राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीकरीता उच्चतम वयोमर्यादेबाबत स्पष्टीकरण shikshak karmachari vayomaryada circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीकरीता उच्चतम वयोमर्यादेबाबत स्पष्टीकरण shikshak karmachari vayomaryada circular 

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण. २०२६/प्र.क्र. २६६/ई-१७६८६६७/टीएनटी-१

चौथा मजला, विस्तार इमारत हुतात्मा राजगुरु चौक

मादाम कामा मार्ग, मंत्रालय मुंबई ४०००३२

दिनांक :- ०५ नोव्हेंबर, २०२६

संदर्भ:-

१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. सीईटी-२०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१,दि. ०७.०२.२०१९

२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. एसएसएन-२०१५/प्र.क्र.१२/टीएनटी-२. दि. ०७.०३.२०१९.

३) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग, क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र. १७६/टीएनटी-१, दि.११.०८.२०२६.

प्रस्तावना :

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ९ (४) (व) मधील तरतुदीप्रमाणे खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक (इयत्ता ९ वी ते १०) व उच्च माध्यमिक (इयत्ता ११ ते १२ वी) शाळातील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा विहित करण्यात आलेली नाही. तथापि, संदर्भ क्र. १, २ व ३ येथील शासन निर्णयातील संबंधित तरतुदीमुळे क्षेत्रिय स्तरावर संभ्रम निर्माण होत असल्यावावतची निवेदने शासनास प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने योग्य ते स्पष्टीकरण निर्गमित करण्याची वाव शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय : महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील

नियम ९ (४) (व) मधील तरतुदीप्रमाणे संदर्भाधीन शासन निर्णय १, २ व ३ मधील खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक (इयत्ता ९ वी ते १० वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता ११ वी ते १२ वी) शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेवावतच्या तरतूदी गैरलागू ठरतात. त्यामुळे खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक (इयत्ता ९ वी ते १०) व उच्च माध्यमिक (इयत्ता ११ ते १२ वी) शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६११०५१८५०५४५४४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

SHARAD SHRIPATRAO MAKNE

(शरद माकणे) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.

२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

३. मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास / राज्य उत्पादन शुल्क) यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

४. मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिपद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

५. मा. उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिपद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

६. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

७. मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

८. मा. विरोधी पक्षतेता, विधानपरिपद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

९. मा. विधानसभा/विधानपरिपद सदस्य (सर्व)

१०. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

११. मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

१२. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

१३. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक/योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे

१४. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक

१५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिपद

१६. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक/योजना)

१७. सर्व गट शिक्षणाधिकारी

१८. राज्यातील सर्व खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक व सबंधित व्यवस्थापनाचे अध्यक्ष/सचिव

१९. निवड नस्ती- टीएनटी-१

Related posts:

Leave a Comment