समास म्हणजे काय? सामासिक शब्द व त्यांचा विग्रह आणि प्रकार pdf स्वरूपात उपलब्ध सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त samas prakar shabda vigrah 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समास म्हणजे काय? सामासिक शब्द व त्यांचा विग्रह आणि प्रकार pdf स्वरूपात उपलब्ध सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त samas prakar shabda vigrah 

भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो. दोन किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो. उदा. ‘चंद्राचा उदय’ असे न म्हणता आपण ‘चंद्रोदय’ असे म्हणतो. ‘पोळीसाठी पाट’ असे न म्हणता आपण ‘पोळपाट’ असे म्हणतो. ‘बटाटे घालून तयार केलेला वडा’ असे न म्हणता आपण ‘बटाटेवडा’ असे म्हणतो.

शब्दांच्या अशा एकत्रीकरणास ‘समास’ असे म्हणतात. ‘सम्+अस्’ या संस्कृत धातूपासून ‘समास’ हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ ‘एकत्र करणे’ असा आहे. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्परसंबंध दाखविताना त्यातील विभक्तीप्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. समास हीदेखील भाषेतील काटकसर आहे.

शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो, त्याला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात. हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आपण फोड करून सांगतो. फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला ‘विग्रह’ असे म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दांत सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण होय. उदा. ‘वनभोजन’ हा सामासिक शब्द असून ‘वनातील भोजन’ हा त्याचा विग्रह होय.

समासाचे प्रकार

समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात अधिक महत्त्व, म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपल्याला अधिक बोलावयाचे असते, यावरून समासाचे प्रकार ठरविण्यात आलेले आहेत; ते असे.

(२) दुसरे पद प्रमुख असेल, तर तत्पुरुष समास.

(१) पहिले पद प्रमुख असेल, तर अव्ययीभाव समास.

(३) दोन्ही पदे महत्त्वाची असतील, तर ‘द्वंद्व समास’.

(४) दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यावरून तिसन्याच पदाचा बोध होत असेल,तर बहुव्रीही समास.

अणु.क्र.सामासिक शब्द विग्रह समास प्रकार 
1आजन्म जन्मापासूनअव्ययी भाव समास
2यथाशक्ती शक्तीप्रमाणे 
3प्रतिदिन प्रत्येक दिवशी 
4प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला 
5दररोजप्रत्येक दिवशी 
6गावोगाव प्रत्येक गावाला 
7जागोजाग प्रत्येक जागेवर 
8गल्लोगल्लीप्रत्येक गल्लीत 
9पदोपदीप्रत्येक पद 
10घरोघरप्रत्येक घर 
11दारोदारप्रत्येक दार 
12रस्तोरस्तेप्रत्येक रस्त्यावर 
13दिवसेंदिवसप्रत्येक दिवस 
14पावलोपावलीप्रत्येक पाऊल  
15तोंडपाठ तोंडाने पाठतत्पुरुष समास 
16महादेव महान असा देव  
17कंबरपट्टा कंबरे साठी पट्टा 
18अनिष्ट नाही इष्ट ते  
19दुख:प्राप्तदुःखाला प्राप्त 
20भक्तीवशभक्तीने वश 
21क्रीडांगणक्रीडेसाठी अंगण 
22ऋणमुक्तऋणातून मुक्त 
23राजपुत्रराजाचा पुत्र 
24घरजावईघरातील जावई 
25तोंडपाठतोंडाने पाठ 
26गुणहीनगुणाने हीन  
27चौपटचार पटीने 
28बुद्धीजडबुद्धीने जड 
29ईश्वर निर्मितईश्वराने निर्मित 
30गायरानगाईंसाठी रान 
31पोळपाटहोळीसाठी पाठ 
32मेंढवाडामेंढ्यांसाठी वाडा 
33व्याहीभोजनव्याहीसाठी भोजन 
34सेवानिवृत्तसेवेतून निवृत्त 
35गर्भश्रीमंतपूर्वीपासून श्रीमंत 
36चोरभयचोरापासून भय  
37जन्मखोडजन्मापासून खोड 
38लंगोटीमित्रलहानपणापासून चा मित्र 
39राजपुत्रराजाचा पुत्र 
41देवपूजादेवाची पूजा 
42राजवाडाराजाचा वाडा 
43लक्ष्मीकांतलक्ष्मीचा कांत 
44घोडदौड घोड्यांची दौड 
45धर्मवेड धर्माचे वेड  
46आंबराईआंब्याची राई 
47विद्याभ्यास विद्येचा अभ्यास 
48घरजावईघरातील जावई 
49वनभोजनवनातील भोजन 
50कलाकुशलकलेत कुशल 
51पानकोंबडापाण्यातील कोंबडा 
52घरकामघरातील काम 
53सुखद सुख देणारे उपपद तत्पुरुष 
54जलद जल देणारे 
55पंकजचिखलात जन्मणारे 
56पहारेकरीपहारा देणारा 
57गळेकापूगोळे कापणारा 
58शेतकरीशेती करणारा 
59कामकरीकाम करणारा 
60आगलाव्याआग लावणारा 
61अयोग्ययोग्य नव्हे तेनत्र तत्पुरुष
62अपुरापूर्ण नाही असा 
63नास्तिकदेव न म्हणणारा 
64अनादरआदर नसलेला 
66नापसंतपसंत नसलेला 
67अनाचारशिष्टाचार नसलेला 
68अन्यायन्याय नाही असा 
69अहिंसाहिंसा नसलेला 
70निरोगीरोगी नसलेला 
71नाईलाजइलाज नाही असा 
72नाउमेद उमेद नाही असे 
73बेडरभीती नाही असा 
74गैरहजरहजर नसलेले 
75महादेवमहान असा देवकर्मधारय तत्पुरुष
76घनश्यामधनासारखा श्याम 
77रक्तचंदनरक्तासारखे चंदन 
78मुखकमल मुख हेच कमल 
79पितांबरपिवळे असे वस्त्र 
80नीलकमलनिळे असे कमल 
81घननिळनिळा असा घन 
82पुरुषोत्तमउत्तम असा पुरुष 
83भाषांतरअन्य भाषा 
84वेशांतरअन्य वेश  
85कमलनयनकमळासारखे डोळे 
86मेघशाममेघासारखा काळा 
87चंद्रमुखीचंद्रासारखे मुख 
88नरसिंहसिंहासारखा नर 
89विद्याधनविद्या हेच धन 
90काव्यामृतकाव्यरूपी अमृत 
91पंचवटीपाच वडांचा समूहद्विगु तत्पुरुष
92नवरात्रनऊ रात्रींचा समूह 
93चातुर्मासचार मासांचा समूह 
94त्रिभुवनतीन भूवनांचा समूह 
95सप्ताहसात दिवसांचा समूह 
96त्रिदलतीन दलांचा समूह 
97चौघडीचार घड्यांचा समूह 
98पंचपाळीपाच पाल्याचा समूह 
99पंचारतीपाच आरत्यांचा समूह 
100कांदेपोहेकांदे घालून केलेले पोहेमध्यम पदलोपी तत्पुरुष
101साखरभातसाखर घालून केलेला भात 
102डाळवांगेवांगेयुक्त डाळ 
103पुरणपोळीपुरण घालून केलेली पोळी 
104लंगोटी मित्रलंगोटी घालत असल्या पासूनचा मित्र 
105भोजन भाऊभोजना पुरता भाऊ 
106घोडेस्वारघोडा असलेला स्वार 
107बालमित्रबालपणीपासून चा मित्र 
108राम-लक्ष्मणराम आणि लक्ष्मणद्वंद्व समास 
109पापपुण्य पाप किंवा पुण्य  
110विटीदांडूविटी आणि दांडू 
111आईबापआई आणि बापइतरेतर द्वंद्व
112हरिहरहरी आणि हर 
113स्त्रीपुरुषस्त्री आणि पुरुष 
114एकवीस वीस आणि एक  
115कृष्णाअर्जुनकृष्ण आणि अर्जुन 
116बहिणभाऊ बहिण आणि भाऊ 
117खरेखोटेखरे किंवा खोटेवैकल्पिक द्वंद्व
118तीन-चारतीन किंवा चार 
119बरेवाईटबरे किंवा वाईट 
120पासनापसपास किंवा नापास 
121न्यायान्यायन्याय किंवा अन्याय 
122सत्यासत्यसत्य किंवा असत्य 
123धर्माधर्मधर्म किंवा अधर्म 
124चहापाणीचहापाणी व फराळाचे इतर पदार्थसमाहार द्वंद्व 
125भाजीपालाभाजीपाला व मिरची कोथिंबीर इत्यादी वस्तू 
126अंथरुन पांघरूनअंथरून पांघरून व इतर वस्तू 
127पाला पाचोळागवत काडी पान इत्यादी वस्तू 
128मीठभाकरमीठ भाकर साधे खाद्यपदार्थ 
129घरदारघर अंगण दार इत्यादी 
130बहुवृही   
131निळकंठनिळा आहे कंठ ज्याचा असा तो 
132पितांबरपिवळे असे वस्त्र 
133लक्ष्मीकांतलक्ष्मीचा जो कांत तो 
134गजाननगजाचे आहे आनन ज्याला तो 
135प्राप्तधनप्राप्त आहे धन ज्यास तो  
136चौकोनचार आहेत कोण ज्याला 
137लंबोदरलांब आहे उदर ज्याचे तो  
138निर्धन गेले आहे धन ज्यापासून तो 
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    
    

Leave a Comment