भविष्य निर्वाह निधी अभिलेखे अद्यावत करुन भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी (GPF Slip) शालार्थ प्रणाली मार्फत तयार करुन वितरीत करणे बाबत gpf slip paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भविष्य निर्वाह निधी अभिलेखे अद्यावत करुन भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी (GPF Slip) शालार्थ प्रणाली मार्फत तयार करुन वितरीत करणे बाबत gpf slip paripatrak 

संदर्भः संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/जीपीएफ/स्लीप /२९३८ दिनांक-१३/०६/२०२५.

उपरोक्त विषयान्वये भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी (GPF Slip) शालार्थ प्रणाली मार्फत तयार करुन वाटप करणे बाबत संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले होते. तथापी एकूण १,७८,४९८ भविष्य निर्वाह निधी पात्र कर्मचाऱ्यांपैकी ७९८४९ कर्मचाऱ्यांचे शालार्थ Opening Balance शालार्थ प्रणालीवर अद्यावत करण्यात आलेले असून उर्वरीत ९८,६४५ कर्मचाऱ्यांचे Opening Balance शालार्थ प्रणालीवर अद्यावत करणे प्रलंबित आहे. याबाबतचा वेतन पथक निहाय तपशील सोबत जोडला आहे.

या संदर्भात पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) दि.०१.०४.२०२१ रोजीचा Opening Balance शालार्थ प्रणालीव नोंद करणे आवश्यक आहे. तदनंतर ऑफलाईन पध्दतीने देण्यात आलेला परतावा, नापरतावा व अंतिम अदयागी याची नोंद प्रणालीवर करणे आवश्यक आहे. या करीता कालबध्द नियोजन करुन दि.३०.०९.२०२६ पर्यात आपल्या जिल्हयातील सर्व कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी संबंधित हिशोब शालार्थ प्रणालीवर अद्यावत करण्यात यावा.

२) उपरोक्त कार्यवाही करतेवेळी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी तसेच सन २०२६-२७ व सन २०२७-२८ मध्ये सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी हिशोब प्राधान्याने अद्यावत करावेत.

३) उपरोक्त प्रमाणे संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व अधिक्षक वेतन पथक (प्राथमिक/माध्यमिक) यांनी दि. ०१.१०.२०२६ नंतर जी.पी. एफ परतावा / नापरतावा व अंतिम अदायगी तसेच नियमित व परतावा वजावट याबाबतची कार्यवाही शालार्थ प्रणाली मार्फत कार्यन्वीत होईल याची दक्षता घेण्यात यावी. तदनंतर भविष्य निर्वाह निधी संदर्भातील कोणतीही कार्यवाही ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार नाही याची याची नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment