राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ साठी नावनोंदणी करणे बाबत state level navopkram competition circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ साठी नावनोंदणी करणे बाबत state level navopkram competition circular 

संदर्भः प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. SCERT/Research/I/2049731/2026 दि.२९/०७/२०२६

नवोपक्रम स्पर्धा नोंदणी लिंक https://forms.gle/UK6NDHUqCJNVvsUA9

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार, प्रस्तुत कार्यालयामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत संपूर्ण नियोजन व माहितीपत्रक संदर्भीय दि.२९/०७/२०२६ च्या पत्रानुसार यापूर्वीच कळविण्यात आलेले आहे.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सर्व माहिती परिपत्रक pdf download 

सर्व जिल्ह्यांनी नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांनी राबविलेले नवोपक्रम स्पर्धेसाठी अधिकाधिक नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी. माहितीपत्रकात नमूद निकषांनुसार पात्र व गटनिहाय नवोपक्रम स्पर्धेसाठी सहभाग घेतील यासाठी आपले स्तरावरून संबधितांना अवगत करण्यात यावे,

आपल्या अधिनस्त संदर्भीय पत्रात नमूद सात गटात समाविष्ट अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांसह सर्व स्पर्धक नवोपक्रमशील घटकांना यापूर्वी दिलेल्या माहिती पत्रकानुसार आपले नवोपक्रम नोंदवण्यासाठी गुगल लिंक देण्यात येत आहे. खाली दिलेल्या लिंकवरच आपले नवोपक्रम दि.०२/११/२०२६ ते दि.२०/११/२०२६ या कालावधीत नोंदवावेत. इतर कोणत्याही माध्यमातून (Email, Whatsapp इद्यादी) पाठवलेले नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवोपक्रम स्पर्धेसाठी नाव नोंदणी करून सहभाग घेतील यासाठी संबधित कार्यालयांनी प्रयत्न करावेत.

नावनोंदणी लिंक: https://forms.gle/UK6NDHUqCJNVvsUA9

नावनोंदणी मुदत : दि.०२/११/२०२६ ते दि.२०/११/२०२६

Related posts:

Leave a Comment