गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव म्हणून साजरा करणेबाबत ganveshotsav rajya mahotsav celebration
शासन निर्णय येथे पहा pdf download
वाचा : १) शा.नि. क्र.: पुलदे-२०२५/प्र.क्र. ७४ (ई-११४४०९५) सां.का.२, दि.२० जून २०२५.
२) मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांनी शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी विधिमंडळात
गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करणेबाबत केलेली घोषणा.
३) संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचे दि.२५.०७.२०२५ चे पत्र
प्रस्तावनाः
लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती व जनतेला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली. या निमित्ताने सामाजिक एकोपा आणि संघटनात्मक चळवळी तसेच विविध कला, देखावे आणि सांस्कृतिक उपक्रम यांच्याद्वारे देशहिताचा व्यापक विचार समाजात रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले.
राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सव हा अत्यंत लोकप्रिय आणि राज्याची देशविदेशात सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणारा असा उत्सव आहे. गणेशोत्सव काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन, त्यावर आधारित विविध उद्योग व व्यवसाय यांना चालना मिळत असून राज्यात एकूणच सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक अभिसरण होते. त्यामुळे ही परंपरा व संस्कृति जपली जावी, वृद्धिंगत व्हावी, यासाठी गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून साजरा करण्याची घोषणा मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांनी दि. १८ जुलै २०२५ रोजी राज्य विधिमंडळात केली आहे. त्यास अनुसरून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन निर्णय येथे पहा pdf download
शासन निर्णय-
राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा “राज्य महोत्सव” म्हणून साजरा करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या अनुषंगाने राज्यातील गणेशोत्सवानिमित्त अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणणे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवास प्रोत्साहन देणे, विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करणारे उपक्रम उदा. विविध स्पर्धा, व्याख्यानमाला इ. आयोजित करणे, महाराष्ट्रात शिकणाऱ्या परदेशातील तसेच अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांना या राज्य उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे इ. उपक्रमांसह, गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर राज्य महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणारे उपक्रम व इतर कार्यक्रमांचे समन्वयन कार्यालय म्हणून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई या कार्यालयाला घोषित करण्यात येत आहे. तसेच सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असणाऱ्या विविध कार्यालयांमार्फत व जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत खालील कार्ये प्रस्तावित आहेत:-
शासन निर्णय येथे पहा pdf download
५. उपरोक्त परिच्छेदामध्ये दर्शविण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या/उपक्रमांच्या संदर्भात आवश्यक असलेला खर्च हा संबधित कार्यालयांनी त्यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उपलब्ध असलेल्या निधीतून भागवावा.
६. सर्व जिल्हाधिकारी यांनी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा व्हावा यासाठी सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या कार्यक्रम/उपक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी.
७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०८१४१७२९०९३६२३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय येथे पहा pdf download
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










