TET परिसर अभ्यास प्रश्नसंच pdf उपलब्ध teacher eligibility test questions bank
पुढीलपैकी इतिहास लेखनाची कोणती साधने राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केली जातात ?
(1) दृक् साधने
(2) लिखित साधने
(3) मौखिक साधने
(4) भौतिक साधने
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
वृत्तपत्रांचा मुख्य हेतू कोणता असतो ?
(1) समकालीन घटनांविषयी माहिती मिळणे
(2) वास्तूंविषयी माहिती मिळणे
(3) प्राचीन घटनांविषयी माहिती मिळणे
(4) मध्ययुगीन घटनांविषयी माहिती मिळणे
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
पुढीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधन नाही?
(1) नियतकालिक
(2) पत्रव्यवहार
(3) पोवाडा
(4) वृत्तपत्र
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्वकाळातील नाही?
(1) अमृत बझार पत्रिका
(2) ज्ञानप्रकाश
(3) दीनबंधू
(4) पुढारी
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
पुढील वृत्तपत्रांमधील कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही?
(1) जनता
(2) समता
(3) केसरी
(4) मूकनायक
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
………..यांच्या ‘निबंधमाले’ मधून तत्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर केलेले भाष्य वाचायला मिळते.
(1) कृष्णशास्त्री चिपळूणकर
(2) विष्णुशास्त्री चिपळूणकर
(3) लोकमान्य टिळक
(4) गोपाळ हरी देशमुख
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
लोकहितवादी ऊर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी या
साप्ताहिकातून ‘शतपत्रे’ लिहिली.
(1) ज्ञानोदय
(2) ज्ञानप्रकाश
(3) प्रभाकर
(4) दीनबंधू
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
इतिहासाच्या साधनांमधील………….साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
(1) लिखित
(2) मौखिक
(3) भौतिक
(4) दृक्-श्राव्य
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
पुण्यातील …………..या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.
(1) आगाखान पॅलेस
(2) साबरमती आश्रम
(3) सेल्युलर जेल
(4) लक्ष्मी विलास पॅलेस
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
मुंबई येथील मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते ?
(1) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
(2) महात्मा जोतीराव फुले
(3) लोकमान्य टिळक
(4) महात्मा गांधी
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक
अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर ………….यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते.
(1) वासुदेव बळवंत फडके
(2) उमाजी नाईक
(3) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
(4) भगतसिंग
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले ?
(1) मूकनायक
(2) बहिष्कृत भारत
(3) जनता
(4) प्रबुद्ध भारत
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
………… कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो
(1) ब्रिटिश कालखंड ते मराठा कालखंड
(2) मराठा व इतर संस्थानिकांचा कालखंड
(3) ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांचा कालखंड
(4) युरोपीय सत्तांच्या आगमनापूर्वीचा कालखंड
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचे नकाशे तयार करण्याचे काम कोणी केले आहे ?
(1) मॅपिंग सोसायटी ऑफ इंडिया
(2) इंडियाज ब्यूरो
(3) सर्व्हे ऑफ इंडिया
(4) यांपैकी नाही
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
दलित वर्गाच्या जागृतीसाठी पोवाड्यांची रचना करून ते सादर केले.
(1) आर्य समाजाने
(2) सत्यशोधक समाजाने
(3) ब्राह्मो समाजाने
(4) प्रार्थना समाजाने
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2
सत्यशोधक समाजाने ……….च्या माध्यमातून शोषित वर्गात जागृती निर्माण केली.
(1) पोवाडा
(2) स्फूर्तिगीत
(3) देशभक्तिगीत
(4) राष्ट्रगीत
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेल्या …………या गीताची ध्वनिफीत आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधन म्हणून उपयोगी पडते.
(1) वंदे मातरम्
(2) झंडा ऊँचा रहे हमारा
(3) जन गण मन
(4) सारे जहाँ से अच्छा
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता ?
(1)पोवाडा
(2) छायाचित्र
(3) लोकगीत
(4) चित्रपट
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला…………. सोपवता येईल.
(1) शासनाकडे
(2) सामाजिक संस्थांकडे
(3) इतिहास संशोधकांकडे
(4) भावी पिढ्यांकडे
या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4