दि.३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले “लेक वाचवा लेक शिकवा” अभियान राबविण्याबाबत lek vachva lek shikva abhiyan
संदर्भ:
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.१-एस.डी.-४, दि.२/१/२०१६,
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.३७६/एस.डी.४. दि.२०/१२/२०१६.
३) मः आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क. लेक शिकवा/२०१६-१७/०५१६ दि.३१/१२/२०१६. ४) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२३०/एस.डी.-४, दि.२४/१२/२०२०,
५) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र क. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७/एस.डी.-४, दि.३०/०१/२०२५,
६) शासन पत्र क्र.संकीर्ण २०२५/प्र.क्र.एस.डी.-४, दि. ३१/०१/२०२५
७) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क/टे.क.प्राथ/शा.५/१६०१/२०२५/
८७८, दि.२०/२/२०२५
८) सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक क्र. जपुती-२०२५/प्र.१९५/का-जक (२९), दि.२९/१२/२०२५०
उपरोक्त विषयावावतच्या संदर्भिय शासन परिपत्रक, शासन निर्णय तसेच पत्रांचे अवलोकन करावे. सावित्रिबाई फुले यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख शाळांतील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा” अभियान राबविण्याचा निर्णय संदर्भ क्र.१ थे दि.०२/०१/२०१६ चे शासन परिपत्रकान्वये घेण्यात आला. (प्रत संलग्न) त्यानुसार हे अभियान दरवर्षी दि.०३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येते.
सदर परिपत्रकान्वये निर्देश दिल्यानुसार, बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार प्रत्येक बालकास समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यानुसार राज्यात मुलीना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, मुलीच्या शिक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलीच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे, परिस्थितीमुळे मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरीत पालकांच्या मुलीच्या अखंडीत शिक्षणाची हमी देणे, मुलीना शिक्षणाची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास रुजविणे, वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढीस लावणे, त्यांच्या सृजनशिलतेस वाव देणे तसेच विशेष करुन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थिनीची गळती कमी होणे यासाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा” अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
ज्ञानज्योती सावित्रीचाई फुले यांनी ज्या उद्देशाने स्त्री शिक्षणास सुरुवात केली तो उद्देश केंद्रिभूत ठेवून “लेक वाचवा, लेक शिकवा” या अभियानांतर्गत दि.०३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
तसेच शासन परिपत्रक दि.२९/१२/२०२५ अन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत असलेल्या परिशिष्टानुसार साजरे करण्याबाबत आपल्या अधिनस्त कार्यालयांस तसेच सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये साजरे करण्यासाठी कळविण्यात यावे. (प्रत संलग्न)










Please question