प्रेस नोट पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ pavitra portal shikshak padbharti circular
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५
“शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या मुलाखतीसह फेरीतील शिफारशीबाबत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते. त्यातील १,७०,१०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केले आहे.
दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०७/२०२६ या दरम्यान पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारांतील जाहिराती प्राप्त झाल्या आहेत.
त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक ०६/०८/२०२६ ते १६/०८/२०२६ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. मुलाखतीसह या निवड प्रकारात एकूण १,३१,५०५ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत.
यापूर्वी मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील टप्पा-१ मधील नियमित फेरीतील १३,११९ रिक्त जागांवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २७/०८/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
यापूर्वी मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील टप्पा-१ मधील नियमित फेरीतील १३,११९ रिक्त जागांवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २७/०८/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यानंतर मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील समांतर आरक्षणाच्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी निवडीसाठीची टप्पा-१ मधील रूपांतरित फेरीतील ४,३९० रिक्त जागांवर ऑनलाईन शिफारस होत असलेली उमेदवारांची रूपांतरित फेरी (Converted Round) सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २१/०९/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी मुलाखतीसह फेरीतील १०,३२८ रिक्त जागांवर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी ११,४९३ उमेदवारांची २७,१५४ प्राधान्यक्रमावर शिफारस झालेल्या उमेदवारांची नियमित फेरी (Regular Round) सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
मुलाखतीसह या प्रकारात व्यवस्थापननिहाय प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील :

मुलाखतीसह निवडप्रकारातील निवडीबाबत उमेदवारांना व व्यवस्थापनांना SMS द्वारेदेखील कळविण्यात येत आहे.
उमेदवारांना https://tait२०२५.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पाहता येणार आहे.
उमेदवारांच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवारांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी होम पेजवर Download या मेनूमध्ये देण्यात आली आहे.
उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी दिनांक ०३/११/२०२६ ते २५/११/२०२६ या कालावधीत शासन निर्णय दिनांक ०२/०४/२०२६ मधील तरतुदीनुसार पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्याबाबतचे निर्देश नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवडप्रकारातील निवडीबाबत राज्यस्तरावर “तक्रार निवारण व दुरुस्ती समिती” स्थापन करण्यात आली आहे. edupavitra२०२५grcc@gmail.com या ईमेलवर दिनांक ०७/११/२०२६ अखेर पर्यंत विहित प्रपत्रामध्ये पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.
मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व दीपावली सणानिमित्त शुभेच्छा.










