शैक्षणिक सत्र जुलै 2026 च्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रमांच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेशाबाबत shaikshanik satra pravesh circular
महोदय,
या पत्रानुसार आपणांस कळविण्यात येते की,
1) शैक्षणिक सत्र जुलै 2026 करिता विद्यापीठाचे सेवांतर्गत बी.एड. आणि विशेष बी.एड. शिक्षणक्रम वगळून प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर (द्वितीय व तृतीय वर्षाच्या) सत्र पद्धतीच्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश अर्ज आणि शुल्क भरण्याची मुदत दि. 12 नोव्हेंबर 2026 रात्री 11.59 पर्यंत वाढवण्यात येत आहे.
2) शैक्षणिक सत्र जुलै 2026 करिता विद्यापीठाचे सेवांतर्गत बी.एड. आणि विशेष बी.एड. शिक्षणक्रम वगळून पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमांच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या वार्षिक पद्धतीच्या (Annual Pattern) असलेल्या शिक्षणक्रमांसाठी प्रवेश अर्ज आणि शुल्क भरण्याची मुदत दि. 30 नोव्हेंबर 2026 रात्री 11.59 पर्यंत वाढवण्यात येत आहे.
याची कृपया नोंद घ्यावी व तसे आपल्या अधिनस्त अभ्यासकेंद्रांना कळविण्यात यावे, ही विनंती











