TET परिसर अभ्यास/सा.शास्त्र प्रश्नसंच teacher eligibility test questions bank 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET परिसर अभ्यास/सा.शास्त्र प्रश्नसंच teacher eligibility test questions bank 

प्रबोधनयुग’ म्हणून ओळखला जाणारा कालखंड

(1) इसवी सनाचे 13 वे ते 16 वे शतक

(2) इसवी सनाचे 13 वे ते 17 वे शतक

(3) इसवी सनाचे 14 वे ते 16 वे शतक

(4) इसवी सनाचे 16 वे ते 18 वे शतक

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

प्रबोधनयुगात कोणत्या प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले ?

(1) ग्रीक व भारतीय

(2) ग्रीक व रोमन

(3) चिनी व रोमन

(4) रोमन व भारतीय

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

प्रबोधनयुगात ………….हा विचारांचा केंद्रबिंदू बनला.

(1) धर्म

(2) विज्ञान

(3) माणूस

(4) भांडवलदार

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्रबोधनयुगात………….. साहित्यनिर्मितीला चालना मिळाली.

(1) परदेशी भाषेत

(2) व्यावहारिक भाषेत

(3) भारतीय भाषेत

(4) प्रादेशिक भाषेत

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

जर्मन संशोधक ………….याने छपाई यंत्राचा शोध लावला.

(1) जोहान्स गुटेनबर्ग

(3) जॉर्ज वॉशिंग्टन

(2) लिओनार्दो-द-विंची

(4) बार्थोलोम्यू डायस

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी संकल्पनांवर हल्ला चढवला.

(1) इटालियन धर्मप्रसारकांच्या

(2) रोमन कॅथलिक चर्चच्या

(3) ग्रीक धर्मप्रसारकांच्या

(4) वरीलपैकी सर्व

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

जुन्या धार्मिक कल्पना, कर्मकांडांचे स्तोम याविरोधात युरोपात जी चळवळ झाली तिला असे म्हणतात.

(1) धर्मसुधारणा चळवळ

(2) वैचारिक चळवळ

(3) स्वातंत्र्य चळवळ

(4) क्रांतियुग

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

धर्मसुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे या तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले.

(1) वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन

(2) स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य

(3) खगोलशास्त्र व गणिती

(4) स्थापत्यकला व वास्तुशास्त्र

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कानी हे शहर जिंकून घेतले.

(1) व्हेनिस

(2) कॉन्स्टॅन्टिनोपल

(3) रोम

(4) पॅरिस

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

सागरी मार्गाने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचलेला………. हा पहिला पोर्तुगीज खलाशी होय.

(1) ख्रिस्तोफर कोलंबस

(2) बार्थोलोम्यू डायस

(3) वास्को-द-गामा

(4) अमेरिगो

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

तुर्कानी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून घेतल्यामुळे झालेल्या परिणामाशी संबंधित नसलेले विधान कोणते ?

(1) आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे मार्ग बंद झाले.

(2) आशियाकडे जाणाऱ्या नवीन मार्गांचा शोध येणे आवश्यक झाले.

(3) अमेरिकेकडे जाणारे मार्ग बंद झाले.

(4) भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

इंग्लंडच्या राजाच्या अधिकारावर मर्यादा घालणारा इंग्लंडचा कायदा

(1) बिल ऑफ राईटस्

(2) ह्युमन राईटस् मूव्हमेंट

(3) बिल ऑफ जस्टिस

(4) बिल ऑफ पीस

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

अमेरिकन वसाहतींनी ………..याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले.

(1) थॉमस जेफरसन

(2) रॉबर्ट क्लाईव्ह

(3) जॉर्ज वॉशिंग्टन

(4) जॉन हॉन्कॉक

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारप‌ट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या.

(1) दहा

(2) तेरा

(3) पंधरा

(4)सतरा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

ईस्ट इंडिया कंपनीला सूरत येथे वखार स्थापण्यास परवानगी देणारा मुघल बादशहा…….

(1) अकबर

(2) शहाजहान

(3) जहांगीर

(4) औरंगजेब

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी देणारी घटना………

(1) अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध

(2) फ्रेंच राज्यक्रांती

(3) औद्योगिक क्रांती

(4) बिल ऑफ राईटस्

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

औद्योगिक क्रांतीला ……….मध्ये प्रारंभ झाला.

(1) इंग्लंड

(2) फ्रान्स

(3) इटली

(4) पोर्तुगाल

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

औ‌द्योगिक भरभराटीमुळे कोणत्या देशाचे वर्णन ‘जगाचा कारखाना’ असे केले जात असे?

(1) फ्रान्स

(2) अमेरिका

(3) इंग्लंड

(4) पोर्तुगाल

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या सुरू झाल्या कारण

(1) वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला.

(2) अनेक व्यापारी एकत्र येऊन व्यापार करू लागले.

(3) आशियाई देशांत इंग्रजांनी वसाहती स्थापन केल्या.

(4) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

………..प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला.

(1) हुकूमशाही

(2) लोकशाही

(3) वसाहतवादी

(4) राजेशाही

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

व्यापारी व साम्राज्यवादी स्पर्धेतून इंग्रज व फ्रेंच यांच्यात झालेली युद्दे कोणत्या नावाने ओळखली जातात ?

(1) कर्नाटक युद्धे

(2) इंग्रज-फ्रेंच युद्धे

(3) म्हैसूर युद्धे

(4) शीख युद्धे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

सन 1756 मध्ये बंगालच्या नवाबपदी …………याची नेमणूक झाली.

(1) मीर कासिम

(2) मीर जाफर

(3) सिराज उ‌द्दौला

(4) बादशहा शाहआलम

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

सन 1757 मध्ये येथे इंग्रज व सिराज उ‌द्दौला यांच्यात झालेल्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला.

(1) बंगाल

(2) प्लासी

(3) बक्सार

(4) पंजाब

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न याने केला.

(1) सिराज उ‌द्दौला

(2) मीर कासिम

(3) मीर जाफर

(4) शाहआलम

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

………..च्या लढाईने ब्रिटिशांनी बंगालमध्ये आपल्या सत्तेचा

(1) प्लासीची लढाई

(2) बक्सारची चढाई

(3) म्हैसूरची लढाई

(4) सिंघची लढाई

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

कोणत्या तहानुसार बंगाल सुभ्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला ?

(1) सिंघचा तह

(2) अलाहाबादचा तह

(3) अयोध्येचा तह

(4) यांपैकी नाही

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

1799 साली ………… येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मारला गेल्याने म्हैसूरच्या प्रदेशांवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

(1) म्हैसूर

(2) बेंगळुरू

(3) बक्सार

(4) श्रीरंगपट्टण

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

पंजाबवरील इंग्रजांचे वाढते वर्चस्व सहन न झाल्याने मुलतानचा अधिकारी याने इंग्रजांविरुद्ध बंड केले.

(1) रणजितसिंह

(2) मूलराज

(3) दलिपसिंग

(4) हैदरअली

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

……….मध्ये इंग्रजांनी पंजाब प्रांत आपल्या राज्याला जोडून घेतला.

(1) इ. स. 1764

(2) इ. स. 1799

(3) इ. स. 1849

(4) इ. स. 1846

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करून नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे होय.

(1) वसाहतवाद

(2) भांडवलशाही

(3) साम्राज्यवाद

(4) औदयोगिक क्रांती

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

एखादया आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्या भूप्रदेशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे होय.

(1) भांडवलशाही

(2) वसाहतवाद

(3) साम्राज्यवाद

(4) औदयोगिक क्रांती

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

भांडवलशाहीचे परिणाम चुकीचा पर्याय निवडा :

(1) भागभांडवल असणाऱ्या अनेक कंपन्या सुरू झाल्या

(2) युरोपियन देशांची आर्थिक भरभराट झाली.

(3) मानवतावादाला चालना मिळाली.

(4) उद्योगधंदयांत वाढ होऊन भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करून नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे होय.

(1) वसाहतवाद

(2) भांडवलशाही

(3) साम्राज्यवाद

(4) औदयोगिक क्रांती

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

एखादया आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्या भूप्रदेशावर राजकीय प्रस्थापित करणे म्हणजे वर्चस्व………. होय.

(1) भांडवलशाही

(2) वसाहतवाद

(3) साम्राज्यवाद

(4) औदयोगिक क्रांती

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

भांडवलशाहीचे परिणाम – चुकीचा पर्याय निवडा :

(1) भागभांडवल असणाऱ्या अनेक कंपन्या सुरू झाल्या

(2) युरोपियन देशांची आर्थिक भरभराट झाली.

(3) मानवतावादाला चालना मिळाली.

(4) उ‌द्योगधंद्यांत वाढ होऊन भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्रबोधनयुगाची वैशिष्ट्ये – चुकीचा पर्याय निवडा :

(1) माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

(2) ग्रीक व रोमन या प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले.

(3) कला, साहित्य यांमधून मानवी भावभावना आणि संवेदना यांचे चित्रण होऊ लागले.

(4) जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी मिळाली.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

18 व्या 19 व्या शतकांना म्हणून ओळखले जाते.

(1) वैचारिकयुग

(2) क्रांतियुग

(3) भांडवलशाही युग

(4) प्रबोधनयुग

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषेत साहित्यनिर्मिती कोणत्या युगात होऊ लागली?

(1) भांडवलशाही

(2) वैचारिक

(3) प्रबोधन

(4) क्रांति

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

प्रबोधनयुगातील एक जगप्रसिद्ध चित्रकार

(1) मोनालिसा

(2) लिओनार्दो-द-विंची

(3) बार्थोलोम्यू डायस

(4) वास्को-द-गामा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

Leave a Comment