शालार्थ प्रणाली मधील माहे नोव्हेंबर २०२६ पेड इन डिसेंबर २०२६ पासून चे वेतन व भत्ते अदा करताना घ्यावयाची काळजी बाबत shalartha pranali vetan bhatte circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ प्रणाली मधील माहे नोव्हेंबर २०२६ पेड इन डिसेंबर २०२६ पासून चे वेतन व भत्ते अदा करताना घ्यावयाची काळजी बाबत shalartha pranali vetan bhatte circular 

संदर्भ:- १) शासन शुध्दीपत्रक क्र. एसएसएन-२०१७/(२०-१७) टीएनटी-२.दि.२३.०८.२०१७

२) शासन निर्णय क्र.: शालार्थ-१११८/प्र.क्र.३०/टीएनटी-३.दि.१०,०६,२०२२.

३) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि. २५-२६/टि-६बी. दि.१६.०७.२०२५/१३२८५३२.

४) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंगा/दि. २५-२६/टि-६बी.दि.२२.०१.२०२६/१६८५२९६.

५०) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंगा/दि.२५-२६/टि-६बी. दि.०४.०३.२०२६/१७५७८५७.

६) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंगा/दि.२५-२१/टि-६बी. दि.०५.०३.२०२६/१७६१४७५.

७) शासन निर्णय का एसएसएन-२०१७/(२०-१७) टीएनटी-२.दि.३०.०१,२०२६.

८) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी. दि. २७.०३.२०२६/१८१३४८०.

२) संचालनालयाचे पत्र. क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी.दि.१२.०६.२०२६

१०) दि.०९.०७.२०२६ रोजी वीसी व्दारे झालेली आढावा बैठक

११) संचालनालयाचे पत्र. क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी.दि.०८.०७.२०२६

१२) दि.१५.०७.२०२६ रोजी वीसी व्दारे झालेली आढावा बैठक ०८.०७.२०२६

१३) दि.२३.०७.२०२६ रोजी वीसी व्दारे झालेली आढावा बैठक

१४) दि.३१.०७.२०२६ रोजी वीसी व्दारे झालेली आढावा बैठक

१५० संचालनालयाचे पत्र. क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी. दि.०८.०९.२०२६

१६) दि.२८.१०.२०२६ रोजी वीसी व्दारे झालेली आढावा बैठक

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माहे जानेवारी २०२६ व तत्पूर्वी आपणास वेळोवेळी सूचना व लेखी आदेश देण्यात आलेले आहेत. असे असतानाही दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व अधीक्षक वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय प्राथमिक आणि माध्यमिक यांची व्हीसीद्वारे पुनश्च संदर्भीय पत्रांमधील नमूद बाबींवरती कार्यवाही करण्याबाबत समग्र सूचना व विचार विमर्श करण्यात आलेला आहे. संदर्भीय पत्रानुसार आपणास वेळोवेळी लेखी व व्हीसीद्वारे कळविण्यात आलेले आहे. त्या कामामध्ये एक-दोन मुद्द्यांच्या संदर्भातील बाबींवर क्षेत्रस्तरावर मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी समाधानकारक कामकाज केले आहे. इतर

मुद्रयांच्या बाबतीमध्ये समाधानकारक कामकाज झाल्याचे दिसून येत नाही. या पत्राद्वारे आपणास पुनच एकदा सदर काम पूर्ण करण्यास स्मरण करून देण्यात येत आहे. राज्याच्या एकत्रित निधीमधून कर्मचाऱ्यांचा वेतन व भत्ते यावर नियमाप्रमाणे निधी खर्च होणे आवश्यक आहे. आर्थिक बाबीतील अनियमितता झाल्यास यांस आपण जबाबदार रहाल, या गंभीर विषयाबाबत आपणास वारंवार लेखी सुचनेव्दारे कळवूनही या कामकाजात आवश्यक प्रगती दिसून येत नाही, असे खेदाने नमूद करावे लागत आहे.

१) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या तीन स्तरांमध्ये शाळांचा युडायस क्रमांक उपयोगात आणून मुख्याध्यापकांचे एक डीडीओ कोड तयार करण्यात आलेले आहे. एकाच स्तरांमधील दोन किंवा दोन पेक्षा अधिक शाळांना एकच यु डायस क्रमांक ७ शाळांनी उपयोगात आणल्याचे दिसून येते. सोबत यादी संलग्न करण्यात येत आहे. (अधीक्षक व मुख्याध्यापक)

२) शालार्थ प्रणालीमध्ये प्राथमिक तपासणीत डीडीओ कोड आणि यु-डायस क्रमांक यांची जोडणी करताना प्रत्यक्षात सोबत जोडलेल्या यादीनुसार २०६ इतक्या शाळांच्या संच मान्यता ह्या शालार्थ प्रणालीमध्ये नमूद करण्यात आलेल्या यु-डायस क्रमांकावर करण्यात येत नाही. या यादीमधील शाळांचे अचूक यु-डायस क्रमांक नमूद करण्याची कार्यवाही मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्यास्तरावरुन करण्यात यावी. (अधीक्षक व मुख्याध्यापक)

३) राज्यामध्ये एकूण ६१२ शाळांमध्ये संच मान्यतेमध्ये पदे मंजूर आहेत. तथापी कर्मचारी

कार्यरत नाहीत. (अधीक्षक व शिक्षणाधिकारी)

४) एकूण ३६४२ शाळांमध्ये संच मान्यता उपलब्ध नाही व शालार्थ मध्ये कर्मचारीही कार्यरत नाहीत. करीता शुन्य मंजूर पदे व शुन्य कार्यरत पदे असणाऱ्या शाळांची खातरजमा मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या स्तरावरुन करण्यात यावी. (अधीक्षक व मुख्याध्यापक)

५) सन २०२५-२६ मध्ये ८४२ शाळांच्या संचमान्यता उपलब्ध नाही तथापि या शाळांच्या यु-डायस क्रमांक जोडण्यात आलेल्या युडायस क्रमांकावर शालार्थमध्ये कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात वेतन पथक अधीक्षक, शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संच मान्यतेची कार्यवाही तातडीने कार्यवाही करणे अनिवार्य आहे. (अधीक्षक, शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक)

६) राज्यामध्ये माहे ऑक्टोबर २०२६ अखेरीस ३६२५ शाळांमध्ये ९५०९ कर्मचारी मंजूर पेक्षा अधिक कार्यरत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. ज्या ठिकाणी मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचे समायोजन गेल्या आठ महिन्यात का झाले नाही? याबाबतचा शाळा निहाय खुलासा संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करणे अनिवार्य आहे. (शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक)

७) राज्यामध्ये अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या १२०६ शाळा आहेत या शाळांमध्ये १४८४ कर्मचारी अतिरिक्त असल्याचे दिसून येते. याबाबतही अद्याप समायोजन का झाले नाही ? याचा खुलासा संबंधितांनी करणे अनिवार्य आहे. (शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक)

८) सद्यस्थितीत १०६९५ कर्मचारी डीडीओ कोड पासून विलग (डिटॅच) करण्यात आलेले आहेत आणि या कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत कोणताही निर्णय व्यवस्थापन / मुख्याध्यापकांकडून अद्याप पर्यंत घेतलेला नाही. या संदर्भातील उचित कार्यवाही मुख्याध्यापक स्तरावरुन होणे आवश्यक आहे.

९) सद्यस्थितीत २०२७ शाळांमध्ये एकूण २९०५ कर्मचारी सक्रीय आहेत, तथापी त्यांना वेतन व भत्ते अदा केले जात किंवा कसे याबाबतची खातरजमा करणे मुख्याध्यापक स्तरावरुन करणे आवश्यक आहे.

१०) संदर्भ पत्र क्र १२ व १५ अनुक्रमे दि.०८.०७.२०२६ व ०८.०९.२०२६ नुसार अनुदानित शाळांनमधील भविष्य निर्वाह निधीच्या नोंदी अद्यावत करुन भविष्य निर्वाह निधी चिठ्ठी (जिपीएफ स्लीप) शालार्थ प्रणाली मार्फत वितरीत करण्याच्या अनुषंगाने दि ०१.०४.२०२१ रोजीचा संबंधित कर्मचाऱ्याचा ओपनिग बॅलंस शालार्थ प्रणालीवर नोंद करण्याची कार्यवाही दि.१५.११.२०२६ पूर्वी अधीक्षक यांच्या स्तरावर पुर्ण करण्यात यावी. (अधीक्षक व शिक्षणाधिकारी)

११) संदर्भीय पत्र दिनांक १२ जून २०२६ मधील एकंदरी अकरा मुद्द्यांबाबत शाळानिहाय आढावा घेऊन पूर्तता करणे अनिवार्य आहे. आपल्याकडून या ११ मुद्द्यांची पडताळणी पूर्णतः आपल्या स्तरावर करण्यात आलेली नाही ही बाब अतिशय गंभीर आहे. सोबत जोडण्यात आलेल्या एक्सेल फाईलमध्ये विषय निहाय / जिल्हा निहाय यादया सलंग्न करण्यात आलेल्या आहेत. वेतन पथक अधीक्षक यांनी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक याप्रमाणे फिल्टर सुविधेचा उपयोग करुन संबंधित यादी स्वतंत्र करावी व त्यामध्ये नमुद शाळा व कर्मचारी विषयक बाबींची उपरोक्त प्रमाणे पडताळणी करावी. (सुलभ संदर्भाकरीता प्रत संलग्न केली आहे).

करीता उपरोक्त सुचनेप्रमाणे त्वरीत कार्यवाही करण्यात यावी व माहे नोव्हेंबर २०२६ पेड इन डिसेंबर २०२६ चे वेतन अदा करतेवेळी कोणतीही तांत्रिक अडचण उदभवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, तांत्रिक कारणामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्यास अडचण आल्यास आणि अतिरीक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळून अन्य कर्मचाऱ्यांची देयके विहीत वेळेत दरमहा ०१ तारखेस अदा करण्यात यावी.

सोबत सहपत्र- उपरोक्त विषया संबंधित प्रलंबित प्रकरणांची

शाळा व कर्मचारी निहाय यादी

Related posts:

Leave a Comment