CTET परीक्षा डिसेंबर 2024 विषय- मराठी पेपर क्रमांक – १ प्रश्न उत्तरासहित उपलब्ध ctet exam questions paper with answer key
१. मानवी भाषेतील कोणत्या वैशिष्ट्यांमुळे माणसे त्यांच्या नजीकच्या काळात अस्तित्वात नसलेल्या वस्तू, घटना-बद्दल बोलू शकतात ?
(१) स्थानांतरण (Displacement)
(२) स्वच्छंदता (Arbitrariness)
(३) संरचना अवलंबित्व (Structure dependence)
(४) तारतम्य (Discreteness)
२. पुढीलपैकी कोणती बाब क्राशेन (Krashen) चे सिद्धान्त आणि व्यगोत्स्की (Vygotsky) च्या ZPD त समान आहे ?
(१) आदान सिद्धान्त (Input hypothesis)
(२) लक्ष देणे सिद्धान्त (Monitor hypothesis)
(३) नैसर्गिक क्रम सिद्धान्त (Natural order hypothesis)
(४) परिणाम झिरपणे सिद्धान्त (Affective filter hypothesis)
३. उत्पादक शब्दसंग्रह म्हणजे-
(१) शब्द जसे ऐकतो तसे ओळखणे
(२) ओळींच्या पलीकडे जाऊन शब्द वाचल्यास लक्षात येतो
(३) लेखनात आणि बोलण्यात वापरतो तो शब्द
(४) वाचकास नवीन असलेला शब्द
४. पुढीलपैकी व्याकरण अनुवाद माध्यमातून द्वितीय भाषा शिकवण्याचे कोणते वैशिष्ट्य नाही ?
(१) प्रथम आणि द्वितीय भाषेच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे.
(२) द्वितीय भाषेच्या व्याकरणाचे नियम शिकणे व पाठ करणे.
(३) थेट दुसऱ्या भाषेत बोलणे आणि नंतर दोन्ही भाषांच्या व्याकरणिक नियमांची तुलना करणे.
(४) भाषेच्या वर्तनापेक्षा भाषेच्या घटकांवर भर देणे.
५. शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना विचारते, ‘मी दिलेल्या अनुभवावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी दिलीत आणि त्यांची उत्तरे देताना तुमच्या मनात नक्की काय सुरू होते?’ हे … याचे उदाहरण आहे.
(१) अधिज्ञानात्मकता (Metacognition)
(२) काल्पनिक पदबंध (Metaphor)
(३) अधिभाषिकता (Metalingualism)
(४) अधिसंकेत विज्ञान (Metasemiotics)
६. भाषिक समुदायात ‘s’ चे उच्चारण दोन वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक गटातील माणसांकडून वेगवेगळ्या प्रकारे होते असे लक्षात येते हे कशाचे उदाहरण आहे?
(१) समाज भाषा वैज्ञानिक परिवर्तन
(२) व्यावहारिक परिवर्तन
(३) समाज सांस्कृतिक परिवर्तन
(४) समाज-मानसशास्त्रीय परिवर्तन
७. मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते ?
(१) सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृ-भाषा/घरची भाषा याने करावी.
(२) सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात प्रदेशाची भाषा यापासून करतात.
(३) सर्व मुले त्यांच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात.
(४) सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिन्दी शिकतात.
८. पुढीलपैकी कोणते विधान ‘भाषा आत्मसात तंत्र’ (LAD) चे योग्य विश्लेषण नाही?
(१) मुले त्यांची प्रथम भाषा कशी शिकतात.
(२) ४-५ वर्षांच्या लहानशा कालावधीत मुले भाषा कशी शिकतात.
(३) मुले आलंकारिक भाषा कशी शिकतात.
(४) मुलांच्या भाषिक आदानापेक्षा भाषिक प्रदान जास्त कशामुळे होते.
९. भाषा आणि बोलीच्या संदर्भात भाषिकदृष्ट्या कोणते विधान अचूक आहे?
(१) भाषांचे लिखित साहित्य असते मात्र बोली मौखिक परंपरेत असतात.
(२) भाषा आणि बोली भाषिकदृष्ट्या वेगळ्या असतात पण भौगोलिकदृष्ट्या एकच असतात.
(३) भाषेची आपली लिपी असते पण बोलींची त्यांची लिपी नसते.
(४) भाषा आणि बोलीची भाषिक पृथकात्मकता दाखवणारे कोणतेही योग्य निकष नाही.
१०. कमिन्सच्या (Cummins) आंतर अवलंबित्वाच्या सिद्धान्तानुसार पुढीलपैकी कोणत्या गोष्टी एकमेकांवर अवलंबित असतात ?
(१) द्वितीय भाषेत आकलन आणि उत्पादन.
(२) प्रथम आणि द्वितीय भाषेत ज्ञानात्मक शैक्षणिक नैपुण्य.
(३) द्वितीय भाषेत वाचन आणि लेखन.
(४) मूलभूत परस्पर कौशल्ये-प्रथम आणि द्वितीय भाषेत.
११. पुढीलपैकी कोणते विधान अक्षरांपासून वाचन सुरू करण्याऐवजी शब्द आणि लहान गोष्टीपासून सुरू करण्याच्या संदर्भात समर्थन करीत नाही ?
(१) प्रारंभीचे वाचक लहान घटकांऐवजी मोठ्या भाषिक घटकांवर चांगले लक्ष देऊ शकतात.
(२) शब्द आणि मजकूर अर्थपूर्ण संबंध स्थापित करतात, अक्षरे करू शकत नाहीत.
(३) शब्द आणि मजकूर मजेशीर असतात, अक्षरे नसतात.
(४) स्वतंत्र शब्द पाठ करणे अवघड असते, शब्दांच्या तुलनेत.
१२.
आकलनासह वाचन या संदर्भात पुढीलपैकी कोणते कौशल्य गृहीत धरले जात नाही?
(१) स्वतंत्र अक्षरावर भर देणे.
(२) आशयाचा पूर्वानुमान करणे.
(३) आशय आणि घटनांची योग्य मांडणी आणि मूल्यमापन
(४) आतापर्यंत वाचलेल्या मजकुराचा मानसिक गोषवारा करणे.
१३.
वीरा एक सात महिन्यांची मुलगी आहे. ती आता स्वर आणि व्यंजनयुक्त आवाज काढते. ती पुढीलपैकी कोणत्या प्रकारे संभाषण करते ?
(१) स्वन
(२) बडबड
(३) हुंकारणे
(४) भाषिक कथन
१४. संहिता आकलनाच्या पद्धतींच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधा.
(१) चाळणे (Skimming) या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो, तर न्याहाळणे (Scanning) यात विशिष्ट माहिती शोधली जाते.
(२) चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे, तर न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन.
(३) चाळणे हे फेरपाहणीसाठी योग्य आहे, तर न्याहाळणे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते.
(४) चाळणे आणि न्याहाळणे या दोन्हीत जलदपणे मजकुरावर दृष्टिक्षेप अपेक्षित असतो.
१५. जेव्हा मुले भाषेच्या माध्यमातून वस्तू, घटना, सभोव-तालच्या घटनांबद्दल विचारतात तेव्हा ते इतरांपेक्षा कोणत्या भाषिक घटकांचा अधिक वापर करतात ?
(१) काल्पनिक
(३) सूचनात्मक
(२) नियंत्रित
(४) स्वयंशोध
उत्तरसूचि
१ – १
२- १
३- ३
४- ३
५-१
६- १
७-१
८- ३
९-४
१०- २
११-१
१२-१
१३-२
१४-२
१५-४








