापडते. ती चित्रफितीच्या अवतीभवती जोड कार्य करायचे ठरवते. या जोड कार्यातून तिला विद्यार्थ्यां-च्या कोणत्या कौशल्याचे उत्तेजन करणे आहे?

(१) स्वतंत्रपणे शिक्षकाचे काम करणे

(२) भाषा जागरूकता विकसित करणे

(३) स्वतःच्या कार्याचे मूल्यमापन

(४) दोघांनी मिळून वेगाने कार्य करता येणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

3. भाषा शिक्षणात लघुकथा आणि इतर लेखन प्रकारांचा संग्रह पूरक वाचन म्हणून नेमण्यात येतो. या पूरक वाचनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट कोणते ?

(१) नीतिपर वाचनाला उत्तेजन देणे

(२) विस्तृत वाचनाला उत्तेजन देणे

(३) बहुभाषिकतेला उत्तेजन देणे

(४) गहन वाचनाला उत्तेजन देणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

4. इयत्ता पाचवीची शिक्षिका विद्यार्थ्यांना गोष्ट लिहायला सांगते. मुले कथा लिहीत असताना शिक्षिका वर्गात चक्कर मारते आणि ज्या मुलाला नवीन शब्द हवा असेल त्याला आणि चुकत असलेल्या मुलांना मदत करते. शिक्षिकेची भूमिका म्हणजे-

(१) मदतगार

(२) उपचारकर्ता

(३) प्रबंधक

(४) नियोजनकार

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

5. भाषा शिक्षकाची पुढीलपैकी कोणती प्राथमिक जबाब-दारी आहे ?

(१) विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या गटांत विभागणी करणे

(२) विद्यार्थ्यांना सूचना देणे

(३) विद्यार्थ्यांची संभाषणात्मक गरज लक्षात घेणे

(४) अध्यापनासाठी सामग्रीची निवड करणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

6. विधान (A) : वाचन हे अचूक शब्द उच्चारण्यापेक्षा काही जास्त असते.

कारण (R) : वाचन म्हणजे उकल करणे.

पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.

(१) (A) बरोबर (R) चूक

(२) (A) चूक

(R) बरोबर

(३) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R)

हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.

(४) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत मात्र (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

7. भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती मान्यता चुकीची आहे?

(१) भाषा शिक्षणात संभाषणात्मक उपक्रमांवर भर देण्यात यावा.

(२) भाषा शिक्षणात बोलण्यापेक्षा लिहिण्यावर जास्त भर देण्यात यावा.

(३) विद्यार्थी वास्तव परिस्थितीत भाषा वापरण्याचा प्रयत्न करून भाषा आत्मसात करतात.

(४) विद्यार्थ्यांची प्रथम भाषा त्याच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

8. पुढीलपैकी कोणता घटक भाषा ग्रहणाच्या वर्तनवादी (Behaviourist) सिद्धान्ताशी संबंधित नाही ?

(१) प्रयत्न आणि चुका (Trial and error)

(२) सामाजिक संभाषण

(३) व्यापारात्मक अभिसंधान (Operant Conditio-ning)

(४) कोरी पाटी (Empty vessel)

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

9. विद्यार्थ्यांना …. संपर्कात आणून पूर्णपणे गुंतवून घेतले पाहिजे.

(१) लहान वयापासून अनेक मौखिक भाषांच्या

(२) लहान वयापासून अनेक लिखित भाषांच्या

(३) लहान वयापासून दोन मौखिक भाषांच्या

(४) लहान वयापासून दोन लिखित भाषांच्या

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

10. विधान (A) : रेखाटणे/चित्रे ही प्राथमिक साक्षरतेतील लेखनाची सुरुवात आहे.

कारण (R) : चित्रे/रेखाटणे हे संकेत असतात आणि अर्थवाहक असतात.

पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.

(१) (A) बरोबर (R) चूक

(२) (A) चूक (R) बरोबर

(३) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.

(४) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

11. एका भाषा उपक्रमात शिक्षिका वेगवेगळ्या क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचा गट तयार करते. या प्रकारचा गट तयार करण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे

(१) विद्यार्थ्यांना एकमेकांना मदत करण्यास प्रोत्साहन देणे

(२) शिक्षकाचा भार कमी करणे कारण शिक्षक प्रत्येकावर लक्ष ठेवू शकत नाही

(३) कमकुवत विद्यार्थी ओळखणे

(४) त्यांच्या क्षमतेत व्यक्त होण्यासाठी वाव देणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

12. विद्यार्थ्याने कथा त्याच्या शब्दांत सांगणे या उपक्रमातून कोणत्या घटकाचे मूल्यमापन करता येते?

(१) आकलन

(२) स्मरण

(३) अचूकता

(४) ओघवता

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

13. विधान (A) : उपचारात्मक शिक्षण हे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील अंतर्भूत घटक आहे.

कारण (R) : उपचारात्मक शिक्षण म्हणजे पुन्हा शिकवणे, मात्र त्याच पद्धतीने शिकवणे गरजेचे नाही ज्यातून भाषिक घटक नीट पाठ केले गेले नव्हते.

पुढीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा.

(१) (A) बरोबर (R) चूक.

(२) (A) चूक (R) बरोबर

(३) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.

(४) (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत मात्र (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

14. किमान-जोडी (Minimal pair) सराव हा कशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल?

(१) उच्चारण

(२) वाचन आकलन

(३) व्याकरण.

(४) शब्दसंग्रह

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

15. पायाभूत पातळीवरची मुले सहज आणि उत्तम प्रकारे आत्मसात करतात.

(१) त्यांच्या घरच्या भाषेत

(२) इंग्रजी माध्यमात

(३) शिक्षणाचे माध्यम

(४) अधिकारिक भाषेत

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

Leave a Comment