CTET परीक्षा PYQ ७ फेब्रुवारी, २०२६ पेपर क्रमांक – २ प्रश्नपत्रिका उत्तरसूची उपलब्ध ctet exam questions paper available
१. १२ ते १८ महिन्यांच्या वयात मूल समजता येतील असे अनेक एकेक ध्वनी उच्चारतो. नेहमीच्या वस्तूंसाठी मूल ज्या एकेक संज्ञा (ध्वनी) उच्चारतो हा काळ म्हणजे-
(१) टेलिग्राफिक भाषा (Telegraphic speech)
(२) शब्द-वाक्य अवस्था (Holophrastic stage)
(३) बडबडणे (Babbling)
(४) गुजबुजणे (Cooing)
२. वाचन आणि लेखन कौशल्याच्या संदर्भात पुढील विधाने वाचा.
(A) वाचन करण्याच्या क्षमतेचा परिणाम लेखनाच्या क्षमतेवर होतो.
(B) वाचन आणि लेखन या दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया असून त्या स्वतंत्रपणे विकसित होतात.
अचूक पर्याय निवडा.
(१) A बरोबर आहे आणि B चूक आहे.
(२) A आणि B दोन्ही चूक आहेत.
(३) A चूक आहे आणि B बरोबर आहे.
(४) A आणि B दोन्ही बरोबर आहेत.
३. सर्व भाषांमध्ये काही समान गुणधर्म असतात, त्यांना काय म्हणतात ?
(१) भाषा सार्वत्रिकता (Language Universals)
(२) प्रयुक्ती (Register)
(३) बोली (Dialect)
(४) द्वैभाषिकता (Diglossia)
४. वर्गात भाषा विविधतेचा स्वीकार म्हणजे-
(१) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पकतेत हास होतो ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळतो.
(२) याचा भाषा शिकण्यावर काहीही परिणाम होत नाही.
(३) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि कल्पकता यात वाढ होते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
(४) भाषिक अस्खलितता प्राप्त करण्यात अडथळा.
५. उदयोन्मुख साक्षरतेमध्ये छापील साहित्याविषयी जागरू-कता नसल्याचे वैशिष्ट्य असलेला पुढीलपैकी कोणता पर्याय आहे?
(१) अक्षरे आणि शब्दातील फरक ओळखणे
(२) डावीकडून उजवीकडे आणि वरपासून तळापर्यंत वाचन केले जाते
(३) पूर्ण वाक्य वाचले जाते
(४) पुस्तकाची हाताळणी
६. सुरुवातीच्या पातळीवर केलेल्या वाचनकौशल्याची फलनिष्पत्ती पुढे दिलेली आहे-
(A) लहान उताऱ्याचे वाचन अगदी बरोबर आणि अस्खलितपणे आवाजाच्या योग्य चढउतारासह, योग्य तेथे विराम घेऊन आणि आवाजातील योग्य त्या बदलासह केले जाते.
(B) परिचित शब्द असलेल्या वाक्यांचे वाचन स्पष्टपणे केले जाते.
(C) लहान उताऱ्याचे वाचन स्पष्टपणे, आवाजातील योग्य चढउतारासह आणि योग्य तेथे विराम घेऊन केले जाते.
विकासाच्या क्रमानुसार उपरोक्त मुद्द्यांची मांडणी करा.
(१) B, C, A
(२) A, C, B
(३) С, А, В
(४) A, B, C
७. पुढीलपैकी कोणता पर्याय विस्तृत श्रवणाचा भाग नाही ?
(१) मुख्य कल्पनेसाठी श्रवण करणे.
(२) निष्कर्ष काढणे.
(३) निश्चित तथ्य आणि माहितीसाठी श्रवण करणे.
(४) ढोबळमानाने श्रवण करणे.
८. वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती कृती केली जात नाही?
(१) बहुपर्यायी प्रश्न असलेल्या वाक्याचे वाचन करणे.
(२) सूचक चिन्हात असलेल्या चित्रातून शब्द ओळखणे.
(३) कथा कथन वर्गाचे शिक्षिकेकडून आयोजन करणे.
(४) मोठ्याने वाचन करणे.
९. पुढीलपैकी कोणते कथन योग्यपणे ‘धावते मजकूर कथन’ करणे स्पष्ट करते?
(१) विद्यार्थी जोडीने कार्य करतात. मजकुराचे अर्ध्या भागात विभाजन केले जाते. एक विद्यार्थी त्याच्या सोबत्यासाठी वाचन करतो तेव्हा दुसरा सोबती लेखन करतो, दोघेही पूर्ण मजकुरामाठी कार्य करतात.
(२) विद्यार्थी जोडीने कार्य करतात. एक विद्यार्थी धावत्या मजकुराचे अनुकरण करतो आणि सोबत्याला तो सांगतो, सोबती त्याचे लेखन करती
(३) शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांना शब्द/वाक्याचे धावते मजकूर कथन करतात आणि विद्यार्थी त्याची नोंद घेतात.
(४) विद्यार्थी मजकुराचे विविध भाग ऐकतात किंवा वाचतात, त्यानंतर दिलेली कृतीपूर्ण करण्यासाठी माहितीचे एकमेकांसोबत आदान-प्रदान करतात
१०. लहान मूल भाषा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता घेऊन जन्माला येतं. भाषा ग्रहण करण्याच्या या कल्पनेला पुढीलपैकी कशाचे समर्थन आहे ?
(१) बौद्धिकतावादी (Cognitivist)
(२) सामाजिक संबंधवादी (Social interactionist)
(३) वर्तणूकवादी (Behaviourist)
(४) देशीवादी (Nativist)
११. प्रक्रिया लेखनपद्धतीमध्ये, लेखन प्रक्रियेतील ठळक घटक लेखक औपचारिकपणे त्याचे काम म्हणून मोठ्या श्रोतावर्गापुढे सादर करतो. त्याला पुढीलपैकी काय म्हणता येईल ?
(१) प्रकाशन (Publication)
(२) संपादन (Editing)
(३) उजळणी (Revising)
(४) प्रारूपलेखन (Drafting)
१२. मजकुरातील कठीण शब्दाची हाताळणी करण्यासाठी, भाषा शिक्षक अशा शब्दांना मातृभाषेत भाषांतरित करतात आणि नंतर ते शब्द विद्यार्थ्यांना पाठ करायला सांगतात. यासाठी वापरलेल्या पद्धतीला पुढीलपैकी काय म्हणतात ?
(१) प्रत्यक्ष पद्धती (Direct method)
(२) संरचना पद्धती (Structural approach)
(३) संभाषणात्मक पद्धती (Communicative app-roach)
(४) व्याकरण भाषांतर पद्धती (Grammar translation method)
१३. विद्यार्थी एखादे काम मदतीशिवाय करतात किंवा तेच काम ते वरिष्ठांच्या मदतीने अथवा आपल्या सवंगड्यांच्या मदतीने करतात. या दोहोंमधील अवकाश म्हणजे-
(१) सान्निध्य विकासाचा प्रांत (Zone of proximal Development)
(२) यशाचा प्रांत (Zone of achievement)
(३) दूरस्थ अध्ययन (Distance learning)
(४) परिपक्वतेची पातळी (Level of maturity)
१४. मेंदूमध्ये झालेल्या क्षतीमुळे होणारी भाषिक अक्षमता ज्यात भाषिक रूपांना समजणे किंवा त्यांचा उच्चार करण्यास अडचण येते. ते म्हणजे-
बि
(१) डिस्लेक्सिया (Dyslexia)
(२) डिस्कॅल्क्युलिया (Dyscalculia)
(३) डीसारथ्रिया (Dysarthria)
(४) अफासिया (Aphasia)
१५. भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. या प्रक्रियेला काय म्हणता येईल ?
(१) उत्पादकता
(३) विस्थापन
(२) स्वच्छंदता
(४) सांस्कृतिक परिवाहन










